पाकिस्तानमधील राजकारण कोणत्या वळणावर

 


   सध्या   पाकिस्तानमधील राजकारण एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे . केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असंणाऱ्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान  तेहरीके इन्साफ विरुद्ध सत्ताधिकारी पक्ष सर्व शक्ती एकवटून उभा राहिला आहे . या लढाईत पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाने स्वतःसाठी निधी गोळा करताना देशहिताला तिलांजली देत निधी गोळा करण्याप्रकरणी सुरु असलेल्या आठ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका याचिकेचा निकाल देताना  पाकिस्तानी निवडणूक आयोगाने पाकिस्तानी तेहरीके इन्साफ या पक्षविरोधात दिलेल्या निर्णयामुळे त्यांना अधिकच बळ मिळाले आहे पाकिस्तानी निवडणूक आयोगाने पक्षसासाठी निधी गोळा करताना देशहिताला तिलांजली दिली नाही मात्र पक्षासाठी निधी गोळा करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता राखली गेली पक्षाच्या बँक खात्याचे व्यवहारात संशय घेण्यास वाव आहे तरी या बाबत पक्षाने खुलासा करावा असे निर्देश पाकिस्तानी निवडणूक आयोगाने पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला  दिले आहेत . सत्ताधिकारी पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मुव्हमेंट या १७ पक्ष्याच्या आघाडीमार्फत इम्रान खान यांनी आणि त्यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षावर कायमची बंदी घालण्यात यावी यासाठी . बांगलादेश स्वतंत्र झालेल्या तयार करण्यात आलेल्या  आणि सध्या अस्तित्वात असलेल्या  संविधानाच्या कलम १९ आणि ६ नुसार कार्यवाही करण्याबाबतची प्रक्रिया सुरु करण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे  या आधी देखीलपाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेच्यासत्तांतराचा वेळी पाकिस्तनच्या सध्याच्या वर्तमान एकहहतर का आईनं च्या कलम ६ आणि ६२ नुसार इम्रान खान यांच्या विरोधात कार्यवाही करण्याचे त्यांनी प्रयत्न केले होते त्यासाठी पाकिस्तनाच्या संविधानाच्या कलम १९२ नुसार न्यायालयाला विधानसभेत झालेल्या निर्यांविरोधात  दाद मागणीच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्याचे देखील प्रयत्न करण्यात आला होता 

              इम्रान खान याने या निर्णयाबबाबत नापसंती दर्शवली आहे . आपण पूर्णतः निर्दोष आहोत . कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करत आपण पक्षसासाठी निधी गोळा केलेला नाही . आपण पाकिस्तानी नागरिकांकडूनच निधी गोळा केला आहे .अनिवासी असले तरी आपण पाकिस्तानी नागरिकांकडूनच निधी गोळा केला आहे आपल्याविरोधात देशहिताच्या आरोप करताना योग्य ती काळजी घेण्यात आलेली नाही गैर मुस्लिम बांधवांकडून पॆसे घेतल्यास त्यास सरळसरळ परदेशी नागरिक करण्यात आले आहे गैरमुस्लिम असला तरी तो पाकिस्तानी
नागरिक असू शकतो असा साधा विचार आपल्यावर आरोप करताना केला गेला नाहीयेय असे स्पष्टीकरण इम्रान खान यांच्याकडून देण्यात येत आहे  मते  मते निवडणूक आयोग हा सत्ताधिकारी पक्षाच्या बाजूने झुकलेला असून तो रद्द करण्यात यावा तो जाणीपूर्वक पाकिस्तानी तेहरीके इन्साफ या पक्षविरोधात निर्णय घेतो आपल्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी इम्रान खान याने  त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच न्य्यायालयत दाद मागितली असता निवडणूक आयोगाचा प्रत्येक निर्णय सर्वोच न्यायालयाने रद्द केला असल्याचा दाखला दिला आहे .निवडणूक आयोगाच्या विरोधात इम्रान खान याने  त्यांच्या पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वा या प्रांतांच्या विधानसभेत अविश्वाचा प्रस्ताव दाखल करण्याची तयारी केली आहे इम्रान खान याच्यामते सध्याच्या निवडणूक आयोगाच्या निरीक्षणाखाली निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाही इम्रान खान याने जनमत आपल्या बाजूने आहे याचा फायदा घेत इस्लामाबाद येथे आंदोलन करायचे मत व्यक्त केले आहे या आंदोलनांचा धसका घेत इस्लामाबाद शहरात जागोजागी कंटनेर उभे करत रस्ता बंद केला आहे . ज्याचा फटका शहरातील सर्वसामान्य जनतेला बसत आहे
          सत्ताधिकारी आणि विरोधी पक्षातील हे राजकारण इम्रान खान याची पंतप्रधानपदावरून गच्छति केल्यापासून अधिकच तीव्र होत आहे पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत आपण त्यांचे प्रत्यंतर सुद्धा बघितले मात्र या सत्तेच्या पटलावरील खेळामुळे सर्वसामान्य जनता त्रास सहन करत आहे आज पाकिस्तानात महागाईचा दर ३३ % आहे तेथील बलुचिस्तान आणि खैबर ए पख्तुन्वा या प्रांतात पावसाने उच्छाद मांडला आहे ५ ऑगस्टपर्यंत दोन्ही प्रांत मिळून पावसामुळे  २७० जणांचा मृत्यू झाल्याचे डॉनच्या बातमीत म्हंटले आहे बलुचिस्तान प्रांतात स्वतंत्र होण्याच्या लढा दिवसोंदिवस उग्र स्वरूप धारण करत आहे ज्यामुळे तिथे अनेक बॉम्बस्फोट होत आहेत ज्यामुळे तेथील सर्वसामान्य जनतेला अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागत आहे पाकिस्तानच्या संविधाच्या कलमाचा आधार घेत 
विरुद्ध बाजूला त्रास देण्याच्या राजकारण्यांच्या उद्योगामुळे जनता कंटाळली आहे तेथील सत्ताधिकारी असलेल्या पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मूव्हमेन्ट या १७ पक्षाच्या आघाडीकडून  सर्वोच्च न्यायालयावर तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तानी तेहरीके इन्साफ या पक्षाकडून पाकिस्तानी निवडणूक आयोगावर विरोधकांना जाणूनबुजून साह्य करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे ज्यामुळे तेथिल प्रशासन काहीसे विस्कळीत झाले आहे एकंदरीत पाकिस्तानची वाटचाल नक्की कुठे चाललीय असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी तेथील परिस्थिती आहे 

ही_माझी_एक_हजार_छत्तिसावी _ब्लॉगपोस्ट_आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?