भारतीय बुद्धिबळपटूची कौतुकास्पद कामगिरी

     

  सध्या भारतीय क्रीडापटू शारीरिक असो किंवा  बौद्धिक दोन्ही ठिकाणी   आपले कसब दाखवत आहेत . इं ग्लंडच्या बर्निंगहॅम येथे सुरु असणाऱ्या राष्टकुल स्पर्धेत भारतीय खेलाडू चमकदार कामगिरी करत पदकाची लयलूट करत आहेच मात्र त्या बरोबरच तामिळनाडू राज्यातील मच्छलीपट्टणम येथे सुरु असलेल्या ४४ व्य बुद्धिबळ ऑलम्पियाड दम्यान भारताच्या सर्व सहाही संघाकडून अत्यंत चमकदार कामगिरी कऱण्यात येत आहे ज्यामुळे ११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत ९ व्या फेरी अखेरीसच भारताच्या खुल्या गटातील तीन संघापैकीब  संघ आणि महिलांच्या तीन संघांपैकी ब   संघ सुवर्णपदक मिळवण्याच्या स्पर्धेत अत्यंत पुढे आहे 

        या स्पर्धेत नाशिकचे आयकॉन ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांच्यासह सर्वच खेळाडू चमकदार कामगिरी करत असल्याने  शनिवारअखेरपर्यंत झालेल्या  सहाही संघाचे प्रत्येकी ८  या प्रमाणे एकूण ४८  सामन्यांपैकी ६ सामन्यात हार स्वीकारत आणि   ६  बरोबरी मान्य करण्याचा अपवाद वगळता  सर्व सामने भारतीय खेळाडूंनी मोठ्या फरकाने खिश्यात टाकले आहेत पहिल्या फेरीत खुल्या गटात  भारताच्या अ  संघाने झिम्बाब्वे संघाला ४ विरुद्ध ० असे सरळ नमवले  भारताच्या ब संघाने संयुक्त अरब अमिरात (युएई ) संघाविरुद्धसर्वांच्या सर्व डाव जिकंत  विजय मिळवला    तर भारताच्या क संघाने दक्षिण सुदान या संघाला  एकही विजय मिळण्याची संधी न देता हरवले  महिलांच्या गटात देखील भारताच्या अ संघाने ताजकिस्तान चा तर ब संघाने वेल्स आणि क संघाने होंगकोंग या तिन्ही संघाना ४ विरुद्ध शून्य असे सहज नमवले दुसऱ्या फेरीत भारताच्या खुल्या गटातील ब संघाने इस्टोनियाला संघाबरोबर झालेल्या सामन्यात सर्वांच्या सर्व डावात विजय प्राप्त केला भारताच्या ‘अ’ संघाने मोल्डोव्हाला पराभव बघण्यास भाग पडले या फेरीत भारताच्या अ संघातील खेळाडूंनी तीन डावात विजय मिळवला मात्र अर्जुन इरेगिसला बरोबरी मान्य 


करावी लागल्याने साडेतीन विरुद्ध अर्धा गुणाने ही फेरी जिंकली .भारताच्या खुल्या गटातील क संघाने प्रतिस्पर्ध्यवार अडीच विरुद्ध दीड गुण मिळवत आपली विजयाची घोडदौद सुरूच ठेवली . दुसऱ्या फेरीत महिल्यांच्या गटात भारताच्या अ संघाने अर्जेटिना संघावर साडेतीन विरुद्ध दीड अश्या मोठ्या फरकाने विजय मिळवला तर ब गटात  लात्व्हिया या संघाविरुद्ध खेळताना तीन विजय आणि एक बरोबरी अशी कामगिरी करता आपल्या खात्यात साडेतीन गुण मिळवले भारताची दुसऱ्या फेरती महिला क संघाची लढत सिंगापूर संघाविरुद्ध झाली या लढतीत दोन विजय आणि दोन बरोबरी यांच्यासह भारताने तीन गुण मिळवले तिसऱ्या फेरीत भारताच्या खुल्या गटातील अ संघाने ग्रीसला ३ विरुद्ध १ अशी धूळ चारली ब संघाने सलग तिसऱ्यांदा प्रतिस्पर्ध्यांविरुद्धचे सर्व डाव जिंकत स्वित्र्झलडचा धुव्वा उडवला भारताच्या ‘क’ संघाने आइसलँडवर ३-१ अशी मात केली.महिलांच्या गटात अ संघाने इंग्लडंच्या ३ विरुद्ध १ अशा विजय संपादित केला भारताच्या ‘ब  संघाने इंडोनेशियाला, तर ‘क संघाने ऑस्ट्रियाला गुडघे टेकायला भाग पडले चौथ्या फेरीत मात्र भारताच्या विजयला काहीसा ब्रेक लागला खुल्या गटातील भारताच्या अ संघाला फ्रान्सविरुद्ध दोन विरुद्ध दोन अशी बरोबरी मान्य करावी लागली ब संघाने मात्र विजयाची घोडदौड सुरूच ठेवली त्यांनी प्रतिस्पर्ध्यावर ३ विरुद्ध १ अशी मात केली महिला गटात भारताच्या अ संघाने हंगेरीला अडीच विरुद्ध दीड अश्या फरकाने नमवले तर ब गटाने इस्टोनियाला २.५-१.५ असे पराभूत केले दोन्ही गटातील क संघाला मात्र पराभव बघावा लागला खुल्या गटात स्पेनविरुद्धच्या सामन्यात अडीच विरुद्ध दीड गुण प्राप्त करत तर महिला गटात  जॉर्जियाकडून १-३ असा
पराभव  स्वीकारावा लागला पाचव्या फेरीत भारताच्याखुल्या गटातील  ब संघाने विजयाची मालिका तशीच सुरु ठेवत स्पेनविरुद्ध अडीच विरुद्ध डिड गुणांची कमाई करत विजय मिळवला तर भारताच्या खुल्या गटातील ब आणि क संगी देखील अनुक्रमाने रोमानिया आणि चिली संघांवर २.५-१.५अश्या एक गुणांच्या फरकाने विजयश्री संपादित केली महिलेच्या गटात अ  गटात फ्रान्सविरुद्ध खेळताना त्यांना अडीच विरुद्ध दीड असे नमवत पराभव पत्करायला भाग पडले ब गटाला मात्र जार्जिया संघाकडून तीन विरुद्ध  अश्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला क संघाने ब्राझीलविरुद्ध खेळताना दोन दोन अशी बरोबरी केली सहाव्या फेरीत खुल्या गटात भारत-अ संघाने उझबेकिस्तानविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करली. भारत-क संघाने लिथुआनियाला  ३.५-०.५ असा पराभव दाखवला भारताच्या ब गटाला स्पर्धेत पहिल्यादाच पराभवचा सामना बघावा लागला महिल्यांच्या गटात अ संघाने बलाढ्य अश्या जार्जिया संघाचा तीन विरुद्ध एक अश्या फरकाने तर क संघाने ऑस्ट्रेलियाचा ३-१ असा पराभव केला -ब संघाने चेक प्रजासत्ताकविरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सोडवली, भारतीय ‘अ संघाने   बुद्धिबळ ऑलिम्पियाडस्पर्धेच्या सातव्या फेरीत भारताच्या ‘क’ संघावर ३-१ अशा फरकाने मात केली.भारताच्या ‘ब’ संघाने क्युबाला ३.५-०.५ असे  मोठ्या फरकाने पराभूत केले पराभूत केले
महिलांच्या गटात झालेल्या सामन्यात अ संघाने झरबैजानला  २.५-१.५ असे पराजित  पराभव केले भारताच्या ‘ब’ संघाने ग्रीसकडून पराभव पत्करला, तर ‘क’ संघाने स्वित्र्झलडवर ३-१ अशी मात केली

एकंदरीत इंलगडमध्ये  भारतीय क्रीडापटू आपले शारीरिक सामर्थ्य जगाला देखवून देत असताना भारतीय बुद्धिबळपटू आलाय बुद्धीची ताकद जगाला दाखवून देत भारतीय खेळाडू कुठेच कमी नसल्याचे दाखवून देत आहे हेच खरे 

ही_माझी_एक_हजार_सदोतीसवी _ब्लॉगपोस्ट_आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?