काळ्या पर्वाची वर्षपूर्ती

  


२०२१ ऑगस्ट १५ ही फक्त एक तारीख नाहीये . एका धार्मिक उन्मादाने एका  एका अप्रगत मात्र मात्र प्रगतीच्या वाटेवर येण्यास अत्यंत उच्छुक असलेल्या देशाला  उर्वरित जग ज्या युगापासून कैक शतके दूर दूर गेले आहे या  मध्ययुगात ढकलल्याचा तो दिवस आहे .  जगाची एकमेव सुपरपॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेने अत्यंत घाबरून पळ  काढल्याने अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता येण्याचा तो दिवस आहे . भारत जेव्हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असेल तेव्हा तालिबान २. ० ला एक वर्ष पूर्ण झालेले असेल .

          या एक वर्षात अफगाणिस्तान किमान २०० वर्षे मागे गेला आहे .आजमितीस तेथील महिलांचे उच्च शिक्षण  थांबलेले आहे .सहावीनंतर तेथील महिला पुढे शिकू शकत नाही . माध्यमांचे स्वातंत्र्य सपुष्टात आले आहे तेथील महिलांना अर्थाजनाची परवानगी नहिये २००१ नंतर अमेरिकेच्या

आक्रमणानंतर महिलांना जे काही स्वातंत्र्य मिळाले ते पूर्णतः मागे घेण्यात आले आहे . महिलांवर तालिबानच्या पहिल्या काळात अर्थात १९९६ ते २००१ दरम्यान जी बंधने होती ती जवळपास सर्वांच्या सर्व बंधने पुन्हा लादण्यात आलेली आहेत तेथील महिला घरातील पुरुष सदस्यांच्याबरोबरच घराबाहेर पडू शकता. तेही तेथील पुरुष पोलिसांना बाहेर पडण्यास सबळ कारण वाटेल अश्याच कारणासाठी आजमितीस तुरुंगातील कर्मचारी वगळता अफगाणिस्तानमध्ये महिला पोलीस नाही . तालिबानच्या एका प्रवक्त्याने मध्यंतरी महिलांनी कायम बुरखाच घातला पाहिजे बुरख्याशिवाय स्त्री म्हणजे फक्त एक वस्तू असे ट्विट केले होते प्रवक्त्याचे हे ट्विट तालिबाबानाचा महिलांविषयी दृष्टिकोन कसा आहे?  हे सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट करतो

        अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती देखील अत्यंत दयनीय आहे तालिबानची सत्ता येण्याआधी अफगाणिस्तानच्या सरकारचा जवळपास ७५% डोलारा हा परकीय मदतीवर अवलुबुन होता आज ही परकीय मदत १०० % थांबलेली  आहे .तेथील लोक प्रचंड प्रमाणात गरीब झाले आहेत तालिबानच्या सत्ता येण्याच्या अगोदर मध्यमवर्गीय असलेले लोक घरातील सामान विकून कुटुंबाचे पालनपोषण करत आहेत तेथील लोक रोजच्या जगण्याच्या गोष्टीसाठी अत्यंत झगडत आहे . जवळपास सर्वच अफगाणिस्तान आज अर्धपोटी आहे तेथील आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडून पडली आहे . कॉलरासारख्या रोगाच्या रुग्णाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने इतर रुग्णांवरचे उपचार बंद करून फक्त

त्यांच्यवरच उपचार करण्याची वेळ तेथील रुग्णालयावर आलेली आहे मोठ्या गंभीर आजाराचे सोडूनच द्या सध्या सध्या आजाराचे उपचार देखील अफगाणिस्तानमधील सर्वसामान्य जनतेला मिल्ने अत्यंत अवघड झाले आहे क्रिकेट वगळता सर्व खेळ अफगाणिस्तानमधून हद्दपार झाले आहेत क्रिकेट थोडेफार टिकून आहे ते सुद्धा फक्त पुरुषांचे . अफगाणिस्तानमधून संगीत पूर्णतः संपलेले आहे आज अफगाणिस्तानमध्ये शहरी भागात एखाद दुसरा चित्रपट प्रदर्शित होतो मात्र त्या चित्रपटात फक्त आणि फक्त पुरुषांचा सहभाग असतो २००१  नंतर बाळसे धरणारे अफगाणिस्तानचे सांस्कृतिक विश्व आज इतिहासजमा झाले आहे

       २०२१ ऑगस्ट १५ रोजी जेव्हा तालिबाबान सत्तेत आले तेव्हा त्यांनी आम्ही आमच्या आधीच्या सत्तेपेक्षा आताची सत्ता वेगळी असेल आमच्या आधीच्या सत्ताकाळात ज्याप्रमाणे बंधने होती तशी यावेळी असणार नाहीत आम्ही आधुनिक मूल्ये आणि इस्लामी प्रशासन व्यवस्था यांच्या योग्य तो मेळ घालत प्रशासन राबवू असे आश्वासन दिले होते मात्र तालिबानने सध्याचे प्रशासन बघता या आश्वासनाच्या

पूर्णतः विरोधी कारभार तालिबान करत असल्याचे दिसून येत आहे सध्याच्या तालिबानच्या कारभाराविषयी बोलायचे झाल्यास वीस वर्षाच्या झोपेनंतर जागे होऊन तालिबान पुन्हा त्यांच्या जुनाच कारभार करत तर नाहीना अशा प्रश्न पडावा अशी त्यांची स्थिती आहे १९९६ ते २००१ या कालावधीतील त्यांच्या कारभार आणि त्यांच्या सध्याचा कारभार हा पूर्णतः एक सारखा आहे फरक इतकाच की त्यावेळी वर्ष १९९६ होते आता २०२२ आहे

         १९८० पर्यंत अफगाणिस्तान महिलांना स्वातंत्र्य होते त्याचे फोटो आपणास इंटरनेटर सहज मिळू शकतात . युनाटेड सोव्हिएत सोशालिस्ट  रशियाच्या १० वर्षाच्या आक्रमांच्या काळात देखील त्यांच्यावर फारशी बंधने नव्हती मात्र १९८९ ला युएसएसआर ने युद्धातून देशाच्या अंतर्गत समस्येमुळे माघार घेतल्यावर तेथील चित्र झपाट्याने बदलले . तेथील महिलांना धार्मिक उन्मादाने पारतंत्र्यतात ढकलण्यास सुरवात केली ज्याच्या कळसाध्या १९९६ ते २००१ या काळात गाठला गेला २००१ साली न्यूयॉर्कमधील दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी अमेरिकेने आक्रमण केल्यानंतर सुमारे २० वर्ष महिलांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळाले मात्र अमेरिकेच्या पळपुटेपणामुळे १५ ऑगस्ट२०२१  रोजी तालिबाबाने पुन्हा सत्ता ताब्यात घेतल्यावर महिलांचे स्वातंत्र्य पुन्हा एकदा हिरावले गेले . तालिबानच्या पाडाव होऊन तेथील महिलांना पुन्हा मोकळा स्वास घेता यावा अशी स्थिती अफगाणिस्तानमध्ये येवो हि ईश्वरचरणी प्रार्थना जाता जात सर्वांना भारताच्या आझादी का अमृत महोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा  जय हिंद

#ही_माझी_एक_हजार_चाळिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?