आखाती देशात भारताचा डंका

  


सध्या
जागतिक राजकारणात भारताचा डंका दिवसोंदिवस वाढत आहे . आखाती देशात  तर हा डंका मोठ्या प्रमाणत वाढत आहे .इस्लाम हा प्रमुख धर्म असलेल्या आखाती देशात भारतीय परराष्ट्र खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे आवाढलेले दौरे हेच स्पष्ट करत आहेत ३१ ऑगस्ट ते सप्टेंबर रोजी  भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे  १४ व्या भारत आणि युएई  Joint Commission Meeting आणि तिसऱ्या भारत युएई  Strategic Dialogue साठी दुबईला गेले होते त्याठिकाणी त्यांनी युएई चे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान. यांच्याशी  विविध मुद्यावर चर्चा करून जेमतेम आठवड्याच्या अवधी उलटत नाहीतो  आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे दुसऱ्या आखाती देशात अर्थात सौदी अरेबिया या देशात १० ते १२ सप्टेंबर रोजी अधिकृत दौऱ्यावर आहेत तिथे आपले परराष्ट्र मंत्री भारत आणि सौदी अरेबिया यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सहकार्याने Strategic Dialogue  कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितींशी संवाद साधतील या समित्या राजकीयसुरक्षा सामाजिक आणि संस्कृतीला आदानप्रदान या क्षेत्रात कार्यरत आहेत  .भारत आणि युएई या दोन देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्यासप्टेंबर महिन्यात झालेल्या  बैठकीत  या आधी १८ फेब्रुवारी २०२२ आणि मे २०२२ रोजी झालेल्या विविध करारांचा आढावा घेण्यात आला  

            जी या देशांच्या परिषदेवरून येताना पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएई चा दौरा केला होता हे आपण लक्षात घेयला हवे तसेच काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियाच्या शालेय परीक्षेत भारताच्या संस्कृतीविषयी प्रश्न विचारण्यात आले होते युएई काश्मीरमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन उभारण्यास अनुकूल आहे  तसेच भारत काश्मीरमध्ये करत असणारे बदल हे भारताची अंतर्गत  बाब आहे असे सांगत त्यांनी अनेकदा पाकिस्तानला फटकारले आहे यूएईचे सध्याचे राजे  शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान जे दुबईचे राजे देखील आहेत त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांना आदरजंली वाहण्यासाठी आपण आपला  राष्ट्रध्वज एका दिवसासाठी अर्ध्यावर आणला होता  तसेच नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर ज्या देशाने अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली होती तो देश म्हणजे युनाटेड अरब अमिरात होय इराणच्या आखातात असणाऱ्या देशांनी भविष्यात आपण एकेकटे राहलो तर आपला निभाव लागणार नाही हे लक्षात घेत १९७१ साली एकत्र येत स्वतंत्र्य देश स्थापन केला तोच युनाटेड अरब अमिरात . आपण अनेकदा ऐकतो ती दुबई शारजा अबुधावी ही मुळात त्या देशात असणारी राज्ये आहेत त्या राज्यांच्या राजधानीचे शहर देखील राज्याचे नाव असणारे शहर आहे इराणच्या आखातात सौदी अरेबिया आणि कतार या दोन देशांच्या मधोमध असणारा देश म्हणजे  युनाटेड अरब अमिरात तसेच या देशाच्या समुद्री किनाऱ्याजवळ जागतिक राजकारणाच्या विचार करता अत्यंत स्फोटक असणारी इराणच्या आखातातील होर्मूझ ची समुद्रीधुनी
आहे  हे आपण युनाटेड अरब  अमिरात या देशाचे भारताशी असणारे संपर्क समजवून घेताना समजवून घेतले पाहिजे  

      इराणच्या   आखाताशी ज्या देशांच्या समुद्रकिनारा लागून आहे त्याच देशांना आखाती देश म्हणतात हे आपण लक्षात घेयला हवे जगाच्या नकाश्यात भारत आणि भारताला  लागून पाकिस्तान हा देश सर्वांना माहिती आहेच या पाकिस्तानला पश्चिमेला (नकाश्यात डाव्या बाजूला असणारा देश ) म्हणजे इराण .जगाच्या नकाश्यात इराण नंतर पाण्याच्या मोठा भाग आतमध्ये गेलेला दिसतो  पाण्याच्या आत मध्ये हा भाग म्हणजेच इराणचे आखात .अनेकजण येमेन या देशाला आखाती देश समजतात मात्र तो त्याच प्रदेशातील  इस्लामधर्मीय देश असला तरी तो आखाती देश नाही हे आपण समजून घेयला हवे या देशांशी आपला संपर्क वाढणे भारताला पाकिस्तानवर दबाव निर्माण करणे आणि नैसर्गिक ऊर्जास्रोतांसाठी फायदेशीर ठरणार आहे 

#ही_माझी_एक_ हजार_ चौऱ्याहत्तरावी_ब्लॉगपोस्ट_आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?