भारताची जगाला साद

 


 सप्टेंबर महिन्याच्या १५ आणि १६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुघल संस्थापक बाबरच्या मूळ गावी अर्थात समरकंद या शहरात असणार आहेत त्या ठिकाणी हे २२ व्या शांघाय को ऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या २२ व्या  अधिवेशनाला हजेरी लावतील भारतासाठी हे अधिवेशन अत्यंत महतवाचे आहे कारण पुढील २०२३ साली शांघाय को ऑपरेशन ऑर्गनाझेशन या संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे येणार आहे त्यामुळे २०२३ साली होणारे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी पार्श्वभूमीवर तयार करण्यासाठी भारतासासाठी हे अधिवेशन महत्वाचे ठरणार आहे उझबेकिस्तानची राजधानी समरकंद येथे होणारे अधिवेशन कोव्हीड १९ च्या साथरोगानंतर पूर्णपणे ऑफलाईन होणारे हे शांघाय को ऑपरेशन ऑर्गनाझेशनचे पहिलेच अधिवेशन आहे . २००२० साली झालेलं अधिवेशन पूर्णतः ऑनलाईन झाले होते तर मागील वर्षी रशियाच्या अध्यक्षतेखाली झालेले  अधिवेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन याचा मेळ घालत झाले होते .

जगातील सर्वात मोठी पादेशिक संघटना असलेल्या शांघाय कॉ ऑपरेशन या संघटनेची स्थापना २००१ साली आहे भारत या संघटनेच्या निरीक्षक म्हणून २००५ पासून काम करत होता तर सन २०१७ पासून या संघटनेच्या भारत पाकिस्तानसह पूर्णवेळ सदस्य झाला नुकताच इराण या संघटनेचा निरीक्षक सदस्य झाला या संघटनेत चीन रशिया कझागिस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान ताजिकीस्तान रशिया भारत पाकिस्तान इराण हे देश पूर्णवेळ सदस्य आहे तर आर्मेनिया नेपाळ श्रीलंका अझरबैजान कंबोडिया हे निरीक्षक आहेत युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग असणारा मध्यपूर्वेतील तुर्कमेनिस्तान हा देश याचा सदस्य देश नाहीये

या अधिवेशनात भारताकडून सीमेबाहेरून होणारा दहशतवादी हल्ला . प्रादेशिक एकात्मकता या मुद्यांवर चर्चा केली जाईल . या सघंटनेत पूर्ण सदस्य म्हणून  समाविष्ट असणाऱ्या सदस्य देशांपैकी मध्य आशिया भागातील चार  देशांच्या सीमा अफगाणिस्तानला प्रत्यक्षपणे लागलेल्या आहेत त्यामुळे भारतासारखाच याही देशासाठी दहशतवाद हा मोठा प्रश्न आहे . या खेरीज युक्रेन युद्धामुळे बदललेली जागतिक अर्थव्यवस्थेची घडी कोव्हीड १९ नंतर जागचे बदललेली राजकारण याही मुद्यांवर या अधिवेशनात चर्चा होईल या अधिवेशनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होण्याचा संभव आहे ऑक्टोबर २०१९ नंतर प्रथमच हे दोन नेते जगातिक व्यासपीठावर एकमेकासमोर  येतील सदर कालावधीत चीन आणि भारत यांच्या दरम्यान सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे त्यासाठी अनेक बैठक होऊन सुद्धा परिस्थिती सुधारली नाहीये या तणावादरम्यान त्यांच्यात प्रत्यक्ष बोलणी झालेली नाही ही गोष्ट आपण लक्षात घेयला हवी

पाकिस्तानबरोबर सीमा शेअर करणारा आणि भारताशी अत्यंत मैत्रत्वाचे संबंध असलेल्या इराणचा पुढील वर्षी पूर्ण सदस्य म्हणून होणारा प्रवेश ही भारतासाठी येत्या काळात अत्यंत जमेची बाजू असणार आहे चीन आणि पाकिस्तान या दोन शत्रूंचा समावेश असणाऱ्या शांघाय को ऑपरेशन या संघटनेत भारताचे पारडे त्यामुळे काहीसे जड होणार आहे आजमितीस भारत चीन पाकिस्तान हे तीन देश वगळता अन्य देश म्हणजे रशिया कझागिस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान ताजिकीस्तान  या देशांपैकी रशिया हा  भारत आणि चीन या दोघांचा मित्र आहे अन्य चार देश हे रशिया आणि भारताच्या अधिक जवळचे मनात येऊ शकतात .

एकंदरीत १५ आणि १६ सप्टेंबर रोजी होणारी शांघाय को ऑपरेशन ऑर्गॅयझेशन भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे हेच खरे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?