जगात दौलाने फडकते भारताची ध्वजा 

 


भारताची ध्वजा   जगात दौलाने फडकत आहे ,हे सिद्ध करणाऱ्या घटना सध्या सातत्याने घडत आहेत .आखाती देशासी भारताचे संबंध दिवसोंदिवस मधुर होत असल्याचे आपणस स्पष्टपणे दिसत असताना हा गोड  संबंधाचा वारा आता पश्चिमी युरोपीय देश फ्रान्सपर्यंत पोहोचला असल्याचे सप्टेंबर महिन्याच्या  मध्यावर दिसून आले आहे १३ सप्टेबर ते १५ सप्टेंबर रोजी  फ्रांस या देशाच्या परराष्ट्र मंत्री ज्या फ्रांस या देशाच्या युरोपीय व्यवहार मंत्री सुद्धा आहेत अश्या श्रीमती कॅथरीन कोलोना या भारताच्या दौऱयावर आल्या होत्या . त्यामध्ये त्यांनी १३ आणि १४  सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर , यांची नवी दिल्ली येथील हैदराबाद हाऊस येथे  भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली . यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मेकॉर्न यांना भारतभेटीचे आश्वासन दिले 

     ज्या देशाच्या आर्थिक विकासात महागरातील संपत्ती आणि त्यावरील नियंत्रणाचा समावेश असतो अश्या देशांना ब्ल्यू इकॉनॉमी म्हणतात . जगभरात भारत आणि फ्रांस ब्ल्यू एकॉकनॉमी समजले जातात . त्या

पार्श्वभूमीवर कारवायांच्या विविध मुद्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि फ्रांस या देशाचे युरोपीय व्यवहार मंत्रालयाच्या मंत्री ज्या फ्रान्सच्या पराष्ट्रमंत्री देखील आशेत अश्या श्रीमती  कॅथरीन कोलोना यांनी चर्चा केली . ब्लू इकॉनॉमीवरील रोडमॅपचा भाग म्हणून, भारत ब्रेस्ट, फ्रान्स येथे लवकरच आयोजित करण्यात येणार्या 'सी टेक वीक'मध्ये "कंट्री ऑफ ऑनर" दोन्ही बाजूंच्या ब्लू इकॉनॉमी भागधारकांना एकत्र आणेल. असे यावेळी ठरवण्यात आले तसेच . फ्रान्सच्या  नेटवर्क. संरक्षण उद्योग सहकार्यावर,दोन्ही मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले

  या चर्चेदरम्यान   हैदराबादमध्ये सर्वात मोठे आणि पहिले विमान इंजिन एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल) सुविधेची स्थापना करण्याच्या सफारान समूहाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले  ही सुविधा  1200 कोटीं रुपयांच्या  गुंतवणुकीने उभारली जाईल.अमेरिकी डॉलरच्या भाषेत  हि १५० दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी होते .यामुळे  तेलंगणामध्ये सुमारे 1,000 उच्च-कुशल नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहेभारत आणि फ्रान्सने फेब्रुवारी 2022 मध्ये स्वीकारलेल्या द्विपक्षीय रोडमॅपवरील प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला  डॉ. एस. जयशंकर आणि कोलोना यांनी भारतआणि युरोपीय युनियन यांच्यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक करार

तसेच भौगोलिक निर्देशकांवरील करारावरील वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे स्वागत यावेळी केले व्यापरविषयक प्रलंबित करार पूर्ण केल्यास दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या व्यापारात मोठी वाढ होईल याबाबत दोन्ही देशात एकमत झाल्याचे यावेळी दिसून आले

  ऑक्टोबर२०२१ रोजी दोन्ही देशातील लोकांचा परस्पर संपर्क वाढावा यासाठी म्हणून सुरु करण्यात आलेल्या उपक्रम अधिक यशस्वी होण्याबाबत करावयाच्या गोष्टींची यावेळी चर्चा करण्यात आली तसेच अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा केली  फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री कॅथरीन कोलोना यांनी १५ सप्टेंबर रोजी मुबईला भेट देऊन तेथिल माझगाव डॉक यार्डला भेट दिली या ठिकाणी फ्रांस

आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमाने पी ७५ या पाणबुडी प्रकलपवर काम सुरु आहे तसेच मुबईतील भारतीय व्यावसायिक प्रतिनिधींनाही भेटल्या  आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने आयोजित केलेल्या इंडो-पॅसिफिक परिषदेत सहभागी झाल्या

       एकंदरीत विविध मुद्यामुळे पाकिस्तान आणि फ्रांस यांचे परराष्ट्र संबंध कमालीचे दुरावले असताना फ्रान्सबरोबर भारताचे दृढ होणारे संबंध जागतिक राजकारणात भारताचे म्हह्त्व अधोरेखित करणारे आहे नुकतीच भारताची जपान बरोबर अधिक दोन अशी बैठक झाली होती ज्यामध्ये दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी चर्चा केली होती .तसेच युनाटेड अरब अमिरात या देशाबरोबर ऑगस्टच्या पहिल्या आठवाड्यत झालेल्या चर्चेचा विचार करता याचे महत्व अधिकच अधोरेखित होते हेच खरे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?