कार्यकर्त्यांनो तयार रहा

   


  " कार्यकर्त्यांनो तयार रहा , मी आंदोलनाची हाक दिल्यावर आपणस  आंदोलनास सुरवात करायची आहे" , हा संदेश आहे, पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला. १६ सप्टेंबर रोजी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आँनलाइन माध्यमातून बोलताना त्यांनी हा संदेश दिला. अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने या बाबाबत दिलेल्या बातमीनूसार यावेळी इम्रान खान हे आंदोलनाची हाक दिल्यानंतर आधीप्रमाणे खुपनंतर आंदोलन सुरु करणार नाहीत, तर हाक दिल्यानंतर एक ते दोन दिवसात पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे आंदोलन सुरु करतील, किंवा आंदोलन सुरु करा, असे सांगितल्यावर तास ते दोन तासात कार्यकर्त्यांना त्यांच्या शहरात गावात स्थानिक पातळीवर आंदोलन सुरु करण्यास सांगतील . पुर्वी ते  संदेश दिल्यानंतर आठवड्यानंतर आंदोलन सुरु करायचे.या काळात सत्ताधिकारी त्यांचे आंदोलन चिरडून टाकाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायचे.मात्र अनुभवातून शहाणे होत त्यांनी निर्देश दिल्यावर लगेच आंदोलन सुरु करण्याचे आदेश आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

   पाकिस्तानमध्ये पूर्वीपासून असणारे आर्थिक संकट ,त्यातच पुरामुळे उद्भवलेली परीस्थिती हातळण्यास विद्यमान सरकारला आलेले अपयश तसेच खैबर ए पख्तूनवा (पुर्वीचा वायव्य सरहद्द प्रांत) या प्रांतात अफगाणिस्तान सिमेवरून होणारे दहशतवादी हल्ले यामुळे तेथील विद्यमान पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेटं सरकारविरोधात जनमत आहे. ज्याचा फायदा घेत इम्रान खान आपली पोळी भाजून घेण्यास आसुसलेले आहेत. आँगस्ट महिन्यात पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेच्या 20 जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत इम्रान खान यांना मिळालेल्या

यशामुळे, जनमत त्यांच्या बाजूचे आहे, ही बाब सिद्ध झाली आहे. त्यानंतर पाकिस्तानी पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांत या ठिकाणी झालेल्या विविध ठिकाणी झालेल्या राजकीय सभेस देशात महापुराचे थैमान सुरु असताना मिळालेल पाठिंबा बघता, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी आंदोलन सुरु केल्यास त्यास व्यापक पाठिंबा मिळणार हे सुर्यप्रकाश्याइतके स्पष्ट आहे.

आज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या विविध बंधनामुळे पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली आहे. पाकिस्तानात महागाईचा दर 27% आहे. महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या आकडा  पाकिस्तानच्या जिडीपीच्या 10% आहे. सध्या मुळातच अत्यंत कमी असलेला पाकिस्तान परकीय चलनसाठा झपाट्याने कमी होत आहे. पाकिस्तानचे जवळचे मित्र म्हणवल्या जाणाऱ्या युनाटेड अरब अमिरात, कतार ,सौदी अरेबिया आदी देशांनी विविध कारणे सांगत पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यासाठी टाळाटाळ केली आहे. आज पाकिस्तानची बाजू चीन आणि तूर्कीये(पुर्वीचे  नाव तूर्की {तूर्कस्तान})हे दोन देश घेत आहेत. मात्र तूर्कीये हा देशच सध्या विविध आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. तसेच पाकिस्तान आणि चीनचे सबंध देखील पुर्वीप्रमाणे मधूर राहिलेले नाहीत.  अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीला देखील त्यांच्या पहिल्या कारकिर्दीत जेव्हढी पाकिस्तानची गरज होती त्याच्या तूलनेत आता दुसऱ्या कारकिर्दीत पाकिस्तानची मदत शून्य लागत आहे. तसेच पाकिस्तानी सरकारकडून दहशतवादी संघटना जाहिर करण्यात आलेल्या "तेहरीके तालीबान पाकिस्तान", या संघटनेच्या विचारांशी त्यांची जवळीक आहे. ते त्यांना मदत करत असतात. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये असणारी सिमा 1890साली निश्चित करण्यात आली जी पाकिस्तानला मान्य आहे. मात्र

अफगाणिस्तानला मान्य नाही. त्यांच्या मते या सीमेमुळे पठाणी समुदाय विनाकारण दोन देशात विभागला गेला आहे. समस्त पठाणी लोक एकाच देशात असावेत किंवा त्यांचा स्वतंत्र देश असावा त्यामुळे अफगाणिस्तानकडून  पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर सातत्याने गोळीबार देखील करण्यात येत असतो यावर ठोस पाकिस्तानी  सरकारने भुमिका  न घेतल्याने  ज्यामुळे पाकिस्तानी जनतेत असंतोष आहे सबब पाकिस्तान आर्थिक स्तरावर प्रचंड अडचणीत असून जागतिक स्तरावर देखील एकटा पडत चालला आहे. या स्थितीचा फायदा घेत इम्रान खान विद्यमान सरकारविरोधात जनमत पेटवत आहे.इम्रान खान यांच्या मते ठिकठाक प्रगती करणाऱ्या पाकिस्तानचा गाडा विद्यमान सरकारने गाळात रूतवला आहे. आपण पंतप्रधानपदी असताना सध्या सत्तेत असणाऱ्या व्यक्तीच्या भष्ट्राचाराविरोधात कडक कारवाई केल्याने, इतरवेळी एकमेकांविषयी वाइट बोलणारे सर्व विरोधक माझ्या विरोधात, अमेरीकेची मदत घेत एकत्र आले. त्यांचे लक्ष्य पाकिस्तानची प्रगती नसुन स्वतःवर असलेल्या भष्ट्राचाराच्या आरोपातून सुटका करुन घेणे आहे. हा मुद्दा इम्रान खान सातत्याने त्यांच्या भाषणात सांगत असतात.

पाकिस्तानच्या आर्थिक संकटाचा पाढा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खांनी शांघाय को आँपरेशन आँरगानझेशन च्या समरकंद येथील अधिवेशनात वाचला होता.त्यावेळी ते प्रचंड भावूक झाले होते, हे समस्त जगाने बघीतले होते. याही मुद्द्यावरून इम्रान खान यांनी 17सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधानाचा निषेध केला.

पाकिस्तान अडचणीत आल्याने तिथे गृहयुद्ध सुरु झाल्यास त्याचे वाइट परीणाम भारतावर होतील.पाकिस्तान मुस्लिम जगातील अणवस्त्रे असणारा एकमेव देश आहे.तिथे यादवी  सुरु झाल्यास ही शस्त्रात्रे कोणाकडे हा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो.जर ती अयोग्य हातात पडली तर  मह भयानक स्थिती निर्माण होवू शकते.आपल्या

पंजाबमधील शेतकऱ्यांनी शेत नांगरणीयोग्य करण्यासाठी जाळल्यास त्याचे परीणाम पाकिस्तानात जाणवतात.त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाल्यास त्याचे हवेवर होणारे परीणाम आपल्या भारतावर देखील होतील.तसेच पाकिस्तानमधील सर्व महत्वाची शहरे भारतीय सीमेपासून जवळच आहेत .त्यामुळे तेथील विस्थापित अफगाणिस्तान ,इराणमध्ये जाण्याऐवजी आपल्याकडेच येतील.पाकिस्तानातील मुस्लिम बांधवांची आणि हिंदू धर्मियांची संख्या बघता तो प्रदेश भारतात  समाविष्ट झाल्यास लोकसंख्येचे नवे प्रश्न निर्माण होवू शकतात.त्यामुळे पाकिस्तानात शांतता नांदणेच आपल्या फायद्याचे आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?