भारताला मिळाला ७६ वा ग्रँडमास्टर

 


 
सध्या भारतीय बुद्धिबळपटू अत्यंत चमकदार कामगिरी करत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपल्या खिश्यात टाकत आहेत बुद्धिबळाचे विबल्डन म्हणून ओळखली जाणारी टाटा स्टील खुली बुद्धिबळ  स्पर्धा असो किंवा अबुधावी खुली बुद्धिबळ स्पर्धा अथवा दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा असो जगातील पातळीवर खेळवण्यात येणाऱ्या  अश्या सर्वच बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू सरस कामगिरी करत आहे याच गौरवास्पद कामगिरीत अजून एक मानाचा तुरा लावण्याची बातमी नुकतीच भारतीय बुद्धिबळ विश्वातून आली . १७ सप्टेबर रोजी भारताला प्रणव आनंद यांच्या रूपाने ७६ वा ग्रँडमास्टर मिळाल्याची ती सुखद वार्ता होती

बेंगळुरू येथील रहिवाशी असणाऱ्या१५ वर्षीय  प्रणव आंनद यांनी रोमानिया देशात सुरु असणाऱ्या जागतिक युवा बुद्धिबळ विजेतेपद  स्पर्धेत त्यांना बुधिबळ  ग्रँडमास्टर होण्यासाठीचा शेवटचा अडथळा ठरत असलेल्या कमी इलो रेटिंगवर मत करत आपले इलो रेटिंग ग्रँडमास्टर पदवी मिळवण्यासासाठी आवश्यक असलेल्या २५०० पर्यंत

वाढवले आणि ग्रँडमास्टर या किताबला गवसणी घातली ते  भारताचे ७६ वे ग्रँडमास्टर असतीलग्रँडमास्टर हा बुद्धिबळाची फिडे या नावाने सुपरिचित असणाऱ्या  आंतराष्ट्रीय संघटना अर्थात फेडरेशन इंटरनॅशनल ऑफ दि

इचेस या कडूनबुद्धिबळपटूंना देण्यात येणारा 'किताब असतो जो त्यांच्या खेळातील उत्कृष्टतेतेचा बहुमान समजला जातो कोणत्याही बुद्धिबळपटूस सम्मान मिळण्यासासाठी तीन कसोटीला पात्र ठरल्याबरोबर इलो रेटिंग किमान २५०० असावे लागते इलो रेटिंग हे बुद्धिबळपटूच्या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे करण्यात येणारे गुणकांन असते जेव्हढे हे गुणकांना जास्त तितका तो खेळाडूं उत्तम समजला जातो हे इलो रेटिंग फिडे मान्यताप्राप्त स्पर्धेत खेळून मिळते .

 प्रणव आनंद यांनी ग्रँडमास्टरपदासाठी आवश्यक असणाऱ्या तीन पात्रता निकषांपैकी पहिला निकष याचा वर्षी जानेवारीत  Sitges Open या स्पर्धेत तर दुसरा पात्रात निकष मार्च महिन्यात Vezerkepso GM Round Robin तर शेवटचा तिसरा पात्रता निकष 55th Biel Chess Festival या स्विझर्लंड या देशात झालेल्या स्पर्धेत जुलै महिन्यात मिळवला होता  बुद्धिबळ खेळात खेळताना आवश्यक असणाऱ्या विविध शक्यता पडताळून बघणे त्यामुळे होणाऱ्या विविध समीकरणबाबत विचार करणे तसेच डावाच्या शेवटी डाव सुरेख पद्धतीने विजयात परिवर्तित करणे यामध्ये प्रणव आनंद यांची हुकूमत आहे असे त्यांच्याबरोबर खेळणाऱ्या खेळाडूंचे त्यांच्याबाबतचे मत आहे

 एकीकडे भारतीय क्रिकेटपटू महत्त्वाच्या स्पर्धेत अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात खराब कामगिरी करत असताना सी फॉर क्रिकेटच्या ऐवजी सी फॉर चेस करणेच  योग्य  असल्याचे या तुन दिसत आहे ज्या खेळाद्वारे आपणास जाहिरातीत काम करायला मिळाले त्या खेळात खराब काम करण्यापेक्षा देशाचे नाव उंचावणाऱ्या बुद्धिबळपटूंना जेव्हा उत्पादक आपल्या उत्पदनासासाठी जाहिरातीत घेतील तोच आपल्या भारतासासाठी महासत्ता होण्याचा दिवस असेल हे नक्की


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?