अखेर श्रीलंकेचे घोडे गंगेत न्हाले

       


    वेगवेगळ्या अडचणींचा समस्येच्या  सामना करत अखेर एखादी गोष्ट पूर्ण झाल्यास त्यास मराठीत  अखेर  घोडे गंगेत न्हाले अशी  मराठी म्हण वापरत्तात . सध्याच्या काळात श्रीलंकेला ही म्हण पूर्णतः लागू पडते .  चर्चेच्या ९ व्या फेरीअखेर १ सप्टेंबर रोजी आंतराष्ट्रीय नाणेनिने  श्रीलंकेला  २ अब्ज ९० लाख अमेरिकी डॉलरची आर्थिक मदत जाहीर केली आहे ही हि आर्थिक मदत एकाच वेळी मिळणार नसून पुढील ४८ महिन्यात टप्प्याटप्याने मिळणार आहे . ही आर्थिक मदत श्रीलंका, आधीचे कर्ज फेडणे,  अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा सुरु करणे , देशाकडील परकीय गांजाजळीत वाढ करणे,  आदी कामासाठी वापरू शकते . असे वक्तव्य श्रीलंकेचे राष्ट्रपती तथा देशाचे अर्थमंत्री रनीला विक्रमसिंघे यांनी या संदर्भात राष्ट्राला संबोधताना केले . ही आर्थिक मदत देताना श्रीलंकेवर देशात आर्थिक आणि राजकीय स्थैर्य कायम राहिले पाहिजे अशी अट आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून लादण्यात आली आहे ही आर्थिक मदत मिळण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी श्रीलंकेच्या संसदेत १० % तुटीचा अर्थसंकल्प देशाचे अर्थमंत्री तथा देशाचे राष्ट्रपती रनीला विक्रमसिंघे यांनी मांडला . अर्थ तज्ज्ञांच्या मते ८ ते ९ % तुटीचा अर्थसंकल्प मांडला जाऊ शकत होता या संभाव्य अद्नाजाच्यापेक्षा थोडासा जास्त तुटीचा अर्थसंकल्प श्रीलंकेच्या संसदेत सादर करण्यात आला आहे  

    या आर्थिक मदतीमुळे देशाच्या स्वातंत्र्यपासून म्हणजेच सप्टेंबर १९४८ पासून आतापर्यंत म्हणजेच ऑगस्ट /सप्टेंबर २०२२ पर्यंत जगात सर्वाधिक वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत घेणाऱ्या श्रीलंकेचा आर्थिक गाडा रुळावर येण्यास मदत होणार आहे . आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडे जगभरातील देश रक्कम जमा करत असतात .. एखाद्या देशाने किती रक्कम आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडे जमा करायची?  ते त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलुबुन असते ज्या  देशाची अर्थव्यवस्था चांगली त्यांनी जास्त रक्कम आंतराष्ट्रीय नाणेनिधीला देयची ज्यां देशाची अर्थव्यवस्था कमकुवत त्यांनी कमी पैसे जमा करायचे असा व्यवहार आहे . विविध देशांकडून देण्यात आलेल्या पॆसातून आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडे पैसा जमा होतो या जमा झालेल्या पैशातून आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून गरजू राष्ट्रांना वित्तपुरवठा करण्यात येतो जो सर्वसाधारणपणे त्या देशाने आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडे जमा करण्यात आलेल्या रक्कमेच्या १४५ % असतो काही अपवादात्मक स्थितीत हा आकडा २४५ % जाऊ शकतो . नुकतीच आंतरराष्टीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला अशी अपवादात्मक मदत पुन्हा सुरु करण्यात आली आहे सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या आधी पंतप्रधान असलेल्या इम्रान खान यांनी अर्थव्यवस्थबाबत घेतलेल्या काही निर्णयामुळे ती बंद करण्यात आली होती . श्रीलंकेची आर्थिक स्थिती भयानक  पातळीवर खालावल्याने अंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून श्रीलंकेला मदत देण्यात आली 

       आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून एखाद्या देशाला मदत करताना विविध अटी घालण्यात येतात अनेकदा या अटी अत्यंत अपमानास्पद असतात .या अटी अंतराष्टीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाकडून घातल्या जातात . हे

कार्यकारी मंडळ आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या सहभागातून तयार होत असते . जगातील सर्वात ताकदवान अर्थव्यवस्था ही  अमेरिकेची असल्याने अंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळात अमेरिकेच्या वरचष्मा असतो अनेकदा गरीब देशांना कर्ज देताना त्यांच्यावर लादण्यात आलेल्या अटी या अमेरिकेचे हित जपणाऱ्या असतात .या अटींच्या धाकामुळेचे श्रीलंकन सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अडचणीच्या सुरवातीच्या काळात अंतराष्ट्रीयन नाणेनिधीच्या ऐवजी भारत , चीन , जपान अश्या मित्र देशांकडे मदतीबाबत प्रयत्न करत होता मात्र या देशांकडून पूरेसे कर्ज सुयोग्य व्याजदरांवर न मिळाल्याने श्रीलंकेला अखेर आंतरराष्टीय नाणेनिधीकडे मदतीबाबत हात पसरावेत लागले . या सर्व उपाय अजमावून बघण्याच्या काळात बराच काळ गेला या काळात श्रीलंकेची आर्थिक स्थिती अजून ढासळयांत झाली आर्थिक स्थिती गंभीर झाल्याने लोकांच्या मनात राजकीय नेत्यांविषयी घृणा निर्माण झाली ज्यामुळे लोकांनी त्या विरोधात आंदोलन केले देशात अंतर्गत यादवी निर्माण होते की काय ? अशी स्थिती निर्माण झाली ज्यामुळे तेथील राष्ट्रपतीला देश सोडावा लागला . 

   सध्या मात्र हा कळ्याकुट्ट इतिहासाचा भाग झाला असून श्रीलंका स्वातंत्र्यापासूनच्या सर्वात भयंकाय विपन्नेतुन बाहेर पडत नवी वाटचाल करण्याच्या मार्गावर प्रवास करत आहे त्याला या संकटाच्या आधी असलेल्या स्थितीवर

पोहोचण्यास किमान आठ ते दहा वर्ष लागतील श्रीलंका पूर्वपदावर येण्यापर्यंत या संकटाची सर्वांना आठवण असेल जसे सध्या कोव्हीड १९ च्या सुरक्षेबाबत आपले झाले आहे मात्र श्रीलंकन सरकारने  मात्र सर्व काही सुरळीत झाल्यावर पुन्हा हे संकट येणार नाही याची काळजी घेण्यातच श्रीलंकेचे आणि जागचे हित आहे 

#ही_माझी_एक_हजार_साठवी_ब्लॉगपोस्ट_आहे 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?