तंत्रज्ञाचा काळा वापर

   


  नव्वदीच्या दशकाच्या आसपास जमलेल्या व्यक्तींना आठवत असेल त्यांना शाळेत निबंधाला एक विषय होता "विज्ञान शाप की वरदान" त्याकाळी निबंधाला असणारा हा विषय सध्या जागतिक बुद्धिबळ विश्वात पुन्हा एकदा विचारला जातोयसमस्त बुद्धिबळविश्व यामुळे मुळातून हादरले आहे. ज्याचा मुळाशी आहे  ग्रँडमास्टर हान्स हंस मोके निमन आणि वेळेचे  विश्वविजेते जे सध्या सुद्धा विश्वविजेते आहेत अस्या  ग्रँण्डमास्टर मॅग्नस कार्लसन यांच्यात नुकताच झालेला सामानाज्युलियस बेअर जनरेशन कप मध्ये  ग्रँडमास्टर हान्स हंस मोके निमन आणि  विश्वविजेते मॅग्नस कार्लसन  यांच्यात झालेला सामना मागास कार्लसन यांनी अवघी एक चाल खेळून सोडून दिल्याने  तंत्रज्ञाचा काळ्या वापराचा मुद्दा  पुन्हा एकदा चर्चीला जात आहे. एकाच महिन्यात दोनदा असी घटना घडल्याने समस्त बुद्धीबळ विश्व कुंठीत झाले आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस सारखेच खेळाडू होते. मँगन्स यांनी खेळ एक चाल खेळून सोडण्यामागे प्रतिस्पर्ध्याने खेळत असताना तंत्रज्ञानाचे साह्य घेत खिलाडीवृत्तीस तिलांजली दिल्याचे कारण सांगण्यात येत आहे. मँगन्स यांनी हा लेख लिहण्यापर्यत याबाबत अधिकृतपणे काहीही जाहिर वक्तव्य केलेले नाहीये.मात्र त्यांच्या देहबोलीवरुन प्रतिस्पर्ध्याने गैर मार्गाचा अवलंब करत खेळल्याने ते खेळ सोडत आहेत, असे यातील तज्ज्ञ व्यक्तींचे मत आहे.

        तसे बघायला गेल तर ,सध्याचा बुद्धीबळपटुंना काँम्पुटर आणि कृत्रिम बुद्धीमतेचा त्याची खेळाची तयारी करताना खुप फायदा होत आहे. मानवी बुद्धीला सहजतेने सुचणार नाही,अस्या बुद्धीबळातील गुंतागुतीचा अभ्यास बुद्धीबळपटूंना कृत्रिम बुद्धीमतेमुळे विनात्रास करता येतो.ज्यांचा त्यांना प्रत्यक्ष खेळात फायदा होतो. सरावा दरम्यान जरी अत्याधुनिक उपकरणे वापरण्यास मज्जाव नसला तरी बुद्धीबळपटुने खेळताना त्याचा वापर न करता स्वतःच्या मेंदूचाच वापर करणे सर्वमान्य आहे, मात्र सनसनाटी विजय मिळवण्यासाठी बुद्धीबळपटुंकडून चौरट्या मार्गाने अत्याधुनिक उपकरणांचा अवलंब करत असल्याने मुळ हेतूलाच हरताळ फासला जातोय.तसे आता बुद्धीबळ स्पर्धेच्या ठिकाणी आधुनिक घड्याळे ,मोबाईल आदी इलेक्ट्रीक उपकरणे वापरण्यास पुर्णतः मज्जाव असतो.मात्र तरीदेखील चोरट्या मार्गाने बुद्धीबळपटूंंकडून त्याचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे बुद्धीबळक्षेत्रात नैत्तिकतेचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. बुद्धीबळपटूंकडून अनैतिक मार्गाने आधुनिक उपकरणांचा वापर केल्याचे या आधी देखील अनेकदा सिद्ध झाले आहे. मात्र असे असुन देखील बुद्धीबळाची आंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन  इंटरनँशनल आँफ डि इचेस अर्थात फिडे या गैर प्रकाराला आळा घालण्यात कमी पडत आहे

       आतापर्यंत झालेल्या विविध सामन्यांद्वारे ही गोष्ट सिद्ध होत आहे की, विश्वविजेत्यांच्या बुद्धीपेक्षा कृत्रिम बुद्धीमता अधिक सरस आहे. अनेक विश्वविजेत्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेने पराभव बघायला लावला आहे. आँनलाइन स्पर्धेत कितीही काळजी घेण्यात आली तरी गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेवून  बुद्धीबळाची आंतरराष्ट्रीय संघटना  फिडरेशन इंटरनँशनल आफ डि इचेस अर्थात फिडेकडून आँनलाइन स्पर्धेतील यशापशाच्या विचार बुद्धीबळपटुंची कामगिरी ठरवताना करण्यात येत नाही.

       सप्टेंबर महिन्यात झालेल्या या दोन गैरप्रकाराबाबत विश्वविजेते मँगन्स कार्लसन्स यांनी हा लेख लिहण्यापर्यत काहीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या मौनामुळे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. जर त्यांचा प्रतिस्पर्धी गैर मार्गाचा अवलंब करत असेल तर त्यांनी त्याबाबत आपले म्हणणे जगासमोर मांडायला हवे,अस्या प्रतिक्रिया बुद्धीबळविश्वातून उमटत आहे. कदाचित मँगन्स यांच्याकडे याबाबत ठोस पुरावे नसल्याना ते शांत बसले

असावेत, असी शक्यता याबाबत बुद्धीबळविश्वातून व्यक्त होत आहे. ही घटना ज्या खेळाडूबाबत घडली ,त्या विश्वविजेते मँग्नस कार्लसन यांनी याबाबत काहीच भाष्य न केल्याने याविषयी बुद्धीबळ विश्वात विविध प्रतिक्रीयांचा पुर आला आहे. ज्यामुळे बुद्धीबळविश्व पुर्णतः ढवळून निघत आहे. सध्या बुद्धीबळ विश्वात असणारी अशांतता पुढे भविष्यात शांत देखील होईल,मात्र यामुळे बुद्धीबळविश्वावर उमटलेला अविश्वासाचा तडा बुजणे निव्वळ अशक्यच. यापुढे एखादा सनसनाटी वाटणारा विजय खरा असला तरी त्यापुढे संशयाचे धुके मात्र असणारच.त्यामुळे हा काळा डाग घेवूनच बुद्धीबळपटुंना आपली वाटचाल करावी, लागणार आहे, हे सुर्यप्रकाश्याइतके स्वच्छ आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?