संत नामदेव आणि साइबाबा यांच्या वास्तव्याने पुनित झालेले जिल्हे हिंगोली आणि परभणी

 


आपल्या महाराष्ट्रातील काहीसा अविकसीत समजल्या जाणारा मराठवाडा मात्र अध्यात्मिक क्षेत्रात मात्र महाराष्ट्राच्या अन्य भागापेक्षा खुपच जास्त श्रीमंत आहे. आख्या भारतात असणाऱ्या 12 ज्योतीलिंगापैकी 3 ज्योर्तीलिंगे, देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी 2पुर्ण पीठे, संत ज्ञानेश्वर , संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई, संत नामदेव साईबाबा, संत रामदास स्वामी अस्या अनेक संताची जन्मभुमी , गणेश पुराणात सांगितलेल्या गणपतींच्या साडेतीन पीठांपैकी एक पुर्ण पीठ राजूर, इस्लाममधील भक्ती चळवळ म्हणता येईल असी सुफी चळवळीत महत्तावाचे स्थान असणारे दर्गे मोठ्या संख्येने असणारा प्रदेश म्हणजे मराठवाडा, शिख बांधवांच्या पवित्र पाच स्थानांपैकी एक असणारे नांदेड देखील मराठवाड्यातच येते.याच मराठवाड्यातील साईबाबांच्या जन्माने आणि संत नामदेव महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला मी नुकतीच भेट दिली त्यावेळी मला आलेले अनुभव आपणास सांगण्यासाठी आजचा लेखन प्रपंच .

तर मित्रांनो आपण अनेकदा विविध देशात फिरायलो जातो मात्र अनेकदा आपल्याला आपल्याच राज्यातील अनेक पर्यटनस्थळे माहिती नसतात.माझ्या बाबतीत असे होवू नये म्हणुन मी माझ्या आँफिसच्या सुट्टीच्या दिवशी एसटी बसेसच्या मार्फत विविध जिल्ह्यात फिरायला जातो.सुट्टीच्या आदल्या दिवशी आँफिस सुटल्यावर मी घरी येवून ताजेतवाने होवून बसस्टँडवर जातो आणि बस प्रवास सुरु करतो.सायंकाळी रात्री प्रवास करत सुट्टीच्या दिवशी तो जिल्हा बघत सुट्टीच्याच दिवशी सायंकाळी परत माघारी फिरत दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर हजर होयचे हा माझा शिरस्ता आहे. या सहलीमध्ये मी आतापर्यंत पुणे ,सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, धूळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर औरंगाबाद, जालना ,बीड, या महाराष्ट्रातील भागांसह सोनगढ, सुरत नवसारी ,भरुच, बडोदा, वलसाड, या भागात फिरलो आहे. त्याच मालिकेत मी परभणी आणि हिंगोली या जिल्हांना भेट दिल्या. 

परभणी  आणि हिंगोली या जिल्ह्यात मी कोणत्या पर्यटनस्थळांना भेटी दिल्या, त्याची माहिती देण्यापेक्षा मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे, मला प्रवाश्यात जाणवलेल्या बाबींवर .मला परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात फिरताना मी भेट दिलेल्या अन्य मराठवाड्यातील जिल्हांप्रमाणेच(औरंगाबाद, जालना ,बीड) याही भागातील रस्ते उत्तमच आहेत.मात्र औरंगाबाद जिल्ह्यात जसे वैजापूर ते औरंगाबाद ,आणि कन्नड घाट परीसर असे काहीसे त्रासदायक रस्ते आहेत ,असे रस्ते परभणी जिल्ह्यात संख्येने जास्त आहेत. मी संख्येने म्हणतोय हे लक्षात घ्या किलोमीटरने नाही. म्हणजे अस्या खराब रस्त्यांची संख्या जर औरंगाबाद जालना,बीड या जिल्ह्यात दोन ते तीन असेल तर परभणी जिल्ह्यात ती संख्या तीन ते चार आहे, मात्र किलोमीटरचा विचार करता औरंगाबाद जिल्ह्यापेक्षा परभणी जिल्ह्यातील रस्ते कमी खराब आहेत असे माझे निरीक्षण आहे. मला परभणी जिल्हयात फिरताना परभणी शहरात आणि मानवत परीसरात रेल्वेचे दर्शन झाले आज सप्टेंबर 2022सालीसुद्धा मराठवाड्यात डिझेलवर चालणारी सिंगल लाइनची रेल्वेसेवा आहे. एकिकडे देशात बुलेट ट्रेन,हाय स्पिड रेल्वे उभारण्याचे नियोजन चालू असताना देशाच्या मध्यावर असणाऱ्या एका प्रदेशात रेल्वेची असी व्यवस्था असणे योग्य नाही असे मला वाटते.मराठवाड्यात रेल्वची स्थिती बदलण्याची मोठी गरज आहे. 

मी लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यात प्रचंड अध्यात्मिक ताकद आहे. या सर्व धार्मिक स्थळांचा म्हणावा तितका विकास झालेला नाही, असे मला औरंगाबाद, जालना बीड परभणी ,हिंगोली जिल्ह्यात फिरताना जाणवले.समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ असणारे जांब समर्थ, गणपतीचे जागृत स्थान असणारे राजूर, संत नामदेव यांचे जन्मगाव असणारे नरसी नामदेव हीत्याची काही प्रातनिधीक उदाहरणे म्हणता येईल.मी या स्थळांच्या जवळच्या गावात जावून या स्थळांवर जाण्यासाठी चौकशी केली असता, तेथील ग्रामस्थांनाच याची माहिती नव्हती.हे चित्र बदलायाच हवे.मराठवाड्याचा औद्योगिक विकासाबाबत सातत्याने बोलले जाते.मात्र या विकासाबरोबरच मराठवाड्याचा या अध्यात्मिक ताकदीच्या विकासाबाबत देखील बोलले पाहिजे. परभणी शहरातील दर्गा सुप्रसिद्ध आहे. मात्र या ठिकाणी जाणारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.तीच गोष्ट बीडच्या दर्गा परीसरात मोठ्याप्रमाणात अस्वच्छता दिसली, हे चित्र बदलायलाच हवे. या धार्मिक स्थळांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.      

 आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट आहे. ज्यामध्ये त्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती दिलेली असते.मी आतापर्यतच्या भेटीत याच माहितीच्या आधारे पर्यटनस्थळांना भेटी दिल्या आहेत. परभणी जिल्ह्याचा वेबसाईटवर ही माहिती सहज दिसेल सापडेल अस्या पद्धतीने देण्यात आलेली नाही. एखादे भिंग घेवून रस्त्यावर सुइ शोधावी असे प्रयत्न केल्यावर परभणी जिल्ह्याचा वेबसाईटवर मला ही माहिती दिसली.मराठवाड्यासारखा औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागात जर काही कारणाने औद्योगिकीकरण वाढत नसेल तर पर्यटनाला चालना देण्याचे ठरवले तर ही गोष्ट त्रासदायक ठरु शकते.किमान मराठवाड्यासाठी तरी ही गोष्ट सुधारण्याची गरज आहे. असे मला वाटते 

.मी रस्ते मार्गात फिरताना आसपास शेती बघीतली ज्यामध्ये मुख्यतः भाजीपाल्याची पिकेच जास्त दिसली द्राक्ष नाही पण अन्य वेलीवर्गीय पिके देखील दिसली नाहीत. प्रवाश्मादरम्यान बोलताना परभणी जिल्ह्यात एका तालूक्यात 3साखर कारखाने असून 4थ्या साखर कारखन्याचे काम सुरू असल्याचे समजले पण मला उस देखील दिसला नाही. यात सुधारणा होणे आवश्यक किमान ज्याठिकाणी कृषी विद्यापीठ आहे त्या ठिकाणी मलाअसी स्थिती अपेक्षीत नव्हती

मात्र सर्वच चित्र त्रासदायक नाही. परभणी बसस्थानकाचे बांधकाम होत आहे. ही गोष्ट फारच उत्तम आहे. जूनी झालेली ,पुरेसी सोइसवलती नसलेली इमारत पाडून नवीन इमारत होत असल्याने या गोष्टीबाबत परभणीकरांचे कौतूकच करायला हवे.जिंतूर ,मानवत, पथारी, हिंगोली, सिडको औरंगाबाद बसस्टँड  ही बसस्थानके देखील मोठ्या प्रमाणात स्वच्छ होती. तसेच या बसस्थानकात क्रांकिटीकरण केले नसुन देखील खड्ड्यांचे प्रमाण अत्यंत तूरळक होते त्याबद्दल एसटी महामंडळाचे कौतूक करायलाच हवे.माझ्यामते या बसस्थानकात जवळपासच्या पर्यटन ,धार्मिक स्थळांची माहिती देणारी पोस्टर लावल्यास सोन्याहुन पिवळ

मी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील जैन समाजबांधवांचे मंदिर, साइबाबांचे मुळ गाव असलेले पाथरी येथील मंदिर, पाथरी तेथून 20किमीवर असलेल्या मुदगेश्वराचे मंदिर, परभणीतील दर्गा, तसेच सुप्रसिद्ध मृत्युंजय परदेश्वराचे मंदिर ,8वे ज्योर्तिलिंग औंढा नागनाथ, संत नामदेवांचे मुळ स्थान असलेले नरसी नामदेव (नरसी नामदेव या गावाचे नाव नर्सी नामदेव असे देखील लिहतात) हिंगोलीतील गणपती मंदिर बघीतले.यात मला सर्वात भावलेले, आवडलेले स्थळ बघायला गेल्यास औंढा नागनाथ, आणि नरसी नामदेव या शहरात असणाऱ्या मंदिराच्या उल्लेख करायलाच हवा.नरसी नामदेव यांचा मंदिराचा जिर्णोधार झाला असून नवीन मंदिर खुपच उत्तम आहे.  नरसी नामदेव वर्दळीच्या  रस्त्यावर नसून देखील हिंगोली शहरातून या ठिकाणी सहजतेने पोहचता येते. खुप उत्तम वाहतूक

व्यवस्था आहे .जर तूम्ही स्वतः च्या गाडीतून येणार असेल तर औंढा नागनाथ गावातून हिंगोली शहरात येताना हिंगोली शहराच्या सुरवातीलाच नरसी नामदेव या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता आहे. रस्त्यावर नामनिर्देशन करणारा फलक सुद्धा आहे.साइबांबाचे मुळ गाव असणाऱ्या पाथरी गावातील मंदिरात भक्तनिवासाची सोय करण्यात आलेली आहे. जिथे प्रसादाची सोय देखील आहे. जालना जिल्ह्यातील एका प्रसिद्ध धार्मिकस्थळी खाण्याचे हाल होतात, त्या पार्श्वभूमीवर आपण याकडे बघायला हवे. परभणी शहरातून या गावात येण्यासाठी एसटीबसेसची चांगली सोय आहे.पाथरी हे शेवटचे ठिकाण असणाऱ्या बसेससह बीड परभणी मार्गावर धावणाऱ्या बसेसची संख्या खुप आहे. त्यामुळे पाथरीत येण्यास काही अडचण नाही.औरंगाबाद येथून हिंगोलीकडे जाताना जिंतूर हे गाव लागते जेथील जैन मंदिर प्रसिद्ध आहे. जिंतूरहुन एक फाटा परभणी शहरात येतो दुसरा औंढा नागनाथकडे जातो.औंढा नागनाथवरून हिंगोली हे जिल्हा मुख्यालय फारसे लांब नाही. परभणी ते जिंतूर एसटीबससेवा देखील उत्तम आहे. मग बघणार ही मराठवाड्यातील धार्मिक स्थळे.!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?