पाकिस्तानात मोठ्या राजकीय भुकंपाची शक्यता?

     

रविवार 25 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधान निवासातील संभाषण डार्क वेबवर उघड झाले ,ज्यामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. 8 जिबीच्या या आँडियो क्लिपमध्ये अनेक महत्तपुर्ण बाबी आहेत,  ज्यामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी विविध शासकीय अधिकारी, राजकीय नेते,  दुसऱ्या देशाचे पंतप्रधान, राष्टपती, नातेवाईक, या नातेवाइकांचे नातेवाईक या सर्वांशी बोललेले रेकाँर्ड झाले आहे. या रेकाँर्डमध्ये पाकिस्तानी निवडणूक आयुक्तांना स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी देण्यात येणाऱ्या सुचना, स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी  भारताकडून आयात करण्याचा गोष्टींंबाबत केलेली चर्चा{ लोकांशी  बोलताना हेच पंतप्रधान काश्मीरचा प्रश्न सुटेपर्यंत भारताशी व्यापार अवघड असल्याचे सांगतात} ,पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना त्रास व्हावा यासाठी कोणकोणत्या खेळी करता येतील, मिडीयाला कसे मँनेज करायचे? देशात वादंग निर्माण करुन पेट्रोल आणि डिझेलचे भाव अजून कसे वाढवता येईल? याबाबत केलेली चर्चा यासारख्या चर्चा समाविष्ट आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या आँडियो क्लिपमधील आवाज स्वतः च्या असल्याचे मान्य केल्याने ,तसेच यात नातेवाईकांना राजकीय वजन वापरत करण्यात येणाऱ्या मदतीबाबबतचे संभाषण योग्य असल्याचे समर्थन केल्याने येत्या काही दिवसात पाकिस्तानात मोठा राजकीय भुकंप होणार हे सुर्यप्रकाश्याइतके स्पष्ट आहे. 
       पंतप्रधानाच्या घरातील संभाषण डार्क नेटवर आल्याने पंतप्रधानाच्या घराच्या सुरक्षेचा प्रश्न देखील पाकिस्तानात किती निष्काळजीपणे हातळला जातो ,हेही जगासमोर आले आहे. पाकिस्तानी संविधानानुसार पंतप्रधान आणि उच्च
पदस्थ यांच्या घराची सुरक्षा ज्या यंत्रणेकडे आहे, ती पंतप्रधानांंना उत्तरदायित्व आहे, आणि पंतप्रधानांच्याच घरातील संभाषण डार्कनेटवर आल्याने पाकिस्तानात सुरक्षेचा प्रश्न चर्चिला जातोय. पाकिस्तानच्या राष्टपतींनी देखील आपल्या घरातील संभाषण देखील रेकाँर्ड तर झाले नाही ना ? असी भिती वाटत असल्याचे एका न्युजचँनेलवरील मुलाखतीत सांगितल्याने या घटनेचा परीणाम पाकिस्तानात किती खोलवर झाला आहे, हे दिसून येत आहे.
      या घडामोडींमुळे पाकिस्तानात आता लष्कर सत्ता हातात घेईल, असे बोलले जात आहे. मात्र डाँन या पाकिस्तानातील महत्त्वाचा वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनूसार पाकिस्तानातील जनमत आता लष्कराने सत्ता सांभळावी या मताचे नाही. लोकांना आता मतदानाद्वारे आपले सरकार निवडायचे आहे. तसेच पाकिस्तानात पुर्णतः राजकीय शासनव्यवस्था मोडकळी, आल्यावरच लष्कराने सत्ता सांभाळण्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे. सध्या असी स्थिती नाहीये, आताची पाकिस्तानची स्थिती देशात निवडणूका झाल्यास अमुलाग्र बदलू शकते, तर पाकिस्तानात लवकरात लवकर निवडणूका घेण्यात याव्यात.तोच सध्याच्या प्रश्न सोडवण्याचा मार्ग  आहे, असे डाँनच्या बातमीत सांगण्यात आले आहे.
 पाकिस्तानचे प्रमुख विरोधीपक्ष नेते इम्रान खान यांची सुद्धा हीच मागणी आहे. आपली ही ही  मागणी नागरीकांपर्यत पोहचवून यासाठी जनतेचे समर्थन मिळण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर ए पख्तूनवा (वायव्य सरहद्द प्रांत) या प्रांतात विविध शहरात त्यांनी राजकीय सभा घेतल्यानंतर आता आपला मोर्चा  विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे नेला आहे  .याची सुरवात पाकिस्तानात अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या "लाहोर गर्व्हमेंट युनिव्हर्सिटी" या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सबोधित करुन केली सुद्धा आहे. या आधी पाकिस्तानच्या राष्टपतींनी देखील याचा आधी एका न्युजचँनेलला दिलेल्या इंटरव्ह्युमध्ये पाकिस्तानात नँशनल अस्बेंली ( आपल्या लोकसभा सदृश्य) च्या निवडणूका घेण्याबाबत अनुकुलता दाखवली होती,हेआपण लक्षात घेयला हवे. 
   भारताबरोबर पाकिस्तानची मोठी सिमा आहे.पाकिस्तानची मोठी शहरे भारतीय सिमेपासून जवळच आहेत.पाकिस्तानच्या शेजारील देशाचा विचार करता, त्यांंना अफगाणिस्तान, इराण या देशापेक्षा भारत सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्थेचा विचार करता अधिक जवळचा आहे.त्यामुळे तिथे राजकीय अस्थिरतेमुळे यादवी सारखी स्थिती निर्माण झाल्यास तेथील जनता अफगाणिस्तान ,इराणपेक्षा भारतातच आश्रयाला येणार हे सुर्यप्रकाश्याइतके स्पष्ट आहे. पाकिस्तानात जेव्हा लष्कर सत्ता ताब्यात घेते त्यावेळी भारताबरोबरचे त्यांचे सबंध काहीसे बिघडतात, असा इतिहास आहे. या सर्व बाबींचा विचार करता आपणासाठी सुद्धा या घडामोडी महत्तवाच्या ठरतात. पाकिस्तान अणवस्त्र सज्ज देश असल्याने तिथे राजकीय कारणांमुळे यादवी सारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे ही अणवस्त्रे अयोग्य हातात पडल्यास होणारा परीणाम महाविनाशच असेल त्यामुळे पाकिस्तानात शांतता होण्यातच भारताचे हित आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?