छोटे ग्रँडमास्टर

   


   सध्या भारतीय ग्रँडमास्टर मोठं मोठ्या स्पर्धा अत्यंत सहजतेने [आपल्या खिश्यात घालत आहेत . तसेच भारतातील ग्रँडमास्टरची संख्या झपाट्याने वाढत आहे गेल्या दोन महिन्यात भारताला दोन नवे ग्रँडमास्टर सुद्धा मिळाले . वरिष्ठ गटातील खेळाडूंचे हे यश बघून लहान गटातील बुद्धिबळ खेळाडूंना देखील स्फुरण चढलं आणि त्यांनी देखील मोठ्या गटातील खेळाडू जिंकू शकतात तर आम्ही तरी का मागे राहायचं असा चंग  बांधला आणि त्यांनी तो खरा देखील करून दाखवला आहे 

             बुधवार २८ सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री दहाच्या सुमारास  चार्वी अनिलकुमार आणि शुभी गुप्ता अनुक्रमे 8 वर्षांखालील मुली आणि 12 वर्षांखालील मुलींच्या गटात जागतिक विजेतेपद मिळवून लहान  भारतीय बुद्धिबळपटू सुद्धा काही कमी नाहीत हे सिद्ध केले   या दोघांनीही भारतासाठी प्रत्येकी एक सुवर्णपदक प्राप्त केलंय  . चार्वी यांनी ११ सामन्यात साडेनऊ गुण मिळवत  शुभीयांनी  ११ सामन्यात साडेआठ गुण मिळवत  सुवर्णपदकास गवसणी घातली . सामना जिंकल्यास गुण सामना बरोबरीत सुटल्यास अर्धा गुणांची कमाई असे स्पर्धेचे स्वरूप होते हे लक्षात घेतल्यास या विजयाचा अर्थ समजतो , दोघीनींही  टायब्रेकवर इतर प्रतिस्पर्ध्यांना

मागे टाकून इतिहासात आपले नाव कोरलेआहे मुलांचा विचार करता . साफिन सफारुल्लाखान यांनी - वर्षाखालील खुल्या गटात  कांस्यपदक जिंकले आहे , त्यांनी ११ डावाच्या स्पर्धेत गुण प्राप्त केले . . एका आठवड्यापूर्वी प्रणव आनंद आणि इलमपर्थी यांनी अनुक्रमे जागतिक युवा स्पर्धेत १६ वर्षाखालील  आणि १४ वर्षाखालील खुल्या गटात  प्रत्येकी एक सुवर्णपदक  जिंकल्यानंतर भारताने त्याच महिन्यात आणखी दोन सुवर्ण जिंकले. अशा प्रकारे, भारताकडे आता  वर्षांखालील आणि १८वर्षांखालील वयोगटातील सर्वाधिक सुवर्णपदके आहेत. एका अर्थाने भारतासासाठी हे बुद्धिबळाचे सुवर्ण युगच म्हणता येईल .

         सी फॉर क्रिकेट म्हणणाऱ्या लोकांना हि सणसणीत चपराकच म्हणायला हवी  क्रिकेट हा खेळ जगभरात हाताच्या एका बोटावर मोजता येईल इतक्याच देशात खेळला जातो मात्र त्याचे आपल्याकडे अत्यंत कौतुक केले जाते मुळात क्रिकेट हा खेळ आपला नाहीच भारताची संपत्ती लुटून आपल्या देशात नेणाऱ्या ब्रिटिशांचा हा खेळ मात्र आपणास दुर्दैवाने त्याचेच कौतुक एका अर्थाने हि गुलामीचीच लक्षणे अभिमानाने मिरवण्याचा प्रकार . याउलट बुद्धिबळाचे पूर्णतः भारतीय मातीतिल भारतीयांनी शोधलेला हा खेळ सिलिकॉन व्हॅलीत सर्वात बुद्धिमान समजले जाणारे भारतीय फक्त आताच्याच काळात बौद्धिकदृष्ट्या श्रीमंत नाहीत तर पूर्वीपासून आपण भारतीय बुद्धीच्या क्षेत्रात वरचढ होतो हे सिद्ध करणारा खेळ म्हणजे बुद्धिबळ . अस्सल भारतीय

असणाऱ्या या खेळावर अनेक वर्ष रशियाचे आणि अमेरिकेचे राज्य होते ते नाहीसे करत आपल्या मातीतील खेळात भारत आता आपले अढळ स्थान प्राप्त करत आहेत एका अर्थाने भारत पुन्हा एकदा जगतगुरु पदावर पोहचत आहे याचीच ही नांदी आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?