वंदन महान समाजसुधारकाला


1932 सप्टेंबर 29 ही फक्त एक तारीख नाहीये.ही तारीख आहे, आज 2022 साली सुद्धा ज्या समाजात कट्टरतेचा प्रचंड विळखा आहे, ज्या समाजातील कट्टरतेविषयी कर्नाटक, केरळ या भारतातील राज्याबरोबर इराण सारख्या देशातून सुद्धा बातम्या येत असतात, अस्या इस्लामधर्मातील जे एका हाताच्या बोटावर मोजता येतील अस्या समाज सुधारकांपैकी एक आहेत असे ज्येष्ठ समाजसुधारक हमीद दलवाई यांची जन्मतारीख .आज 2022साली त्यांची 90वी जयंती. या निमित्ताने त्यांना भावपुर्ण आदरांजली.

1932 सप्टेंबर 29 ते 1979 मे 3 हा त्यांचा कालखंड .त्यांचे निधन 1979साली झाले लक्षात घेता त्यांनी किती कठीण काळात इस्लाम धर्मियांमध्ये सुधारणेसाठी प्रयत्न केले हे लक्षात येते.आज 2022साली विविध ठिकाणी पोशाखावरुन होणाऱ्या आंदोलनाच्या बातम्या विचारात घेता ,आजपासून सुमारे 50 वर्षापूर्वी स्थिती किती भयावह असेल याची कल्पनाच केलेली बरी.अस्या काळात ही व्यक्ती समाज सुधारणेसाठी झटत होती. राष्ट्र सेवा दल या संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी झटत होता.महिलांच्या प्रश्नांबाबत जनजागृती करत होती समाजातील अंधश्रद्धेवर आसूड ओढत होती समाजाला आधुनिक मुल्ये शिकवण्याचा प्रयत्न करत होती. सध्याच्या काळात उत्तर भारतातील वसिम रिझवी यांनी कुराणाच्या बाबतीत काही सुधारणा करण्याचा नुसता उल्लेख केला तरी ,त्यांना

किती त्रास झाला, याच्या बातम्या आपण मिडीयात बघीतल्या देखील आहेत, ते बघता त्यांना झालेल्या त्रासाची आपण नुसतीच कल्पनाच करु शकतो. हमीद दलवाई यांनी ज्या काळात समाजसुधारणेसाठी कार्य केले त्यावेळी प्रसारमाध्यमे फारशी विकसीत नव्हती, जीता अधिक विकसीत आहेत, त्यामुळे मेसेज लवकर पसरतो, त्यामुळे विरोधाचा मेसेज लवकर पसरल्याने वसीम रिझवी यांना अधिक विरोध झाला असे मानले तरी या 40 वर्षात मुस्लिम समाजबांधवांमध्ये काही प्रमाणात समाजसुधारणा झाल्याच असतील ना?  त्यामुळे विरोध कमी होयला हवा ना?असे असताना जर इतका विरोध होत असेल?तर तेव्हा काय विरोध.होत असेल?याची कल्पनाच केलेली बरी              दुर्दैवाने मुत्राशयाच्या विकारामुळे किडनी फेल होवुन वयाच्या 46 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. जर त्यांना समाजसुधारणेस अजून काही काळ मिळाला असता तर मुस्लिम समाजबांधवांचे आज दिसते त्यापेक्षा उत्तम चित्र दिसले असते, हे सुर्यप्रकाश्याइतके स्पष्ट आहे. आज हमीद दलवाई यांच्या 90व्या जयंती निमित्ताने ती जाणिव अधिक स्पष्टपणे जाणवते आहे. त्यांचे कार्य त्यांचा विचारासी साम्य असणाऱ्या व्यक्तींनी पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल हेच खरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?