हवामान बदलाचे अचर्चित परिणाम


सध्या आपण सर्वच जण हवामान  बदलाच्या संकटाला सामोरे जात आहोत  या हवामान बदलाचे अनेक परिणाम होत आहेत काही  परिणामांची चर्चा होते मात्र काही परिणाम अचर्चितच राहतात अश्याच हवामान बदलामुळे अचर्चित राहणारा परिणाम म्हणजे हवामान बदलामुळे पृथ्वीवरून खगोलाचे निरीक्षण करताना येणाऱ्या अडचणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन संपणाऱ्या अवकाशाचे निरीक्षण कारण्यासासाठी वापरण्यात येणाऱ्या   महाकाय दुर्बिणी काळजीपूर्वक निवडलेल्या ठिकाणी बांधल्या जातातधुके, ढगांचा पाऊस इत्यादी सामान्य हवामानामुळे दुर्बिणीच्या कामात अडथळा येऊ नये. म्हणून अशा महाकाय दुर्बिणी दुर्गम ठिकाणी, डोंगरावर किंवा वाळवंटात बसवल्या जातात. पण आता दुर्बिणीसाठी जागा निवडताना घेतलेली काळजी देखील कामात अडथळा येणार नाही याची खात्री करण्यासाठी पुरेशी ठरणार नाही. या दुर्बिणीचा वापर करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी हवामान बदलामुळे समस्या निर्माण होऊ शकतात, असे एका अभ्यासात दिसून आले आहे बर्न विद्यापीठ आणि नॅशनल सेंटर ऑफ कॉम्पिटन्स इन रिसर्च (NCCR) मधील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

             "जरी दुर्बिणींचे आयुष्य सामान्यत: अनेक दशके असले तरी तरीही दुर्बिणीसाठी जागा निवडण्यासाठी  केवळ कमी कालावधीतील वातावरणातील परिस्थितीचा विचार केला जातो .सध्या कार्यरत असणाऱ्या खगोलशास्त्रीय वेधशाळा सध्याच्या  परिस्थितीत काम करण्यासाठी तयार  केल्या आहेत आणि त्याच्यात बदल

करता येऊ शकण्याची अत्यंत कमी   शक्यता आहे त्यामुळे  हवामानाच्या  संभाव्य परिस्थितीमध्ये खगोल शास्त्रज्ञानं  अवकाश निरीक्षममध्ये अनेक अडचणीच्या सामना करावा लागू शकतो या  परिणामांमध्ये दवबिंदू वाढल्यामुळे किंवा कूलिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे  ज्यामुळे दुर्बिणीच्या घुमटात अधिक वायु जमा होण्याच्या अडचणी प्रामुख्याने येऊ शकतात 

    आता पृथीच्या वातावरणाच्या बाहेर दुर्बिणी उभारल्या जात असल्या तरी त्यांच्या खर्च मोठा असतो या दुर्बिणीच्या तुलनेत पृथ्वीवरील दुर्बिणी अर्ध्यापेक्ष्या कमी किमतीत  उभारल्या जातात मात्र हवामान बदलामुळे आता त्यांना अडचणींचा सामान करावा लागत आहे हवामान बदलामुळे होणारे अदृश्य परिणाम त्यामुळेच अत्यंत महत्त्वाचे ठरतात 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?