पाकिस्तानचे राजकारण नव्या वळणावर

       


  सध्या आपल्या भारतीय माध्यमांमध्ये पाकिस्तानमधील पुराविषयीचा विविध बातम्या येत आहेत . या बातम्यता दाखवण्यता येणाऱ्या छायाचित्र आणि  व्हिडिओमधूनतेथील दाहकता स्पष्ट होत आहे मात्र पाकिस्तानात १/३ भाग पाण्याखाली असताना तेथील राजकारण मात्र  एका नव्या वळणावर असल्याचे विविध आंतराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या बातम्यातून स्पष्ट होत आहे .  ज्या भागाला पुराचा फटका बसलेला नाही अश्या गुजरानवाला , गुजराथ , सरगोडा आदी शहरात पाकिस्तानचे  माजी पंतप्रधान आणि केंद्रीय सत्तेचा विचार करता  प्रमुख विरोध पक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी क्रिकेटपटू  इम्रान खान यांच्या लाखोंच्या राजकीय सभा होत आहेत त्यांची प्रमुख मागणी सध्याची नॅशनल असेम्ब्ली (आपल्या लोकसभा सदृश्य सभागृह ) रद्द करून पुंर्णतः नव्याने निवडणुका घेण्याची आहे नुकत्याच गुजरानवाला या शहरात झालेल्या राजकीय सभेत त्यांनी सत्ताधिकाऱ्यानी आमचा अंत बघू नका निवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावा .जर निवडणुका लवकर घेण्यात आल्या नाहीत तर आम्हाला इस्लामाबाद या पाकिस्टनच्या राजधानीत यावे लागेल आम्ही इस्लामाबादला आल्यावर
जर काही अनुचित घडले तर त्यास फक्त सत्ताधिकारीच जवाबदार असतील असा इशारा दिला आहे .   ज्यामुळे पाकिस्तानमध्ये येत्या काही दिवसात फार मोठ्या प्रमाणत राजकीय घडामोडी घडणार आहेत हे दिसून येत आहे 

            इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव तेथील संसदेत संमत झाल्यावर इइम्रान खान यांच्या तेहरीके इन्साफ या पक्षाच्या खासदारांनी राजीनामे दिले मात्र आपल्या लोकसभा सदृश असलेल्या त्यांच्या नॅशनल असेंमबली च्या अध्यक्षाने ते सर्व राजींमामे एकाच वेळी मंजूर करण्याच्या ऐवजी टप्याटप्याने  करण्याचे धोरण स्वीकारले .जेथील खासदारांचे  राजीनामे मान्य करण्यात आले आहे  तेथील निवडणुका पाकिस्तानी निवडणूक  आयोग घेत आहेत त्यानुसार येत्या २५ सप्टेंबर रोजी नऊ मतदार संघात निवडणुका होत आहे या नऊ मतदारसंघात पाकिस्तानी तेहरीके इन्साफ पक्षातर्फे इम्रान खान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत . ज्याठिकाणी या निवडणुका होणार आहेत त्या ठिकणी पुरामुळे काहीही नुकसान झालेले नाही त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवाड्यत जहरी झाल्याप्रमाणे तिथे निवडणूक घेण्यात याव्यात अशी मागणी पाकिस्तान तेहरीके इन्साफ या  पक्षाकडून करण्यात येत आहे तर सत्ताधिकारी विविध करणे दाखवत निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे . सत्ताधिकारी पक्षाला आपला पराभव समोर दिसत असल्याने ते निवडणुका पुढे ढकलत असल्याचे इम्रान खान यांचे म्हणणे आहे 

        इस्लामाबाद उच्च न्यायालयातर्फे इम्रान खान यांच्या बाजूचे मतप्रदर्शन करणाऱ्या एआरवय या वृत्तवाहिनीला प्रक्षेपण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे आणि पंजाबमध्ये असणारे पाकिस्तान तेहरीके इन्साफ आणि पाकिसन मुस्लिम गिग कायदे गट या पक्षांचे अगदी सरकार पूर्णतः कायदेशीर असल्याचे आपल्या निकालपत्रात सांगण्यात आल्याने  इम्रान खान यांची बाजू काहीशी मजबूत झाली आहे काही दिवसापूर्वीच झालेल्या पाकिस्तानी पंजाबच्या

विधानसभेच्या ( त्यांच्या भाषेत सुभाई असेम्ब्ली ) पोटनिवडणुकीत अधिकृतपणे २० पॆकी १५ जगावर पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते .रावळपिंडी ( पाकिस्तनच्या सर्वसामान्य लोकांच्या उच्चारानुसार पिंडी ) येथील एका विधानसभेच्या जागेवर पाकिस्तानी तेहरीके इन्साफ या पक्षाच्या उमेदवार विजयी होत असताना निवडणूक आयोगाने जाणूनबुजून पाकिस्तानी मुस्लिम लीग नूर गटाच्या उमेदवाराला विजयी केले सबब आम्ही १५ नाही तर १६ जागा जिंकल्या आहेत असा पाकिस्तान तेहरीके इंसाफचा दावा आहे 

    इम्रान खान यांच्या सत्ताकाळात  असणारे इंधनाचे दार , महागाईचा दर , अमेरिकी डॉलर आणि पाकिस्तानी रुपया यांच्या विनिमय दर आणि या सर्वांची आत्ता असणारे स्थिती ही इम्रान खान याच्या बाजूची आहे तर इमान खान यांच्या काळात बंद करण्यात आलेली अंतराष्ष्ट्रीय नाणेनिधीची मदत पुन्हा सुरु होणे हे सत्ताधिकारी पाकिस्तानी डेमोक्रेक्ट्रिक मोव्हमेन्ट या १७ पक्षाच्या  आघाडीची जमेची बाजू आहे हे सर्व बघता  पाकिस्तानचे राजकारण नव्या वळणावर असल्याचे स्पष्ट होत आहे 

         _अण्वस्त्रसज्ज देश आहे जर या राजकारणामुळे तिथे यादवी माजली आणि हि शस्त्रे अयोग्य व्यक्तींच्या हातात पडली तर होणार विनाश अतिशय भयानक असेल तसेच पाकिस्तनमधील म्हह्त्वाची सर्व शहरे भारतीय सीमेपासून जवळ आहे त्यामुळे तिथे यादवी मजल्यास तेथील नागरिक वैध अवैध  मार्गाचा अवलंब करत भारतातच येतील ते पाकिस्तनचे इतर शेजारी देशात जाण्याची शक्यता खूपच कमी आहे बांगलादेश मुक्ती युद्धाच्यावेळी १९७१ ला आपण मोठ्या प्रमाणत निर्वासितांच्या अनुभव घेतला आहे त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानातील नागरिक शेजारच्या ब्रम्हदेशात न जात आपल्या भारतातच आले होते हे सर्व घटक बघता पाकिस्तानमधील हे राजकीय नाट्य शांततेत संपण्यातच भारताचे हीत आहे 

#ही_माझी_एक_हजार_ त्रेसष्ठावी_ब्लॉगपोस्ट_आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?