इम्रान खान पुन्हा पंतप्रधानपदी ?


 इम्रान खान पुन्हा पंतप्रधानपदी  येणार का ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या पाकिस्तानात घडत आहेत . सध्याची पाकिस्तानची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बघता पाकिस्तानात नवीन निडणूका घेणेच श्रेयस्कर आहे असे मत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अरिफ अल्वी यांनी एअरवाय या वृत्तवाहिनीवर व्यक्त केल्यावर या विषयीच्या चर्चाना पाकिस्तानात अधिकच रंग चढला आहे त्यातच बोल न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे महत्वाचे नेते असद उमर यांनी २४ सप्टेंबर रोजी इम्रान खान मोठा निर्णय जाहीर करणार असे जाहीर केल्याने येत्या काही दिवसात पाकिस्तानात सत्तानंतर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे पाकिस्तानचे प्रमुख विरोधी पक्षनेते इम्रान खान यांची प्रमुख किंबहुना एकमेव मागणी पाकिस्तानात तेथील विधिमंडळाच्या निवडणुका घ्याव्यात हीच आहे . त्यासाठी इम्रान खान यांनी नुकतेच पक्षाच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना   मी लवकरच आंदोलन सुरु करण्यास सांगेल मी सांगितल्यावर विना विलंब
आंदोलन सुरु करा असे आदश दिले होते  इस्लमबाद उच्च न्यायालयात त्यांच्यावर दाखल न्यायलायच्या अवमान प्रकरणी इम्रान खान यांनी माफी मागितल्याने त्यांच्या अडचणी काहीश्या कमी झाल्या आहेत काही दिवसापुर्वी पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वा (पूर्वीच्या  वायव्य सरहद प्रांत ) या प्रांतात विविध ठिकाणी झालेल्या राजकीय सभांना झालेली विक्रमी गर्दी तसेच ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानी पंजाब विधानसभेच्या २० जागांसासाठी झालेल्या [पोटनिवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला मिळालेलं जनतेचा कौल बघता इम्रान खान यांचे पारडे खूप जड असल्याचे स्पष्ट होत आहे  आपल्या भारतात ज्या प्रमाणे दिल्लीत केंद्रात सत्तेत कोण व्यक्ती आरूढ होणार ? याची गणिते गणिते ठरतात त्याच प्रमाणे पाकिस्तनांत ही गणिते त्यांच्या पंजाबच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे आहेत यावरून ठरते   त्या पार्श्वभूमीवर आपण या घडामोडीकडे बघायला हवे

       सध्याचा वर्तमान पाकिस्तानी डेमॉक्रेक्तिक मूव्हमेंट या १७ पक्षाच्या आघाडीची मते काहीशी भारताला अनुकूल आहेत इम्रान खान त्यांच्या भारताच्या विरोधातील आक्रमक धोरणासाठी ओळखले जातात  इम्रान खान यांच्यामते जो पर्यंत भारत काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू करत नाही तो पर्यंत भारताशी कोणत्याही स्थितीत राजनैतिक संबंध व्यापार याची शक्यता नाहीअसे त्यांचे मत आहे  याउलट सध्याचे वर्तमान पाकिस्तानी  केंद्र सरकार भारताबरोबर व्यापार करण्यास उत्सुक आहे सध्याच्या पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट या १७ पक्षाच्या

आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग नूर गट आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांची सरकारे असताना भारताचे पाकिस्तानबरोबरचे संबंध त्याच्या आधी पेक्षा उत्तम होते अर्थात या चांगल्या संबंधात हि लोकनियुक्त सरकारे होती लष्कराची सत्ता नव्हती हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे इम्रान खान यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत बहुसंख्य काळ भारताने काश्मीर विषयक ३७० कलम काढल्याने काहीसे तणावाचेच संबंध होते . पाकिस्तानात सत्तानाट्याच्या अंक अत्यंत रंगात आला असताना आपणास हा मुद्दा देखील विचारत घ्यावा लागेल 

         पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे पाकिस्तानात उद्भवलेल्या महापुरामुळे त्यांच्या जीडीपीच्या १० % नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय . पाकिस्तनात महागाईचा दर २७ % आहे पाकिस्तानी रुपयाअमेरिकी डॉलरच्या तुलनेत  दिवसोंदिवस घसरत आहे . पाकिस्तानकडील परकीय चलनाचा साठा देखील झपाट्याने तळाला जात आहे पाकिस्तानचे मित्र असणारे सौदी अरेबिया युनाटेड अरब अमिरात, चीन, तुर्कीये (पूर्वीचे नाव तुर्की ) सारखे  देश आर्थिक मदतीबाबाबत हात आखडता घेत आहेत त्यामुळे पाकिस्तानी
सर्वसामान्य नागरिक प्रचंड हालापेष्टाना सामोरा जात आहे या राजकीय सत्तानाट्यात अर्थव्यवस्थेकडे अजूनच दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे लोक वाईट स्थितीत पोहोचल्यास तिथे यादवी सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर पाकिस्तानात अस्थिरता निर्माण झाल्यासपाकिस्तान आपला शत्रू असला तरी असा पाकिस्तान आपल्यसासाठी अत्यंत धोकादायक आहे भारतासाच्या प्रगतिसासाठी पाकिस्तानात शांतता होणेच आवश्यक आहे त्यामुळे या घडामोडी भारतासाठी देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?