भारत बांगलादेश मैत्री चिरायू होवो

     

   बांगलादेश  भारताबरोबर सर्वाधिक भूसीमा असणारा देश ,  भारताच्या शेजारील असा एकमेव देश ज्या देशात आज २०२२ साली तीन प्रवाशी रेल्वे चालू असणारा आणि अजून तीन मार्गावर रेल्वेसेवा चालवण्याचे नियोजन आहे तसेच ज्या देशाबरोबर आपला भारत  आज २०२२ साली ४ मार्गावरून मालगाड्यांची वाहतूक करतो असा देश म्हणजे बांगलादेश . आपल्या भारतातून नेपाळ आणि भूतान वगळता एकमेव देश ज्याच्या सरकारी बसेस आपल्या देशात येतात आणि आपल्या सरकारी आणि काही खासगी बसेस त्यांच्या देशात जातात तो देश म्हणजे बांगलादेश ज्या देशाच्या वर्तमान पंतप्रधानमंत्री शेख हसीना त्यांच्या  कुटूंबियांची हत्या झाल्यावर काही काळ भारतात राहत होत्या .आताआता पर्यंत जगातील दोन देशातील  सर्वात विस्मयकारी सीमा म्हणून भारताच्या ज्या देशाबरोबरील सीमा रेषांच्या उल्लेख होत होता तो देश म्हणजे बांगलादेश ईशान्य भारताचा अन्य भारतीय भूभागाशी सहजतेने संपर्क व्हावा यासाठी जो देश मोठी भूमिका वाजवू शकतो किंबहुना सध्या बजवात देखील आहे तो देश म्हणजे बांगलादेश भारताबरोबर ज्यांच्या सीमा सुरक्षा दलाचे संक्षिप्तरूप सुद्धा बी.  एस एफ. होते तो देश म्हणजे बांगलादेश  
         तर अश्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ५ सप्टेबरपासून  ४ दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यादरम्यान सुरक्षेविषयक माहितीचे आदानप्रदान,  वीज आणि  ऊर्जासाधनाचा विकास , व्यापारवृद्धी आणि गुंतवणुकीच्या  संभाव्य संधीबाबाबत चर्चा दोन्ही देशांदरम्यान वाहणाऱ्या नद्यांचे तसेच बंगलादेशातील अंतर्गत पाण्याचे व्यवस्थापन , दोन्ही  देशांच्या सीमेवरून होणारी अमली औषधांची तसेच मानवी तस्करी बाबाबत या दरम्यान या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून  बांगलादेशच्या
पंतप्रधान या भारत दौऱयावर येत आहेत या  आधी ऑक्टोबर २०१९ मध्ये त्या भारताच्या भेटीवर आल्या होत्या .या भेटीत त्या पंप्रधान नरेंद्र मोदी . राष्ट्रपती द्रौपदी मृमु उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्याशी संवाद साधतील या दौऱ्यात शेख हसीना यांच्याबरोबर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री शगुन, वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी, रेल्वे मंत्री मो. नुरुल इस्लाम सुजान, मुक्तियुद्ध मंत्री ए.के.एम. मोझम्मेल हक तसेच पंतप्रधानाचे आर्थिक सल्लगार मशिउर ए.के.एम. रहमा हे असणार आहेत 
       मी लेखात आधी सांगितल्याप्रमाणे सध्या भारतातून कोलकत्ता ते ढाका , न्यू जलपैगुडी ते ढाका , आणि कोकलता ते खुलना या तीन प्रवाशी गाड्या धावतात या खेरीज अजून तीन रेल्वेमार्गावर प्रवाशी गाड्या सुरु करण्याबाबतच्या चर्चा विविध टप्यावर आहेत  . .आज २०२२ साली भारतातून नेपाळला जाणारा रेल्वेमार्ग गेज बदलणे , आणि रेल्वेरुळाची दुरुस्ती या तांत्रिक कारणास्तव बंद आहे . भूतान आणि म्यानमार या देशाशी आपली रेल्वेसेवा मुळातच जोडलेली नाही पाकिस्तानशी राजकीय कारणामुळे रेल्वेसेवा बंद आहे भारतातून भगत कि कोठी या  जोधपूर शहराच्या एका उपनगरीय स्थानकातून कराची या दरम्यान थारपार एक्स्प्रेस आणि नवी दिल्ली ते लाहोर दरम्यान समझोता एएक्स्प्रेस या रेल्वे धावत असे असो थोडक्यात  आजमितीस भारताची रेल्वे सेवा सुरु असणारा बांगलादेश हा एकमेव देश आहे भारतातील त्रिपुरा राज्याची राजधानी असलेल्या आगारताला  या भारत बांगलादेश सीमेपासून सात  किमी अंतरावर असलेल्या शहराला बांगलादेशाशी रेल्वेने जोडण्याचे काम बांगलादेशमध्ये जमीन अधिग्रहांची समस्या आल्याने थांबले आहे हा रेल्वेमार्ग सुरु झाल्यास ईशान्य भारताचा  उर्वरित भारताशी असणारा संपर्क वाढण्यास मदत होईल भारत आणि बांगलादेश दरम्यान वाहणाऱ्या बहुतेक सर्व नद्यांबाबत भारत आणि  बांगलादेश दरम्यान करार झाले आहेत मात्र पश्चिम बंगालच्या सिलिगुडी कॉरिडॉर भागात सिक्कीम पश्चिम बंगाल सीमा क्षेत्रात उगम पावून बांगलादेशमध्ये जाणाऱ्या तिस्ता नदीच्या पाणी वाटपाबाबबत प्रचंड मतभेत आहेत या मतभेदाचे कारण स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पाडण्यासाठी कारणिभुत ठरलेल्या दुरांतो एक्स्प्रेस हि सेवा आपल्या भारतीय रेल्वेत समाविष्ट करणाऱ्या ममता बॅनर्जी यांची तिस्ता बाबाबतची भूमिका आहे 
      एकंदरीत भारत आणि बांगलादेशात आधीचे मैत्रयीचे दृढ संबंध आहेत ते अधिक दृढ होण्याची शक्यता भारत भेटीवर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या दौऱ्यामुळे निर्माण झाली आहे 
#ही_माझी_एक_हजार_चौसष्टवी_ब्लॉगपोस्ट आहे 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?