भूकंपाचे संकट सामोरी

   


     ५ सप्टेंबर २०२२ च्या सकाळी चीनच्या आग्न्येय भागात शक्तिशाली म्हणता येईल असा साडेसहा रिक्टर स्केलचा भूकंप झाला  आपल्या नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात  नव्याने भूकंपाचे छोटे छोटे धक्के बसत आहेत ,भूकंपाचे धक्के बसण्यासाठी नाशिकचा कळवण तालुका प्रसिद्ध होता आता या कळवण तालुक्याच्या ऐवजी या तालुक्याच्या शेजारील  दिंडोरी तालुक्यात भूकंपाच्या केंद्रबिंदु सरकल्याचे बोलले जात आहे .सध्या विविध अंतरराष्ट्रीय माध्यमांच्या बातम्या बघितल्यास जगभरात भूकंपाच्या धक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे  गेल्या काही महिन्यात आठवाड्यत किमान एक  मध्यम  ते मध्यम  आणि तीव्र याच्या सीमेवर रिक्टर स्केल असणारा भूकंप होत आहे  जगभरातील भूगर्भ शास्त्रज्ञ यामुळे अत्यंत चिंतेत आहेत . या पार्श्वभूमीवर भारतात  मात्र कमालीची शांतता अनुभवायास मिळत आहे शासनस्तरावर नियोजन सुरु असले तरी हे नियोजन  लोंकांबाबत आहे ते लोक या बाबाबत खूपच बेपर्वा दिसत आहे जे अत्यंत धोक्याचे आहे . या धोक्याबाबबत अजूनही समाजात पुरेशी चर्चा होत नहिये  कोणतीही गोष्टयशस्वी होण्यासाठी शासनस्तरावरील उपक्रमांखेरीज सर्वसामान्याच्या त्यातील सहभाग त्यांत महत्त्वाचा आहे दुर्दैवाने तिथे स्मशान शांतता आहे 

     भूगर्भतज्ञाच्या मते ऊत्तर भारतात अत्यंत विनाशकारी भूकंपाचा मोठा धोका आहे आपल्या भारतातील सर्वाधिक लोकसंख्या ही उत्तर भारतात राहते.  तसेच आपत्ती निवारण्याच्या सोइ सुविधा. नियोजनबद्ध विकासाबाबत ऊत्तर भारतात अत्यंत चिंताजनक स्थिती असल्याचे देखील आपणस माहिती असेलच . या पार्श्वभूमीवर जगभरात सध्या वाढलेल्या भूकंपाच्या घटना काळजाच्या ठोका चुकवतात . आपल्या भारतात किमान ऊत्तर भारतातील लोकांना कयमस्वरूपी भूकंपाचा तोंड देण्याविषयीचे प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे मात्र याबाबत आपल्याकडे आवश्यक असून देखील काहीच बोलले जात नाही भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात कोणत्याही समस्येबाबत जनमत तयार होण्यासाठी त्यावर राजकीय नेत्यांनी बोलणे आवश्यक सरते मात्र भावनिक मुद्दे घेऊन राजकरण

करण्यात मग्न असणाऱ्या आपल्या देशात या विषयी कोणताही राजकीय नेता बोलू इच्छित नाही . हे आपले दुर्दैवच 

अन्य नैसर्गिक संकटाची मिळते तशी भूकंपाची पूर्वसूचना मिळणे अवघड आहे किल्लारीचा विनाशकारी भूकंप रात्री झाला होता जर अशी स्थिती पुन्हा उद्भवली तर सर्वसामान्याना योग्य ती माहिती पोहोचण्यापर्यंत वेळ जाऊ शकतो ज्यामुळे प्राणहानीची शक्यता वाढू शकते त्यामुळे भूकंपाच्या वेळी कारवायांच्या प्राथमिक गोष्टीचे ज्ञान सर्वसामान्य लोकांना असणे सध्याच्या काळात अत्यावश्यक आहे  यासाठी आपल्या भारतात फारशी काळजी घेतली जात नाहीये . ती घेणे हि काळाची गरज आहे तर आणि तरच आपण या धोक्याला यशस्वीपणे सामोरे जाऊ 

#ही_माझी_एक_हजार_पासष्ठावी_ब्लॉगपोस्ट आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?