वंदन भारताची नवी ओळख जगाला करणाऱ्या संन्यास्याला

           


 आजपासून 129 वर्षापुर्वीची गोष्ट आहे,स्थळ अमेरीका या देशातील शिकागो हे शहर . या शहरात ते शहर ज्या देशात आहे, त्या भुभागाचा जगाला शोध लागल्याच्या घटनेला 400 वर्षे पुर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ जगातील सर्व धर्मातील बाबींवर चर्चा करण्यासाठी एक परीषद आयोजीत करण्यात आली होती.    आज परीषदेचा पहिला  दिवस आहे, या दिवशी ज्या वक्त्यांनी बोलण्याचे नियोजन केले आहे, त्यातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता , सर्व वक्त्यांची भाषणे झाली आहेत,अश्यावेळी तेथील आयोजक एका 30 वर्षीय वक्त्याला बोलण्यास आमंत्रीत करतात, वक्ता त्यांचा गुरूचे स्मरण करुन भाषणास सुरवात करण्यासाठी शद्ब उचारतो, आणि त्याचे पहिले चार शद्ब उचारुन होत असतानाच जमलेले हजारो लोक त्या वक्त्याचा सम्माणार्थ सलग साडेतीन  मिनीटे टाळ्या वाजवते, त्या व्यक्तीचे नाव असते, स्वामी विवेकानंद , आणि ज्या परीषदेत त्यांनी भाषण केले असते, ती असते शिकागो येथील सर्वधर्म परीषद .येत्या रविवारी जगाला भारताच्या महान वारस्याची जगाला ओळख करुन देणाऱ्या त्या भाषणास 129  वर्षे पुर्ण होणार आहेत.

         अनेक चूकीच्या समजूती असणाऱ्या आपल्या भारताची नविन सकारात्मक ओळख त्यामुळे जगाला झाली . त्यानंतर स्वामी विवेकानंद जवळपास 4वर्षे अमेरीकेत विविध ठिकाणी भारतीय तत्वज्ञानावर व्याख्याने देत होते, स्वामी विवेकानंद यांची सुप्रसिद्ध शिष्या भगिनी निवेदिता याच काळात त्यांच्या शिष्या बनल्या.  स्वामी विवेकानंद भारतीय तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी अमेरीकेत

कार्यरत असणाऱ्या वेदांत सोसायटीच्या पायाभरणीसाठी  अनुकुल परीस्थिती निर्माण केली.

     त्यावेळी आपल्या भारतातील सहकाऱ्यांशी पत्राचा माध्यमातून संपर्क साधत भारतात समाजसुधारणेचे कार्य देखील करत होते .स्वामी विवेकानंदानी आयुष्यात वेळोवेळी केलेला पत्रव्यवहार रामकृष्ण मठाच्या नागपूर शाखेने मराठीत आणला आहे . तो अत्यंत प्रेरणादायी आहे. नैराश्याने गस्त वाटत असल्यास तो वाचावाच असे मी म्हणेल.(रामकृष्ण मठाची सर्वच संपदा किमतीने अत्यंत स्वस्त म्हणजे  रस्त्यावरील टपरीच्या दोन ते तीन चहाच्या कपाएव्हढ्या किमतीत उपलब्ध आहे . मात्र त्यातील विचारधन कितीतरी अलौकिक आहे.प्रत्येकाने किमान.एक पुस्तक आपल्या संग्रालयात ठेवावे, असे मी सुचवतो.)  .एखादे कार्य उभारताना येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणींवर कशी मात करावी, याबाबत मोलाचे मार्गदर्शन यात मिळते .येणाऱ्या अडचणीमुळे आत्मविश्वास ढळू न देण्यासाठी काय करावे, याचे देखील सखोल आणि सोप्या भाषेतील विश्लेषण यामुळे आपणास मिळते

    जगाच्या पुर्व दिशेला असणाऱ्या भारतातील  अध्यात्म आणि पाश्चिमात्य देशांची प्रगती यांची एकत्रीत मोट स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर घातली, ज्याची सुरवात स्वामी विवेकानंद यांनी त्या भाषणाद्वारे घातली .त्यांचे "My dear sister and brothers of America" या शद्बांनी पुढे खुप मोठी क्रांती घडवली .फ्रेचशासीत पाँंडेचरी येथे अधात्म्याचा आश्रम उभारण्याची पुर्वाश्रमीचे क्रांतीकारक

असणाऱ्या योगी अरविंदो यांना क्रांतीकाराची वाट सोडून अध्यात्म्याकडे नेण्यासाठी स्वामी विवेकानंदांची प्रेरणा होती , असे म्हंटले जाते. स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेतून  स्थापन झालेल्या वेदांत सोसायटी सारख्या संघटनांमुळे त्यांचे कार्य अजूनही सुरुच आहे.

सर्वधर्म परिषदेत  अन्य वक्त्यांनी त्यांच्या त्यांच्या धर्म का श्रेष्ठ याबाबत मोठमोठाले दावे केले या दाव्यात दुसऱ्या धर्माविषयी काहीशी नकारत्मक भावना होती याउलट स्वामी विवेकानंद यांचे भाषण होते त्यांच्या भाषणांत दुसऱ्या धर्माविषयी द्वेष नव्हता तर विश्वबंधुत्वाचा संदेश होता . स्वतःच्या वैदिक धर्माविषयी बोलताना त्यांनी जागतिक शांतेवर भर दिला या भाषणानंतर स्वामी विवेकानंद हे जवळपास चार वर्षे अमेरिकेत होते जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे याविषयी त्यांनी त्यावेळेसच सांगितले होते पुढे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या

रूपाने ते अनुभवले सुद्धा याच सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेला जहाजातून  जात असताना रस्त्यात लागणाऱ्या जपान आणि चीनकडे बघितल्यावर स्वामी विवेकानंद यांनी त्याचे वर्णन निद्रिस्त ड्रॅगन असे केले होते हे निद्रिस्त ड्रॅगन जेव्हा जागे होतील तेव्हा जगाची झोप उडवतील असे विधान त्यांनी केले होते आज चीनची दादागिरी बघता  स्वामी विवेकानंद यांचे हे विधान सत्यात उतरताना दिसत आहे 

  दुर्दैवाने विश्वाला बंधुत्वाच्या संदेश देणारी ही घटना ज्या दिवशी घडली त्याच दिवशी अर्थात ११ सप्टेंबर रोजी त्यांचं अमेरिकेत जगाच्या ऐक्याला सुरुंग लावणारी घटना काही वर्षांनी घडली असो तसेच धार्मिक द्वेषातून आपल्या भारताची फाळणी करणाऱ्या महोमद्द अली जिना यांच्या मृत्यू देखील १९४८ साली ११ सप्टेंबर रोजी झाला एका अर्थाने स्वामी विवेकानंद यांचा विश्वबंधूत्वाचा संदेश किती लोककल्याणकारी आहे याची ती देवाने दिलेलीपोचपावतीच होती 

,  मला स्वतःला आतापर्यत पुण्यातील रामकृष्ण मठाचा आणि विवेकानंद केंद्राचा  खुप फायदा झाला आहे आणि भविष्यात देखील होणार यात शंका नसावी. तरी पुन्हा एकदा स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीस  विनम्र प्रणाम करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?