सेमी कन्डक्टर म्हणजे काय रे भाऊ ?

   


   नुकताच  सेमी कड्क्टर उभारणीचा  एका बहुराष्ट्रीय कंपनीचा प्रास्तवित प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात हलवला गेला यावरून विविध पातळीवर राजकारण सध्या सुरु आहे . मला राजकारणाबाबत काहीही भाष्य करायचे नाही मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ., या राजकारणाच्या मुळाशी जी बाब आहे ती म्हणजे सेमी कड्क्टर  याकडे  (मी सदर लेखन सर्वसाम्यांना विषयाची माहिती व्हावी यासाठी करत आहे त्यामुळे अनेक संकल्पना समजण्यसासाठी सोप्या व्हाव्यात यासाठी काही बदल केले आहेत.  कृपया इलेट्रीक इंजिनियर लोकांनी त्रास देऊ नये ) 

        तर अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, इलेट्रीक उपकरणात वीज नियंत्रणात आणणारा घटक म्हणजे  सेमी  कन्डक्टर  होय . जो घटक काही विशिष्ट परिस्थितीतच वीज पुरवतो . त्यामुळे जेव्हा उपकरणात विजेची गरज नसते त्यावेळी उपकरणास वीज पुरवठा होत नाही त्यामुळे होणारे नुकसान टळते . हे नुकसान विजेचे आणि विजेमुळे होणाऱ्या उपकरणाच्या नुकसानीचे दोन्ही असते . वीज तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणत खर्च येतो तिचा अनावश्यक वापर म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश  असतो तसेच पैशाची उधळपट्टी देखील असते तसेच वीज म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने वाहत असणारा इलेट्रॉनचा पवाह . जो एखाद्या ठिकाणी गरज

नसताना गेल्यास त्या उपकरणाची हानी पोचवू शकतो त्यामुळे हे दोन्ही नुकसान टाळणारा पदार्थ म्हणजे सेमी कन्डक्टर   होय . यासाठी प्रामुख्याने जी मूलद्रव्ये पॅरेडमीक टेबलच्या सहाव्या लिस्टमधील असतात ज्याच्या अणूतील सर्वात बाहरेच्या कक्षेत बहुदा एकच इलेट्रॉन असतो . त्यामुळे काही इलेट्रॉनिक्सच्या गुणधर्मामुळे विद्युतपुरवठा नियंत्रित होतो 

       हा विषय अधिक खोलात जाऊन घेयचे असल्यास आपणांस  पदर्थातून वीज वाहण्याचा गुणधर्माचा विचार केला असता कोणताही पद्रार्थ कोणती लक्षणे दाखवतो याची माहिती  असणे आवश्यक आहे तर मित्रानो  जर कोणत्याही गोष्टीतुन विद्युत प्रवाह वाहत असेल तर त्यास कन्डक्टर म्हणतात सर्व धातू हे विजेसासाठी कन्डक्टर  असतात हि वीज वाहत असताना तिला काहीसा विरोध होतो हा विरोध हा त्या पदार्थातील अणूच्या रचनेवर अवलूंबून असतो . जर हा विरोध खूपच कमी असल्यास त्यास सुपर कन्डक्टर म्हणतात काही पदार्थातून वीज वाहून नेली जात नाही तर काही पदार्थातून वीज वाहून नेली जात नाही त्यास इस्नूलेटर म्हणतात आपल्या रोजच्या वापरातील रबर लाकूड या गोष्टी अत्यंत चांगल्या इस्नूलेटर आहेत . त्यामुळे विजेच्या उपकरणाचे काम करताना त्यांच्या वापर सुरक्षितता म्हणून करण्यात येतो  सेमी कन्डक्टर हा घटक इस्नूलेटर आणि कन्डक्टर  यातील प्रकार होय . जो काही गुणधर्म इस्नूलेटर चे दाखवतो तर काही गुणधर्म इस्नूलेटर  दाखवतो त्यामुळे यावर काही प्रक्रिया करून त्यास  उपकरणाच्या सोईनुसार तयार करणे म्हणजे सेमी कन्डक्टरची निर्मिती 

     सेमी कन्डक्टर हा घटक प्रामुख्याने इलेट्रीक उपकरणात वापरला जात असल्याने कच्य्या मालाच्या जवळ कोणताही उद्योग उभारल्यास सोईसजार या न्यायाने याच्या जवळच जगात  विविध टीव्ही वॉशिंग मशीन चे कारखाने उभारले जातात.  जागतिक परिस्थीचा विचार करता तैवान हा देश  सेमी कन्डक्टर निर्मितीचा सम्राट समजला जातो या सम्राटामुळेच दक्षिण कोरिया जपान आदी देशात सॅमसंग एलजी सारख्या कंपन्या जगावर राज्य करू शकत
आहेत  . सध्याच्या जागतिक राजकारणामुळे चीन आणि तैवान यांच्यात कधीही युद्धाच्या भडका उभारल्यास 

इलेट्रीक उपकरणाच्या निर्मितीस  फटका बसण्याची शक्यता आहे भारतात इलेट्रीक उपकरणसासाठी आवश्यक असणाऱ्या  सेमी कन्डक्टरची  निर्मिती होत असल्याने भारताला काहीशी कमी अडचण होईल त्यामुळे दुसऱ्या  महायुध्दानंतर युद्धामुळे दिवाळखोर झालेल्या युरोपीय देशांना स्वतःची गरज भागवणऱ्या गोष्टींची देखील निर्मिती करता येत नसताना त्या देशांना स्वतःच्या देशात तयार झालेली विविध उत्पादने  विकल्यामुळे  अमेरिका ज्या प्रमाणे  महासत्ता झाली त्याच प्रमाणे भारताला महसता होण्याची सुवर्ण संधी तयार होत आहे जी आपल्या समस्त भारतीयांची इच्छा आहेच ना ? 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?