ज्वालामुखीच्या तोंडावर पाकिस्तान

   

 आपल्या शेजारील देश पाकिस्तान  ज्वालामुखीच्या तोंडावर असल्याचे तेथून येणाऱ्या बातम्यांमधून स्पष्ट होत आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानातून रेकॉर्ड केलेले संभाषण डार्क नेटवर उपलब्ध असल्याचे आणि या संभाषांत अनेक गंभीर बाबी उघड झाल्यामुळे पाकिस्तानात गोंधळ उडाला असताना देशातील महागाईमुळे शेती करणे अशक्य झाले आहे परिणामी शेतीसासाठी आवश्यक असणाऱ्या खतांवर आणि शेतीपंपासाठी आवश्यक असणाऱ्या डिझेलवर सरकारने शेतकऱयांना सूट द्यावी या प्रमुख मागणीसह सध्याच्या पुरामुळे उध्द्ववस्त झालेल्या शेतीला सरकारने मदत करावी यामागणीसरदर्भात शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारने ऐकावे या मागणीससाठी  पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे   शेतकरी  गेल्या तीन दिवसापासून आंदोलन  करत असताना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका अत्यंत महत्त्ववाची घडामोड घडली.  इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अवमान केल्याप्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तसेच पाकिस्तानच्या केंद्रीय सत्तेच्या विचार करता प्रमुख विरोधी पक्ष जो देशाच्या ६ पॆकी ३ विधानसभेत सत्तारूढ आहे अश्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांच्या विरोधात अटकेचे  काढ वॉरंट निघाल्याने  एकच खडबल उडाली आहे 
     गेल्या काही दिवसातील पाकिस्तानमधील घडामोड बघता या देशात नक्की चालू तरी काय ? असा प्रश्न पडावा अश्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत . पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या आणि पाकिस्तानचे सध्याचे पांतप्रधान शहाबाज शरीफ यांची पुतणी जीला भष्ट्राचाराच्या आरोपामुळे शिक्षा झाली आहे मात्र जी वडिलांच्या तब्येतीच्या कारणास्तव तुरुंगाबाहेर आहे अश्या  मरियम नवाज यांना भष्ट्राचारच्या आरोपातून सुटका मिळते मरियम नवाज  यांच्या वडिलांना नवाज शरीफ यांना यांना देखील भष्ट्राचाराप्रकरणी शिक्षा झाली आहे मात्र वैद्यकीय उपचारसासाठी ४ आठवडे लंडनला उपचार करणे आवश्यक आहे असे सांगून नवाज शरीफ देशाबाहेर पळाले त्यास अडीच वर्ष होत आली मात्र ४ आठवड्यासाठी लंडनला गेलेले नवाज शरीफ देशात आलो तर शिक्षा होईल या भीतीने देशात परतत नाहीये मात्र देशात लष्करप्रमुख म्हणून कोणाची नेमणूक करायची या
सारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत त्यांना देशात परतण्यास अनुकूल वातावरणाची निर्मिती करण्यास सुरवात करणे त्यासाठी राष्ट्रीय गुन्हे तपास यंत्रणेमध्ये (भारतातील सी बी आय सारखी संस्था )   प्रमाणात बदल करत तिचे फक्त कागदावरच अस्तिव राहील हे बघणे या बदलांनुसार स्वतःवरील भष्ट्राचाराचे आरोप नष्ट करणे मात्र याचवेळी प्रमुख विरोधी पक्षनेता इम्रान खान यांस जास्तीत जास्त अडचणीत कसे आणता येईल यासाठी प्रयत्नशील राहणे अश्या प्रकारच्या लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत 
      पाकिस्तानात राजकीय घडामोडीनी  वेग धरला असताना पाकिस्तानात महागाईचा दर ३० % झाला आहे देशातील एक तृतीयांश भाग पुराच्या पाण्यात आहे . पुरामुळे देशाच्या जीडीपीच्या १० % नुकसान झाल्याच्या अंदाज व्यक्त करण्यात येतोय  देशाचा परकीय चालनसाठा झपाट्याने तळाला येतोय . पाकिस्तानचे जवळचे मित्र म्हणवले जाणारे सौदी अरेबिया , युनाटेड अरब अमिरात,  तुर्कीये *जुने नाव तुर्की )चीन हे देश मदत करण्यात हात आखडता घेत आहेत पाकिस्तनचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ हे अक्षरशः एखाद्या भिकाऱ्याने मदतीसाठी हात पसरावा तशी मदतीची याचना जगासमोर करत आहेत . प्रमुख विरोधी पक्षनेता इम्रान खान यांच्या राजकीय सभांना लाखोंचा पाठिंबा मिळत आहे देशातील मोठ्या प्रमाणत फुटीरतावाद असणाऱ्या बलुचिस्तानांत  डिड महिन्याच्या अंतरात हवाई दलाची दोन विमाने पडतात त्यातील   पहिल्या   विमानात लष्कराचे      लष्करप्रमुखांच्या लगेच खालच्या दर्जाचे जे भावी लष्करप्रमुख होऊ शकतात असे ४ अधिकारी मृत्युमुखी पडतात हे विमान नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे पडले असे सांगण्यात येत असले तरी बलुचिस्थानमधील फ़ुटूरतवाद्याने ते पाडले असल्याच्या संशय व्यक्त करण्यात येतोय याच प्रकरणाविषयी टीव्हीवर बोलताना इम्रान खान यांचे स्वीय सहाय्य्क शजबाझ गिल यांनी लष्कराविषयी  केलेल्या टिप्पणीमुळे त्यांना अटक होऊन त्यांचा मरण परवडले असा छळ होतो यामुळे काहिस्या उदगावने बोलत असताना एका राजकीय सभेत इम्रान खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीविषयी काहीसे अनुचित विधान केले या विधानामुळे त्यांच्यावर न्यायालयात अनेक खटले  दाखल होतात  त्यातील अनेकांमध्ये  त्यांना जामीन देखील मंजूर होतो मात्र अश्याच एका खटल्यात इम्रान खान यांच्या अटकेचे वॉरंट निघते सारेच अविश्वनीय 
पाकिस्तान भारताचा शत्रू देश असला तरी  इस्लाम हा प्रमुख धर्म असणाऱ्या जगातील ५१ देशांमध्ये एकमेव  अण्वस्त्रसज्ज देश आहे.  इम्रान खान यांच्या अटकेमुळे पाकिस्तानात यादवी सदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे
तेथील अण्वस्त्रे जर अयोग्य हातात पडल्यास होणारा विनाश महाभयानक असेल पाकिस्तानमधील बहुतांश मोठी शहरे भारत पाक सीमेपासून जवळची आहेत पाकिस्तानमधील जनतेला सांस्कृतिक आणि राजकीय प्रणालीचा विचार करता पाकिस्तानच्या अन्य शेजारील राष्ट्रे जसे इराण आणि अफगाणिस्तानपेक्षा भारताचं जवळ आहे त्यामुळेतेथील जनता वैध नसेल तर अवैध मार्गाच्या अवलंब करत भारतातातच आश्रयाला येणार ती अफगाणिस्तान आणि इराणमध्ये जाणार नाही त्यामुळे या पाकिस्तमधील घडामोडी आपणासाठी देखील अत्यंत महत्त्वाच्या ठरतात पाकिस्तानमधील हिंदू आणि मुस्लिम समाज बांधवांचा विचार करता तो भाग भारतात आल्यास हिंदू आणि मुस्लिम समाज बांधव यांचे लोकसंख्येचे गुणोत्तर प्रचंड बदलेल त्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे पाकिस्तानांत शांतताच राहणे भारताला हितकरक आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?