पाकिस्तान राजकीय अस्थिरतेच्या कडेलोटावर

 

पाकिस्तान राजकीय अस्थिरतेच्या कडेलोटावर , असल्याचे तेथून येणाया बातम्यांमधून  स्पष्ट होत आहे . इम्रान खान यांचे आंदोलन चिरडण्याची पूर्ण तयारी केल्याचे दिसून येत आहे आजमितीस पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये  ठिकठिकाणी रस्त्यावर कंटनेरच्या भिंती उभ्या केल्या आहेत रस्ते खणून त्याठिकाणी मोठमोठे खिळे रोखण्याचे काम सुरु आहे . पाकिस्तानच्या केंद्रीय सरकारतर्फे इस्लामाबाद पोलीस आणि सिंध प्रांतीय पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणत सुरक्षादले तैनतीचे नियोजन सुरु आहे . प्रसंगी आंदोलनकांवर ड्रोनच्या मदतीने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरु आहे या प्रकारच्या बातम्या आंतराष्ट्रीय माध्यमात येत आहेत इस्लामाबाद शहारत येणारे सर्व रस्ते बंद करण्याचे नियोजन सुरु आहे 
          इम्रान खान यांच्या राजकीय प्रचार सभांना मोठ्या प्रमाणत पाठिंबा मिळत आहे समस्त पाकिस्तानी जनता इम्रान खान केव्हा आंदोलनाची हाक देतात याकडे लक्ष देत आहे इम्रान खान यांनी माझे फोन सुद्धा रेकॉर्ड होत असल्याने आंदोलनाचे नियोजन करतांना काहीशी अडचण येत आहे मात्र आंदोलनाचे अत्यंत सूक्ष्म पातळीवर नियोजन सुरु असल्याचे आणि मी आंदोलनांची हाक दिल्यावर जतेने लगेचच इस्लामाबादकडे निघावे असे सांगितले आहे  . सध्याचे पाकिस्तानचे केंद्र सरकार इम्रान खान यांचा संदेश जनतेपर्यंत न जाण्यसासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे त्यासाठी वृत्तवाहिन्यांवर प्रचंड बंधने लादत वृत्तवाहिन्यांना इम्रान खान यांचे भाषण लाईव्ह करण्यपासून
दूर लोटत आहे मात्र फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून इम्रान खान यांचे भाषण विद्यमान सरकारच्या पंतप्रधानापेक्षा अधिक ऐकले जात आहे इम्रान खान यांच्या राजकीय सभांना मिळणार पाठिंबा बघता इम्रान खान यांनी आंदोलनाची हाक दिल्यावर मोठ्या प्रमाणत जनता रस्त्यावर उतरेल हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे 
               बोल न्यूज या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार इम्रान खान सरकारची हे कितपर्यंत आंदोलनास तोंड देण्याची तयारी करू शकतात याची परीक्षा बघत आहे त्यामुळे ते कधीही आंदोलनाची हाक देऊ शकतात . पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने इम्रान खान १२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान आंदोलन सुरु करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे पाकिस्तानात १६ ऑक्टोबर रोजी तेथील आपल्या लोकसभा सदृश्य सभागृहाच्या अर्थात नॅशनल असेम्ब्लीच्या ९ जागांसाठीपोटनिवडणूक होत आहे या ९ मतदारसंघापैकी ८ मतदारसंघात इम्रान खान हे आपली उमेदवारी करत आहे मुळात ही निवडणूक २५ सप्टेंबर रोजी होणार होती मात्र तेथील सत्ताधिकारी वर्गाकडून विविध कारणे सांगत पाकिस्तानी निवडणूक आयोगास ही निवडणूक पुढे ढकलण्यास सांगितले होते जी आता होत आहे अब तक  या वृत्तवाहिनीने  दिलेल्या बातमीनुसार १६ ऑक्टोबर होणाऱ्या मतदानाच्या निकालानंतर इम्रान खान आंदोलनाची हाक देऊ शकतात 
      पाकिस्तानमधील अंतर्गत राजकीय समस्या म्हणून याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही पाकिस्तानात जेव्हा राजकीय अशांतता निर्माण होते तेव्हा भारतात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होण्याचा इतिहास आहे तसेच पाकिस्तानमधील औद्योगिकदृष्टया सर्व महत्त्वाची शहरे भारतीय सीमेपासून जवळच आहे तसेच पाकिस्तानची 
जवळपास ६० % लोकसंख्या भारतीय सीमेलगतच राहते  जगातील सर्वात जास्त क्रीडा साहित्य निर्माण करणारे पाकिस्तानी शहर सियालकोट  भारतीय सीमेपासून फक्त १५ किलोमीटर दूर आहे 
         सध्या सत्तेत असणाऱ्या पाकिस्तानी डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट मधील पक्ष स्वतंत्र्यपणे  या आधी सत्तेत होते तेव्हा भारताबरोबर पाकिस्तनचे संबंध ऊत्तम राहिले आहेत तर सध्या विरोधी पक्षात असलेल्या इम्रान खान यांच्या सत्ताकाळात भारत आणि पाकिस्तानचे संबंध काहीसे दुरावले होते भारताला मध्य आशियातील देशांशी व्यापार करण्यासाठी सध्या इराणहून अफगाणिस्तानमार्गे  जावे लागते जो पाकिस्तानहुन  अफगाणिस्तानमार्गे मध्य आशियात जाण्याच्या मार्गापेक्षा लांबचा मार्ग आहे पाकिस्तानचा वापर केल्यास भारत मध्य आशियाशी सहजतेने व्यापार करू शकतो म्हणूपाकिस्तानमधील राजकीय घडामोड भारतसासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहेत त्यामुळे तिथे अशांतता निर्माण होणे भारतासाठी सुद्धा धोकेदायक आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?