मोठे आर्थिक संकट पायाशी

     

    येणाऱ्या काळात आपल्याला एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत सध्या विविध आंतराष्ट्रीय वित्तसंस्था तसेच विविध देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून देण्यात येत आहेत . ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात  आर्थिक वृद्धीचा दर घसरणे , जगात महागाई मोठ्या प्रमाणत वाढणे आदी  बाबीं बाबींबतच्या व्यक्त करण्यात येणाऱ्या विविध अंदाजच समावेश करावाच लागेल . सध्या जगात फक्त आपलीच मध्यवर्ती बँक ( रिझर्व बँक ऑफ इंडिया ) व्याजदरात वाढ करत नाहीये तर जगातील बहुतेक सर्वच बँका त्याच्या व्याजदरात वाढ करत बाजारातील वित्तपुरवठा कमी करण्याचा प[रायतं करत आहेत काही तज्ज्ञांच्या मते या उपायामुळे सन १९२९ च्या सारखी जागतिक मंदी यामुळे उद्भवू शकते . नुकतेच जर्मनीच्या अर्थमंत्र्याने या संदर्भात केलेले एक विधान अत्यंत सूचक आहे त्यांनी सांगितले जगाने नुकतेच कोव्हीड १९ चा साथरोग आणि रशिया युक्रेन युद्धाच्या संकटाचे धक्के पचवले आता जग तिसरा अर्थव्यस्थेतील मंदीचा धक्का पचवताना अत्यंत मोडकळीस येईल 
       १९७३ साली आखाती प्रदेशातील नैसर्गिक संसाधने उप्तादित करणाऱ्या देशांनी तेलाचे भाव एका रात्रीत वाढवले . पहिला तेल धक्का म्हणून हा ओळखला जातो यामुळे अर्थव्यस्थेवर मोठ्या प्रमाणत प्रतिकूल परिणाम झाला . सध्या देखील तेल उत्पादन करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ओपेक आणि ओपेक मध्ये नसणाऱ्या तेल उत्पादक देशांचा समूह ज्यास ओपेक प्लस असे संबोधतात तो तेलाचे उत्पादन कमी करण्याचा विचार करतोय त्यामुळे मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्रातील मूलभूत नियमानुसार तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतात . त्यामुळे भारतासह अनेक देशांचे परकीय चलन अधिक प्रमाणात खर्च होण्याचा प्रसंग उद्भवू शकतो . तो टाळण्यसासाठी ओपेक देशातील प्रमुख देश असलेल्या सौदी अरेबिया या देशाशी अमेरिका चर्चा करत यातून मार्ग काढण्याचा मार्ग करत आहे नैसर्गिक इंधने कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची असतात त्याच्या किमतीतील चढ उतार या उपादनच्य निर्मितीच्या किमतीत बदल करतो ज्यामुळे अर्थव्यस्थेत मोठ्या प्रमाणत बदल होतात हे बाब आपण लक्षात घेयला हवी 
 . लहानपणी आपण सायकल स्टॅण्डवर एका कोपऱ्यात असणाऱ्या सायकलला धक्का दिल्यावर  स्टॅण्डवरील सर्व सायकल पडण्याचा खेळ बघितला असेलच खेळला देखील असेल याच प्रकारे जगातील सर्व अर्थव्यवस्था
एकमेकांशी जोडलेल्या आहेत त्यामुळे एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेपुढील समस्या जगातील स्वरूप धारण करतात जगातील सर्व देशांना कमी अधिक प्रमाणत त्याचा झळ सोसाव्याच लागतात . 
           आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून २०२३ साली जगातील प्रमुख देशांच्या अर्थव्यस्थेतबाबाबत जो अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यानुसार जगातील महत्त्वाची अर्थव्यवस्था असेल्या जर्मनीचा विकास दर उणे ० पूर्णांक ३ शतांश टक्के तर युनाटेड किंगडम या दंशाच्या आर्थिक विकास दर उणे ० पूर्णांक ७३ शतांश असेल तर अमेरिकेचा दर जेमतेम १ टक्का असेल आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या २०२३ च्या अंदाजानुसार भारताचा दर ५ टक्क्यांचा आसनपास असेल जे एक सुखावणारे चित्र असेल शेअर बाजारात नकारात्मककतेकडे होणारी वाटचाल आपण बघतच आहोत त्या पार्श्वभूमीवर आपण या या इशाऱ्याकडे बघायला हवे    त्यातच आपले हित  आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?