राजकीय आणि आर्थिक समस्येच्या चक्रव्हयूयात सापडलेला देश पाकिस्तान

              


आपला शॅजारील देश पाकिस्तान मधून ज्या बातम्या सध्या ऐकायला वाचायला मिळत आहेत ते बघता ,"  राजकीय आणि आर्थिक समस्येच्या चक्रव्हयूयात सापडलेला देश पाकिस्तान " असे पाकिस्तानचे वर्णन केल्यास ते वावगे ठरू नये . अशी तेथील स्थिती आहे

       विजेच्या वाढत्या दरामुळे देशातील शेतकऱ्यांबरोबर देशातील निर्यातीत अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जवळपास ७० योगदान असेलेल्या वस्त्रोद्योगाने आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर  काहीच दिवस होत नाही तोच  देशाच्या दक्षिण भागात काही तांत्रिक कारणास्तव २४ तासाहून काहीसा अधिक काळ वीजपुरवठा पूर्णतः खंडित होते ज्या मध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहराचा देखील समावेश आहे .देशातील परकीय चालनसाठा अत्यंत न्यूनतम पातळीवर पोहोचला आहे मित्र देशांनी दिलेल्या मदतीचा टेकू काढताच देश दिवाळखोर जाहीर करण्याच्या स्थितीत पोहोचला आहे पाकिस्तानात गुरुवार १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या विजेच्या पेचप्रसंगाचा आधी सुद्धा विजेची प्रचंड अनुपलब्धता आहे ज्या विरोधात तेथील औद्योगिक क्षेत्राने सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली होती जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये कराची आणि लाहोर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत पाकिस्तानच्या खैबर पखतनूंवा (वायव्य सरहद्द प्रांत ) या प्रांतातील लोक त्याच्या प्रांतात सातत्याने वाढणाऱ्या

पाकिस्तानचे  सरंक्षण मंत्री ख्वाजा असिफ 

दहशवादी कारवायांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनास सुरवात केली आहे पाकिस्तानचा सरंक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी १४ ऑक्टोबर रोजी देशातील माध्यमांशी संवाद साधताना तेहरीके तालिबाबान पाकिस्तान बरोबर नुकतीच झालेली चर्चेची फेरी निष्फळ ठरली असल्याचे सांगितले  या पाकिस्तानी सरकारने दहशवादी संघटना म्हणूनपाकिस्तानी तेहरीके तालिबान या संघटनेस घोषित केले आहेत   हे कमी की काय म्हणून पाकिस्तानातील राजनैतिक संकट देखील दिवंकसोंदिवस अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत आहे इम्रान खान यांच्या बाजूने जनमत जवळपास पूर्णतः  गेले आहे इम्रान खान केव्हा आंदोलनाची हाक देणार या कडे समस्त पाकिस्तानी जनता डोळे लावून बसली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मात्र पाकिस्तानी सरकार  अर्थव्यवस्थेची घडी व्यवस्थित लावण्यासासठी करत असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले आहे पाकिस्तानी सरकारला तोच काय सुखावणारा आनंद आहे

    या अस्थिरतेमुळे अन्य देशांनी पाकिस्तानात गुंतवूणक करणे कधीचेच थांबवले आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकास बऱ्याच मोठ्या प्रमाणत खुंटला आहे या खुंटलेल्या विकासामुळे लोकांच्या हाती रोजगाराच्या संधी दिवसोंदिवस कमी होत चालल्या आहेत लोकांच्या हाती काम नसल्याने लोक यावर उपाय सापडेल असे सांगणाऱ्या शक्तींच्या हातातील बाहुले होत आहे दुर्दैवाने या शक्ती कमालीच्या कट्टर धार्मिक आहेत पाकिस्तानी पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक प्रशासनाच्या निवडणुकीत तेहरीके लब्बेकी पाकिस्तान या संघटनेस मिळालेला  मोठ्या

प्रमाणावरील पाठिंबा हेच दर्शवत आहे या वाढत्या कट्टरतेची झळ आपणास देखील मोठ्या परम,प्रमाणात आपणास बसू शकते पाकिस्तानची अर्थव्यवस्था डळमळीत झाल्याने त्याच्या परिणाम चायना पाकिस्तान इकॉमिक कॉरिडॉर वर देखील झाला आहे तेथील कामे जवळपास बंद झाल्यासारखी स्थिती आहे

       पाकिस्तान आपले शत्रू राष्ट्र असले तरी देखील पाकिस्तानात जेव्हा राजकीय अशांतता निर्माण होते तेव्हा भारतात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होण्याचा इतिहास आहे तसेच पाकिस्तानमधील औद्योगिकदृष्टया सर्व महत्त्वाची शहरे भारतीय सीमेपासून जवळच आहे तसेच पाकिस्तानची जवळपास ६० % लोकसंख्या भारतीय सीमेलगतच राहते  जगातील सर्वात जास्त क्रीडा साहित्य निर्माण करणारे पाकिस्तानी शहर सियालकोट  भारतीय सीमेपासून फक्त १५ किलोमीटर दूर आहे    सध्या सत्तेत असणाऱ्या पाकिस्तानी डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट मधील पक्ष स्वतंत्र्यपणे  या आधी सत्तेत होते तेव्हा भारताबरोबर पाकिस्तनचे संबंध ऊत्तम राहिले आहेत तर सध्या विरोधी पक्षात असलेल्या इम्रान खान यांच्या सत्ताकाळात भारत आणि पाकिस्तानचे संबंध काहीसे दुरावले होते भारताला मध्य आशियातील देशांशी व्यापार करण्यासाठी सध्या इराणहून अफगाणिस्तानमार्गे  जावे लागते जो पाकिस्तानहुन  अफगाणिस्तानमार्गे मध्य आशियात जाण्याच्या मार्गापेक्षा लांबचा मार्ग आहे पाकिस्तानचा वापर केल्यास भारत मध्य आशियाशी सहजतेने व्यापार करू शकतो पाकिस्तान अशांत झाल्यास तेथील जनता पाकिस्तानच्या अन्य शेजारील देश आणि इराण आणि अफगाणिस्तानमध्ये आश्रयास जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे इराण महिलांच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नावरून सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून धुमसतो आहे अफगाणिस्तानमध्ये तालिबाबानचे अत्याचारामुळे तेथिल आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे पाकिस्तानने अनधिकृत रित्या आपल्या ताब्यात ठेवलेल्या काश्मीरच्या भूभागाला चीनच्या सिकियांग  हा प्रांत लागून आहे त्या त्या ठिकाणी असलेल्या मुस्लिम बांधवांवर चिनी सरकार अत्याचार करते असे सातत्याने बोलले जाते त्यामुळे पाकिस्तान अशांत झाल्यास तेथील जनता  भारतातच येणार हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही त्यामुळे पाकिस्तान  राजकीय आणि आर्थिक समस्येच्या चक्रव्हयूयातुन बाहेर पाडण्यातच भारताचे हित आहे

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?