मुख्य सामग्रीवर वगळा

ए मेरे वतन के लोगो


मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा ये शुभ दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा '

कुठे ऐकल्यासारखे वाटतंयदेशभक्त  कवी प्रदीप यांनी लिहलेल्या आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतातील या ओळी आहेत जे गीत स्वर्गीय  लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकल्यावर त्या वेळचे पंतप्रधान  पंडित नेहरू यांनी बच्ची रूला दिया अशे भावनोदगार काढले होते येत्या गुरुवारी २०. ऑक्टोबर रोजी या प्रसंगाला कारणीभूत असलेल्या भारत चीन युद्धाला ६०  वर्ष  पूर्ण होतील त्या निमित्याने  या युद्धात प्राणास मुकलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली

      त्या वेळी तत्कलीन शासनाच्या काही चुकांमुळे आपण या युद्धात हरलो . गेल्या ६० वर्षात चीन आणि भारत हे दोन्ही देश आणि समस्त जग खूप पुढे गेले आहे . मात्र चीनची जमिनीची हाव काही संपत नाहीये . आपल्या पूर्वीच्या इतिहासाचा दाखल देत शेजारील अनेक देशाशी चीनने सीमावाद सुरु केला आहे त्यासाठी ९पॅरेरल  लाईन या नावाने चीनने पॅसीफीक महासागराचे उपसंगार असलेल्या दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्रात काल्पनिक रेषा आखून त्या रेषांच्य आत येणारा सर्व भूभाग हा चीनचा असल्याचे जाहीर केले आहे चीनची जमिनीची भूक राक्षसी आहे याचे प्रत्यंतर जगाने १६ ऑक्टोबर रोजी बघितले सुद्धा मात्र प्राचीन सम्राट हर्षवर्धन यांच्या

कार्यकाळात भारताला भेट दिलेल्या ह्युएन त्सांग या बौद्ध भिक्षुकाने त्याच्या भारत भेटीच्या भारतीयांचे वर्णन करताना सांगितलेल्या आपला दोष काढून टाकण्यासाठी आपण विशेष कष्ट घेतल्याने त्या दोषांनुसार आपण या घडामोडीकडे काहीसे दुर्लक्ष केले  ह्युएन त्सांग यांनी आपल्या भारतीयांचे वर्णन करताना , " हे लोक विविध कलेत शास्त्रात अत्यंत निपुण आहेत मात्र आपल्या क्षेत्रात जगात काय चालू आहे हे जाणून घेण्यास अत्यंत अनुच्छुक आहेत त्यांना स्वतःच्या विश्वात गुंतून राहायला आवडते" या शब्दात केले आहे या अळशीपणाची शिक्षा आपणास अनेकदा भोगावी लागली आहे मात्र आपल्या अजून देखील या अवगुणांवर मत केली नाहीये आपल्यात हा अवगुण आहे याची जाणीव ज्या देशातील पर्यटकाने करून दिली त्याच चीनमध्ये १६ ऑक्टोबर रोजी घडणाऱ्या घडामोडीबाबत आपण केलेल्या चर्चेतून पुन्हा दिसत आहे

     तर दर वर्षांनी होणाऱ्या चीनच्या कम्युनिष्ट पक्षाच्या अधिवेशनात चीनचे वर्तमान अध्यक्ष जे कम्युनिष्ट पक्षाचे अध्यक्ष तसेच चीनच्या लष्कराचे प्रमुख देखील आहेत अश्या शी जिनपिंग यांनी तैवानबाबाबत अत्यंत मोठे विधान केले आहे चिनी सरकारच्या भविष्यातील सर्व योजनांच्या पायाभरमणीची सुरवात म्हणून या  अधिवेशनकडे समस्त जग बघते  त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तैवानमध्ये बळाचा वापर करण्याचा पर्याय कधीही सोडणार नाही',अशी उघड उघड धमकीच दिली आहे  सध्या चीन तैवान लगतच्या समुद्रात ज्या प्रकारे नौदलाच्या कार्यवाही करत आहेत ते बघता या विधानातील गांर्भीर्य लक्षात येते आम्ही तैवानचा प्रश्न शांततेने आणिपरस्पर सहकार्याच्या मार्गाने सोडवण्यास उच्छुक आहोत मात्र गरज भासल्यास आम्ही लष्करीबळाचा वापर करण्यास देखील मागे पुढे बघणार आंही आम्ही हा चीनचा एकात्मकतेचा प्रश्न जनतेच्या इच्छेवर सोडला आहे आता चीनच्या सार्वभोमत्वबाबाबत चिनी नागरिकांचं योग्य तो निर्णय घ्यावा असे त्यांनी यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितले जावेळी तैवानच्या स्वातंत्र्यासासाठी लढणाऱ्या शक्तींवर त्यांनी कडक शब्दात टीका केली आम्ही कोणत्याच परकीय शक्तीची या प्रश्नात लुडबुड आम्ही कदापि खपवून घेणार नाही त्यांना केलेली मदत चीनच्या सार्वभोमत्च्या विरोधातील कृती समजून त्यास जस्याचं तसे ऊत्तर देण्यात येईल असे त्यांनी जगाला सांगितले आहे

      या खेरीज हॉंगकॉंगवरील चिनी नियंत्रण अजून कडक करण्यात येणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत काही महिन्यापूर्वी हॉंगकॉंगमध्ये चिनी दडपशाहीविरोधात मोठे आंदोलन झाले होते जे चीनने  चिरडले होते आणि तिथे आपले बाहुले सरकार स्थापित केले होते . १९९९ साली ९९ वर्षाच्या कराराची मुदत संपल्याने युनाटेड किंग्डमकडून हॉंगकॉंग चीनला हस्तांतरित करताना झालेल्या करारानुसार पुढील ५० वर्ष हॉंगकॉंगचे प्रशासन वेस्ट मिनिस्टर ( युकेच्या प्रशाषणपद्धतीला वेस्ट मिनिस्टर म्हनतात ) राहील अशी अट  आहे  हा ५० वर्षाचा कालावधी २०४९ साली समाप्त होत आहे मात्र त्याआधीच चिनी सरकार तेथील प्रशासन पूर्णतः चिनी पद्धतीचे करत आहे त्या संदर्भातील महत्त्वाची  घडामोड आपण या इशाऱ्याकडे बघावे लागेल

या २०२२२ वर्षाच्या सुरवातीला जसे रशियाने युक्रेनवर आक्रमण केले त्यासाठी विविध कारणे रशियाकडून देण्यात असली तरी १९९१ च्या आधीच्या सेव्हियत सोशालिस्ट रशिया पुन्हा उभे करण्याच्या पुतीन यांचा इरादा लपून राहिला नाहीये त्याच प्रमाणे चीन तैवानवर कधीहीहल्ला करू शकतो त्यासाठी पंचतंत्रातील कोल्हा आणि बोकड यांच्या गोष्टीप्रमाणे निवळ निमित्तमात्र पहिजे ते मिळाल्यास हे युद्ध होणार हे १०० % खरे आहे मात्र त्यात आपले नुकातून कमीत कमी होण्यासाठी तयारी करण्यातच आपले हित आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?