का आहे २०२३ वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचे ?

     

  पुढील वर्ष २०२३भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे  कारण एससी. या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या  शांघाय को ऑपरेशन  ऑर्गनझेशन  तसेच जी २० या दोन्ही संघटनेच्या अध्यक्षपदाची माळ पुढील वर्षी २०२३ साली भारताच्या गळ्यात पडेल . २०२३ या वर्षी एक वर्षासाठी भारत या दोन्ही संघटनेच्या अध्यक्षपदी असेल . ज्यामुळे भारताला विविध देशांशी आपले व्यापारी आर्थिक संबंध दृढ करण्यास मदत होईल . ज्यामध्ये मध्य आशियातील  पाच इस्लामिक राष्ट्रांपैकी  तुर्कमेनिस्तान वगळता अन्य चारही देश तसेच दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना ब्राझील , उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको , कॅनडा , आशिया खंडातील दक्षिण कोरिया , इंडोनेशिया , युरोप खंडातील फ्रांस युनाटेड किंगडम (इंग्लंड ) आदी देश प्रमुख आहेत सुमारे २८ देशांशी प्रत्यक्ष व्यापारविषयक विविध करार करायची संधी त्यामुळे भारताला  मिळेल  जगात जरी २१० देश असले तरी आर्थिक ताकद आणि लोकसंख्येचा विचार करता जगातील  लोकसंख्यापैकी ६० टक्क्याहून काहीशी अधिक लोकसंख्या , जगाच्या एकत्रित जीडीपीच्या ८० टक्क्याहून काहीसा अधिक जीडीपी या देशांचा आहे जगात होणाऱ्या एकूण आंतराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे ७५ टक्के व्यापार या २६ देशांचा आहे  त्यामुळे भारताला  आपल्या अर्थव्यस्थेत नाव चैतंन्य उभारण्यसासाठी  एस सी , आणि जी २० या दोन संघटनाचे अध्यक्षपद मदत करेल यात शंका नाही
   जगातील सर्वात मोठी पादेशिक संघटना असलेल्या शांघाय कॉ ऑपरेशन या संघटनेची स्थापना २००१ साली आहे या संघनतेत चीन रशिया कझागिस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान ताजिकीस्तान रशिया भारत पाकिस्तान इराण हे देश पूर्णवेळ सदस्य आहे तर आर्मेनिया नेपाळ श्रीलंका अझरबैजान कंबोडिया हे निरीक्षक आहेत युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग असणारा मध्यपूर्वेतील तुर्कमेनिस्तान हा देश याचा सदस्य देश नाहीये तुर्कमेनिस्तान या देशाचा अपवाद वगळता मध्य आशियातील चारही  यू. एस. एसआर चा भाग असणारी  इस्लामी राष्टे  या संघटनेची सदस्य राष्ट्रे आहेत . सुमारे तीन वर्षांपूर्वीच्या यू. पी. एस. सी. च्या परीक्षेत कोणता मध्य आशियातील देश शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनचा सदस्य देश नाही ? असा प्रश्न आला होता यू पी एस. सी च्या परीक्षेत प्रश्न रिपीट होत नसले तरी एम पी एस सी च्या परीक्षेत प्रश्न रिपीट होऊ शकतात त्या पार्श्वभूमीवर एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांनी यावर अधिक भर देणे आवश्यक आहे
   भारत या संघटनेच्या निरीक्षक म्हणून २००५ पासून काम करत होता तर सन २०१७ पासून या संघटनेच्या भारत पाकिस्तानसह पूर्णवेळ सदस्य झाला मागच्या वर्षी २०२१ साली  इराण या संघटनेचाअर्धवेळ निरीक्षक सदस्य झाला जो पुढील वर्षी भारत या संघटनेचा अध्यक्ष असताना पूर्णवेळ सदस्य होणार आहे या संघटनेतील चीन पाकिस्तान या जोडगोळीतील भारत विरोधी कारवाया रोखण्यस्साठी भारताला इराण इराण हा महत्त्वाचा साथीदार ठरू शकतो या संघटनेच्या नावात शांघाय असले तरी याचे मुख्यालय चीनची राजधानी बीजिंग शहरात आहे पाकिस्तानला आपण मुस्लिम बांधवांचा देश म्हणत असलो तरी पाकिस्तानचा  अधिकृत धर्म हा सुन्नी इस्लाम आहे तर इराणचा अधिकृत धर्म हा शिया इस्लाम आहे शिया आणि सुन्नी या फरकासह अन्य काही मुद्यांवर पाकिस्तान आणि इराण यांचे तीव्र मतभेत आहेत सध्या भारत याच इराणच्या मदतीने मध्य आशियातील देशांशी आणि अफगाणिस्तानशी वायपर करतो त्या पार्श्वभूमीवर भारत अध्यक्ष असताना इराणचा समावेश या संघटनेत होणे खूपच आनंदायक आहे
   या खेरीज भारताला पुढील वर्षी अर्थात २०२३ साली जी २० या संघटनेचे सुद्धा अध्यक्षपद मिळणार आहे जगातील पहिल्या २० मोठ्या अर्थव्यस्थेच्या समूह म्हणून या संघटनेची ओळख आहे  या संघटनेची स्थापना १९९०च्या दशकात  दक्षिण पूर्व आशिया ( ज्या भूभागाला इंडो चायना भूभाग देखील म्हणतात  या भागातील देशांवर भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संस्कृतीचा प्रभाव आढळतो या देशांची संघटना  म्हणून आशियान ओळखली जाते ) आणि दक्षिण आशिया खंडात आलेल्या आर्थिक संकटाची पुनरावर्ती होऊ नये या उद्देश्याने १९९९ साली करण्यात आली या संघटनेत ऊत्तर अमेरिका खंडातील कॅनडा , अमेरिका मेक्सिको , दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील अर्जेंटिना युरोप खंडातील युके , फ्रांस , जर्मनी रशिया  , आशिया खंडातील भारत , जपान चीन सौदी अरेबिया , दक्षिण कोरिया , इंडोनेशिया , जपान तुर्कीये ( पूर्वीचे नाव तुर्की )आफ्रिका खंडातील दक्षिण 
आफ्रिका आणि ऑस्टेलिया हे देश तर युरोपीय युनियन हि संघटना आदी सदस्य आहेत या संघटनेची अध्यक्षीय कार्यवाही  troika.या गटातर्फे करण्यात येते या गटात मागील वर्षी अध्यक्ष असणारा देश या वर्षी अध्यक्ष असणारा देश तसेच पुढील वर्षी अध्यक्ष असणारा देश या तीन देशांचा समावेश होतो भारत अध्यक्षपदी असताना  troika. या गटात भारताबरोबर इंडोनेशिया आणि ब्राझील हे दोन देश असणार आहेत भारतने आपला अध्यक्षपदाचा अधिकार वापरत बांगलादेश युनाटेड अरब अमिरात . सिंगापूर स्पेन इजिप्त ,ओमान , मॉरिशियस , नेदरलँड आणिनायजेरिया या देशांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे त्यामुळे या देशांशी भारताचे विशेष व्यापारी संबंध प्रस्थापित होतील  एकंदरीत पुढील वर्ष २०२३ हे भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात खूप महत्त्वाचे ठरणार हे नक्की जो २०२४ च्या निवडणुकीत कळीचा मुदा ठरू शकतो हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?