क्रीडांगण झाले युद्धभूमी

  


  खेळाडूंनी कोणताही खेळ खिलाडूवृत्तीने खेळावा ,त्यात वैरभावना नसावी , अशी सर्वसाधारण मान्यता आहे . खेळ संपल्यावर खेळाडू एकमेकांचे हस्तालोंदन देखील याच भावनेने करतात की खेळ संपला आहे खेळात यशस्वी होण्यासाठी जी वैरभावना बाळगली होती ती मी सोडून देत आहे तू देखील सोडत आहे आपण सर्व मानवजात म्हणून एकत्र होऊयाखेळाच्या सुरवातीला जेव्हा देशाचे राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा खेळाडूंच्या समोर लहान मुलांची रांग याच न्यायाने असते कि मी या लहान मुलांसारखा निरागसतेने खेळणार आहे लहान मुले ज्याप्रमाणे क्षणात भांडतात दुसऱ्या क्षणाला एकत्र येतात मनात कोणतीच वैरभावना ठेवत नाही त्या प्रकारे मी समोरच्या खेळाडूंशी फक्त या सामन्यापर्यतच वैरभावना ठेवेल सामान संपल्यावर मी त्याच्याशी मित्रत्वाची भावना ठेवेल असे खेळाडू अप्रत्यक्षरीत्या खेळाडू लहान मुलाच्या मार्फत कबूल करत असतो असे समजण्यात येत असते खेळाडू देखील हे अप्रत्यक्षरीत्या हे बंधन मान्य करूनच खेळत असतो खेळाडूंना समर्थन करणाऱ्या प्रेक्षकांनी देखील याच प्रकारे वर्तन करावे . खेळाचा आंनद स्वतः घ्यावा विरोधी खेळाडूचे समर्थन करणाऱ्या खेळाडूंना देखील घेता येईल असे वर्तन सामन्याच्या वेळी घ्यावे . आपण करतोय त्या खेळाडूच्या विरोधी खेळाडूला समर्थन करणाऱ्या प्रेक्षक आपला शत्रू समजून त्याच्याशी वागू नये जर आपण समर्थन करतोय तो खेळाडू हरला तर शांतपणे तो पराभव स्वीकारत विजयी खेळाडूचे त्याला समर्थन देणाऱ्या प्रेक्षकांचे अभिनंदन करावे अशी अपेक्षा प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात येत असते . अपवाद वगळता प्रेक्षकांकडून पूर्ण देखील करण्यात येत असते

दुर्दैवाने ऑक्टोबर २०२२ रोजी इंदडोनेशिया देशातील मलंग शहारात झालेली फ़ुटबाँल स्पर्धा याला अपवाद ठरली इंडोनेशिया बीआरआई लीग या स्पर्धेत अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय  या दोन संघात झालेलया सामन्याला हिंसाचाराचे गालबोट लागले हा  सामना पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करत - ने सामना जिंकला. या सामन्यानंतर पराभूत झालेल्या अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. यावेळी नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी आश्रू धुराच्या कांड्याचा मारा केला पोलिसांच्या या

.कृतीमुळे स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला आणि स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये ३४ जणांचा जागीच मृत्यू झाला  तर १८० हुन अधिक जण गंभीर जखमी झाले हा लेख लिहण्यापर्यंत जागीच मृत्यू झालेले आणि रुग्ण्यालयात  उपचार  सुरु असताना प्राणास  मुकलेल्या लोकांचा एकत्रित आकडा १७४वर पोहोचला असून हा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे 

    गेल्या दोन महिन्याचा विचार करता आपला संघ पराभूत झाला म्हणून समर्थकांनी स्टेडियम मध्ये गोंधळ घालण्याची ही दुसरी घटना या आधी आशिया टी २० पुरुष करंडकात  अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान सुद्धा अफगाणिस्तान सामन्यात हरल्यावर अशीच स्थिती उदभवली होती त्यावेळी नाराज अफगाणिस्तान लोकांनी स्टेडियमची मोडतोड करत पाकिस्तानी लोकांना काही प्रमाणत मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे एखाद्या गोष्टीला किती महत्व देयचे ? भावनेत वाहवत गेल्यास सरतेशेवटी लोकांचेच नुकसान होते हे लोकांना शिकवण्याची गरज स्पष्ट होत आहे  खेळातील हारजीत म्हणजे देशाचा अपमान नसतो तर त्यावेळी आपल्या संघापेक्षा दुसऱ्या संघाने चांगली कामगिरी केल्याने हरलेली तात्पुरती झालेली हार असते सैन्यात भरती होताना अनेक देशात सैनिकांना युद्धात एखादी चढाई जिंकली किंवा हारली म्हणजे आपण युद्ध जिंकले किंवा हरलो असे समजू नये असे शिकवण्यात येते त्याच प्रकारे प्रेक्षकांना 

समजावणे आवश्यक आहे नाहीतरी सामने विना प्रेक्षक घेण्याशिवाय खेळाच्या संघटानां पर्याय राहणार नाही जर अश्या स्पर्धा झाल्यास यात खेळणाऱ्या खेळाडूंना देखील फारसा उत्साह वाटणार नाही कारण कोणत्याही खेळाडूंना खेळताना प्रेक्षकांचा मिळणार पाठिंबा खेळण्यासाठी प्रेरणा देत असतो ज्यामुळे त्यांच्यातून सर्वोत्तमाचे प्रदर्शन होते ज्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा आंनद मिळतो स्टेडियम मध्ये प्रेक्षक नसल्यास होणारे निरस सामने बघण्यात आणि खेळण्यात कोणालाच मज्जा येणार नाही तेव्हा हे प्रेक्षकांनो खेळाची मज्जा लूट मात्र त्यात वाहवत जाता हेच हि घटना आपणस सांगत आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?