इंग्रजीत्तेर भाषेत व्यावसाईक शिक्षण कितपत योग्य ?

       

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम इंग्रजीत्तेर भाषेत आणण्यासाठी केंद्र सरकारतर्फे करत असलेले प्रयत्न जनतेसमोर यावेत यासाठी त्या अभ्यासक्रमाचे हिंदी अनुवादित पुस्तक हातात घेतल्याचा फोटो समाज माध्यमांमध्ये बराच पसरला असल्याचे आपणस गेल्या काही दिवसात दिसेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा इंग्रजी फक्त एक संभाषणाचे माध्यम असल्याचे  आणि ती भाषा येते कि नाही यावर बुद्धिमत्ता ठरत नसल्यचे विधान केले .त्यामुळे देशभरात जर्मन आणि जपान या देशाचा हवाला देत मार्तृभाषेत शिक्षण देण्याचा गोष्टीवर एकाच चर्चा सुरु झाली  मात्र या सर्व गदारोळात एक गोष्ट सोईस्कर विसरली गेली की ,  या संवादाच्या माध्यमात प्रचंड प्रमाणात ज्ञानसाठा आहे, तो स्वतः च्या भाषेत आणून स्वभाषिकांना देण्याऐवजी त्यांनाच या भाषेत पारांगत करणे आवश्यक आहे. तहानलेल्या लोकांना जागेवर पाणी आणून देण्याऐवजी ते तहान लागल्यावर स्वतः पाण्याचा ठिकाणी जातील इतके सक्षम करणे योग्य नाही का?  जपान या देशात सुद्धा आता इंग्रजीचे महत्व समजून त्याला अनुसरून पाऊले उचलली जात आहे प्रामुख्याने  भारतातील ग्रामीण विद्यार्थ्यांना इंगजी भाषेची अडचण येते हे लक्षात घेऊन त्यांना ती का येते याबाबाबत अभ्यास करुय्न त्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी काम करावे त्यांना अडचण येते म्हणून पुस्तके मराठीत आणणे पूर्णतः चुकीचे आहे मात्र आपल्या भारतात समस्येच्या मुळापर्यंत जाऊन ती सोडवण्यासासाठी कार्य करण्याच्या ऐवजी वरवरचे थातुर मातुर उपाय केले जातात व्यवसायिक शिक्षण इंगजीत्तेर भाषेत अनुवादित करण्याचा उपाय देखील मला त्याच मालिकेतील वाटतो  ज्यांना इंग्रजीतून शिक्षण घेण्याच्या ऐवजी मातृ भाषेतून  शिक्षण घ्यावेसे वाटते त्याना इंगजीतून शिक्षण घेता येईल इतके सक्षम करणे हाच या समस्येतवर उपाय आहे  मातृभाषेत व्यक्ती इतर भाषेपेक्षा अधिक सहजतेने विकव्हर करू शकत असला तरी इंगजीतत्तेर भाषेत असणारे ज्ञान आणि इंग्रजी भाषेत असणारे ज्ञान याचा विचार करता हा मुदा येथेकुचकामी पडतो असे मला वाटते . 
          मात्र पुस्तके इंग्रजीत्तेर भाषेत अनुवादित करायचीच झाल्यास  माझ्या आतापर्यतच्या अनुभवानूसार पुढील गोष्टीचा अवलंब केल्यास हे कार्य अधिक उत्तम होईल तर  इंग्रजी भाषेतून ज्ञान आणताना संकल्पना मराठीत समजेल अशी न करता परीभाषिक संज्ञांचे अगम्य भाषेत भाषांतर केले जाते.जसे काँम्पुटर ही संकल्पना मराठीतसमजावून सांगताना विनाकारण संगणक हा शद्ब वापरणे, जग काँम्पुटर हा शद्ब वापरत असताना संगणक हा शद्ब वापल्याने पुढे इंग्रजीत शिकताना शद्बाचा गोंधळ उडु शकतो.काँम्पुटर ला काँम्पुटर हा शद्बच वापरुन संकल्पना मराठीत सांगितल्यासच ती व्यक्ती पुढे काँम्पुटरचे प्रगत शिक्षण घेवू शकते. हाच नियम मेडिकल फिल्डसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अच्युत गोडबोले यांनी मराठीत सुद्धा तंत्रज्ञानाची माहिती सहजपणे देता येऊ शकते हे स्पष्ट केले आहे त्यांच्या   आर्टिफिशियल इलिजिशियन्स , किमयागार या  सारख्या पुस्तकाचे वाचन केल्यास हि संकल्पना अधिक सहजतने स्पष्ट होईल त्यांनी तंत्रज्ञानाविषयी लिहताना मुले इंग्रजी पारिभाषिक शब्द तसेच ठेवले आहेत व्यावसायिक शिक्षण देण्यसासाठी पुस्तकाने तयार करताना शिव गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे 
        मी  नाशिकच्या वाय. सी. एम. ओ. यु मधून एम.  बी.  ए.  करताना माझी मुळातील शैक्षणिक पार्श्वभूमी कॉमर्सची नसल्याने अभ्यासाला सोईस्कर व्हावे म्हणून ११ वी आणि १२ विची कॉमर्सची पुस्तके आणली मराठीतून विषय सहजतेने समजेल  असे मानून मराठी भाषेतील पुस्तके आणली मात्र त्यातील मराठी बघून ती पुन्हा विकून इंग्रजी भाषेतील पुस्तके आणली आणि विषय समजावून घेतली सांगायचा मुद्दा अशा की इंग्रजीत्तेर भाषेत तंत्रज्ञाची पुस्तके आणताना भीक नको पण कुत्रा वावर या न्यायाने इंग्रजी भाषा परवडली पण त्यांचे मातृभाषेतील भाषांतरं नको अशी स्थिती नको येयला तसे झाल्यास मूळ उद्देशच पूर्ण होत नसल्याने त्यावरचा खर्च पूर्ण वाया जाईल जे कदापि योग्य ठरणार नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?