अखेर ठरलं !

 


समस्त पाकिस्तान ज्या आंदोलनाची वाट बघत होता त्या इम्रान खान यांच्या हक्कीकी आझादी या आंदोलनाची तारीख अखेरजाहीर झाली आहे . मंगळवार २५ ऑक्टोबर रोज पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी आयोजित बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत इम्रान खान यांनी आंदोलनाच्या तारखा जाहीर केल्या अपेक्षेप्रमाणे  तारीख जाहीर केल्यापासून तीनच दिवसात हे आंदोलन सुरु होणार आहे . लाहोरच्या सुप्रसिद्ध अश्या लिबर्टी चौकातून शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी वेळेनुसार सकाळी ११ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेअकरा ) हे आंदोलन सुरु होईल . या आंदोलनात इम्रान खान यांच्या नेर्तृत्वात इस्लामाबादच्या दिशेने मोर्चा काढण्यात येऊन पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे न्ययालयाने आधीच ठरवून दिलेल्या जागेवर येऊन थांबेल .पाकिस्तानमधील महत्त्वाचा  विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरिके इन्साफ या पक्षाचे नेते अझद उमर यांनी विविध ट्विटद्वारे दिलेल्या महितीनुसार  पक्षाचे कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी इस्लामाबादकडे कूच करतील   सुप्रसिद्ध ग्रँड टॅंक मार्गाने आंदोलनास सुरवात होईल पक्षाचे कार्यकर्ते मुरीदके, कामोंकी, गुजरांवाला, डस्का, सियालकोट, सांबर्याल, वजिराबाद, गुजरात, लाला मुसा, खारियन, झेलम, गुजर खान आणि रावळपिंडी. मार्गे नोव्हेंबर रोजी इस्लामाबादला पोहेचेल

हा लेख लिहण्यापर्यंत (बुधवार २६ ऑक्टोबर सायंकाळी सातचा  सुमार )  या आंदोलनाबाबत पाकिस्तानात मोठा उद्योगसमूहासारखा कारभार असलेल्या पाकिस्तानी लष्कराकडून काहीही प्रतिक्रिया  देण्यात आलेली नाही पाकिस्तानात लष्करकडून खाद्यपदार्थ , कपडे अंघोळीचे कपडे धुवायचे साहित्य , तसेच अनेक गृहपयोगी वस्तूंचे निर्मितीचे कारखाने चालवले जातात एका उद्योगसमूहासारखा पाकिस्तानी लष्करासारखा कारभार आहे त्याच प्रमाणे पाकिस्तानी राजकारणात तेथील लष्कराची भूमिका महत्त्वाची असते कधीकधी ही भूमिका लष्करी उठावाच्या रूपाने उघड उघड असते किंवा कळसूत्री बाहुल्याप्रमाणे राजकारण्याच्या असून असते मात्र याबाबत पाकिस्तानी लष्कराने काहीच भूमिका जाहीर केल्याने अशचर्य व्यक्त करण्यात येत आहे एप्रिलपासून उघडपणे  असलेल्या या सत्तानाट्यात आतापर्यंत लष्कराने कोणाचीही उघड बाजू घेतलेली नाही मात्र लष्कराची नाराजी झाल्यानेच इम्रान खान यांची सत्ता घालवण्यास विरोधी पक्षांना मदत झाली हे उघड उघड गुपित आहे मात्र देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानी लष्कर  पुन्हा एकदा इम्रान खान यांना मदत करण्याची शक्यता आलं जझीरा वाहिनीकडून व्यक्त करण्यात येत आहे तसेच पाकिस्तानात ठिकठिकाणी झालेल्या इम्रान खान यांच्या राजकीय सभांना मिळणारा जनतेचा पाठिंबा बघता या मोर्च्यात मोठ्या प्रमाणत  जनसागर उसळेल हि नक्की

या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद पोलिसंनी पूर्ण तयार केल्याचे डाँनच्या बातमीत सांगण्यात आले आहे या बातमीत सांगितल्याप्रमाणे  दोन पोलिस उपमहानिरीक्षक, चार वरिष्ठ पोलिस अधीक्षक आणि 11 पोलिस अधीक्षकांसह एकूण 13,086 अधिकारी  तीस सहायक पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपअधीक्षकशिवाय, मोर्चादरम्यान 4,265 फ्रंटियर कॉर्प्स अधिकारी, 3,600 रेंजर्सचे कर्मचारी आणि सिंध पोलिसांचे 1,022 पोलीस

कर्मचारी कर्तव्यावर असतील.अधिकाऱ्यांना 616 अश्रुधुराच्या बंदुका, 50,050 गोले, 611 बारा बोअरच्या बंदुका आणि 36,700 राउंड देण्यात येणार आहेत. शिवाय, 2,430 मास्क आणि 374 वाहनेही पोलिसांना देण्यात येणार आहेत.

      पाकिस्तानी सत्ताधिकारी वर्गामध्ये इम्रान खान इतर राजकारण्यापेक्षा जास्त भारतविरोधी समजले जातात. त्यामुळे त्यांचे बळ वाढणे भारताला तितकेसे चांगले नाही तसेच इम्रान खान यांच्या या  राजकीय उलथापालथीमुळे पाकिस्तानात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याचा मोठा धोका उत्पन होतोय .या धोक्यामुळे पाकिस्तानात लष्करी उठाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आधी पाकिस्तानात जेव्हा जेव्हा लष्करी उठाव झाले आहेत, तेव्हा भारत आणि पाकिस्तानातील राजनैतिक सबंध न्युनतमच्या न्युनतम जवळपास शुन्यवत पातळीवर आल्याचा, आणि काश्मीरमध्ये दहशतवादाच्या कारवाया वाढल्याचा  इतिहास आहे. भारत सध्या मध्य आशियाई देशांसी मोठ्या प्रमाणात व्यापार करतो जो इराण अफगाणिस्तान या लांबच्या मार्गाने होतो.जो पाकिस्तान मार्गे झाल्यास भारताला चांगले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान मधील राजनैतिक सबंध किमान पातळीवर राहणे आवश्यक आहे. पाकिस्तान जगातील इस्लाम हा प्रमुख धर्म असलेल्या देशाची संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज या ५१ देशांच्या संघटनेतील एकमेव अण्वस्त्र असणारे राष्ट्र आहे जर पाकिस्तानात  अशांतता निर्माण झाल्यास तेथील अण्वस्त्रे अयोग्य हातात पडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही तसे झाल्यास होणारे संकट महाभयानक असेल

पाकिस्तानमधील औद्योगिकदृष्टया सर्व महत्त्वाची शहरे भारतीय सीमेपासून जवळच आहे तसेच पाकिस्तानची जवळपास ६० % लोकसंख्या भारतीय सीमेलगतच राहते  जगातील सर्वात जास्त क्रीडा साहित्य निर्माण करणारे पाकिस्तानी शहर सियालकोट  भारतीय सीमेपासून फक्त १५ किलोमीटर दूर आहे  पाकिस्तान अशांत झाल्यास तेथील जनता पाकिस्तानच्या अन्य शेजारील देश आणि इराण आणि अफगाणिस्तानमध्ये आश्रयास जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे इराण महिलांच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नावरून सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून धुमसतो आहे अफगाणिस्तानमध्ये तालिबाबानचे अत्याचारामुळे तेथिल आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे पाकिस्तानने अनधिकृतरित्या आपल्या ताब्यात ठेवलेल्या काश्मीरच्या भूभागाला चीनच्या सिकियांग  हा प्रांत लागून आहे त्या त्या ठिकाणी असलेल्या मुस्लिम बांधवांवर चिनी सरकार अत्याचार करते असे सातत्याने बोलले जाते त्यामुळे पाकिस्तानात  अशांत झाल्यास तेथील जनता  भारतातच येणार हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही  काही जण या निमित्याने पाकिस्तानचे तुकडे पडून अखंड भारताचे स्वप्न साकारेल अशी अशी अशा व्यक्त करतील त्यांना मी सांगू इच्छितो कि चीनचे भारत विरोधी राजकारण आणि अमेरिकेचे अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील राजकारण होऊ देणार आंही तसेही पाकिस्तानमधील मुस्लिम बांधव आणि हिंदू धर्मियांची संख्या बघता जर पाकिस्तानचे तुकडे पडून भारतात आल्यास लोकसंख्येचा समतोल बिघतल्याने नव्या समस्येचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि त्यामुळे पाकिस्तान  राजकीय आणि आर्थिक समस्येच्या चक्रव्हयूयातुन बाहेर पाडण्यातच भारताचे हित आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?