भारताची सीमा वाढवणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी

         

      इंदीरा गांधी ! भारताच्या कणखर पंतप्रधांपैकी एक असणाऱ्या पंतप्रधान. लाल बहादूर शास्त्री यांचा तास्कंद शहरात संशयास्पद मृत्यू झाल्यावर,  भारताच्या कायम पंतप्रधानपदी आलेल्या तिसऱ्या व्यक्ती म्हणजे इंदीरा गांधी . येत्या सोमवारी त्यांची ३८ वी पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली. इंदीरा गांधीच्या कर्तृत्वाबाबत बोलताना कायम बांगलादेशाचे उदाहरण दिले जाते.मात्र पाकिस्तानचे दोन तूकडे करण्याबरोबरच भारताचे भौगोलिक क्षेत्रात वाढ करत ,अमेरिकेचा हस्तक होण्याकडे वाटचाल करणाऱ्या इशान्य भारताच्या सुरक्षीततेचा विचार करता अत्यंत महत्तवाच्या जागेवर असणाऱ्या  एका देशाला भारताचा भुभाग करण्याचा त्यांचा योगदानाबाबत फारच कमी बोलले जाते.सोमवारी असणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त या मुद्दयावर बोलण्यासाठी आजचे लेखन .

       मित्रांनो आज आपण  भारताचा नकाशा बघीतल्यास  त्यामध्ये पुर्व भागात बांगलादेश नेपाळ ,भुतान या तीन देशाच्या सिमा जिथे एकत्र येतात त्या  सुप्रसिद्ध सिलीगुडी काँरीडाँरनंतर आपणास भारताचा नकाशा काहीसा रूंदवललेला दिसतो.हा रुंदवलेला भाग असतो सिक्कीमचा.  .जे 1975 पर्यत स्वतंत्र राष्ट्र होते ,मात्र इंदिरा गांधीच्या कर्तुत्वामुळे, मुत्सद्दीपणामुळे १९७५जून ३ रोजी भारताचा भाग झाले.
                १९७५ च्या वेळी सिक्कीम बऱ्याचा मोठ्या प्रमाणात अमेरीकेकडे झूकु लागला होता.पाकिस्तान अमेरीकेकडे पुर्णतः झुकलेला असताना भारताच्या पूर्वेकडे सुद्धा अमेरिकेचे हस्तक असणारे राष्ट्र तयार होणे
भारताला चिंताजनक होते तसेच सिकिकमचे भौगोलिक स्थान बघता ईशान्य भारताच्या सुरक्षिततेचा विचार अत्यंत मोक्याचा स्थानी होत .तेथून चीनचा प्रदेश अत्यंत जवळ होता . तसेच नेपाळ आणि नुकताच जन्म झालेल्या बांगलादेशच्या सीमा जवळ होत्या जेमतेम ४ वर्षांपूर्वी १९७१ साली असं राज्याचे पुर्नगठन करून तेथील असांतोषाला काहीशी मोकळी वाट करून दिलेली असली तरी भविष्यातील गरजा लक्षात घेता त्या भागाकडे अधिक लक्ष देण्याची गरज होती  भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात असणाऱ्या दार्जलिंग भागात असंतोष वाढत होता . तसेच पश्चिम बंगाल राज्यात वाढणारी पाण्याची गरज लक्षात घेता पश्चिम बंगाल च्या पाण्याचा मुख्य स्रोत स्वतःकडे असणे भारतसासाठी आवश्यक होते या सर्व पार्श्वभूमीवर भारताच्या  छोट्या राज्याचा आकाराचे राष्ट्र स्वतंत्र्य राहणे भारतासाठी धोकादायक होते त्यामुळे जनतेत राजाविरोधात असांतोष निर्माण करून त्या असांतोषचा फायदा घेत सिक्कीमला भारताचा भाग करणे या बाबत इंदिरा गांधींचे कौतुक करायलाच हवे 
      इंटरनेटवर सिक्कीमच्या भारतातील विलीनीकरणाबाबत असणाऱ्या माहितीचा आढावा घेतल्यास सिकीमची राणी हि अमेरिकेची गुप्तहेर संघटन सीआयएची एजंट असल्याची माहिती समोर येते या राणीची  सिक्कीमच्या प्रशासनावर मोठ्या प्रमाणत पकड होती तिचा सिक्कीमच्या  परराष्ट्र धोरणात  होणाऱ्या भारताच्या हस्तक्षेपाला प्रचंड विरोध होता अशी माहिती मिळते हि माहिती खरी धरल्यास इंदिरा गांधी यांनी किती प्रचंड समस्येचा सामना करत  सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करून घेतले असेल याची कल्पनाच केलेली बरी 
          इंदिरा गांधींच्या प्रशासनाचे मूल्यमापन करताना आणीबाणीचा सातत्याने उल्लेख करण्यात येतो मात्र त्याबरोबर त्याच वर्षी घडलेल्या या घटनेच्या उल्लेख मात्र फारसा केला जात नाही इंदिरा गांधींच्या प्रशासनात आणीबाणी घोषित करणे  आणि पंजाबमध्ये धार्मिक राजकारणाचा पाया घालणे ( या धार्मिक द्वेषाची किंमत त्यांनी प्राणाचे मोल देऊन दिली ) या चुका झाल्यातरी बांगलादेशची निर्मिती आणि सिक्कीमचे भारतात पूर्णतः विलीनीकरण या बाबत त्यांचे कौतुक करायलाच हवे इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्य त्यांना सिक्कीमच्याविलीनीकरबाबत त्यांचे श्रेयदेयलाच हवे त्यामुळे भारताचा जगाचा भूगोल त्यातही दक्षिण आशियाचा भूगोल पूर्णतः बदलला ज्याची चांगली फळे आपण सध्या चाखत आहोत हे नाकरण्यता काही अर्थ नाही त्यामुळे पुण्यतितिनिमित्याने का होईना त्यांच्या कार्यास वंदन करायलाच हवे तर आणि तरच पण भारतीय म्हणण्यास पात्र ठरू हे मात्र नक्की 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?