राज्यांच्या स्थापना दिवसांच्या निमित्याने

     


 वर्षातील काही दिवस हे मोठे विलक्षण असतातत्या दिवशी अनेक घडामोड घडल्या असल्याने त्या दिवाशांना विलक्षण महत्व आलेले असते . आपल्या भारताचा विचार केला असता नोव्हेंबर हा त्या दिवसांपैकीच एक . आपल्या भारतात असणाऱ्या , तामिळनाडू, केरळ, कर्नाटक,आंध्रप्रदेश छत्तीसगढ, मध्यप्रदेश ,राजस्थान, पंजाब आणि हरीयाणा  ही ती ९राज्ये तर पड्डुचेरी (जूने नाव पाँडेचरी),अंदमान निकोबार , लक्षद्वीप, दिल्ली तसेच चंडीगढ या ५ केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस एकच १नोव्हेंबर असतो. आपल्या भारतात २८ राज्ये आहेत त्यापैकी ९    राज्ये म्हणजेच सुमारे १/३ राज्ये आणि ८ केंद्रांशासीत प्रदेशांपैकी ५ म्हणजेच जवळपास निम्या केंद्रशासित प्रदेशांचा दिवस हा १ नोव्हेंबर असतो 

          आपल्या भारतात प्रशासनाच्या सोयीनुसार राज्याची निर्मिती किंवा विलय केला जातो. त्यासाठी संविधानाच्या पहिल्या भागात तरतुदी करण्यात आल्या आहेत संविधानाची कलमे सांगायची झाल्यास संविधानाची पहिली पाच कलमे त्याविषयी सांगतात आपले संविधान संघराज्य पद्धतीचे मात्र केंद्रीय सत्ता कहीसी प्रबळ करणारे आहे.केंद्र सरकार त्यांच्या सोयीने राज्य निर्मिती करू शकते  अमेरीका या देशात विविध राज्यांनी स्व हितासाठी एकत्र येत संघराज्य स्थापन केले आणि अमेरीका हा देश तयार झाला. आपल्या भारतात तसे झाले नाही. पहिले देश तयार झाला मग त्याचे विविध राज्यात विभाजन करण्यात आले. आजमितीस भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.

ब्रिटिशांपासून स्वतंत्र्य मिळाल्यावर १९५६ साली देशात राज्य निर्मितीचा मुद्दा चर्चेत येण्यास सुरवात झाली एका भाषिकांचे एक राज्य केल्यास प्रशासनास सोईस्कर होईल या मागणीतून भाषावार प्रांत रचना करावी हा मुद्दा पुढे आला या मुद्याच्या अभ्यास करण्यसाठी १९५६ साली विशेष  अयोग्य नेमण्यात आला जो धार आयोग म्हणून प्रसिद्ध आहे , या आयोगाने भाषावार प्रांत रचनेस मान्यता दिली मात्र गुजराती आणि मराठी भाषिकांसाठी एकच राज्य

सुचवले . त्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करण्यात येऊन पुढे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती करण्यात आली आंध्र प्रदेश हे देशातील पहिले भाषवर निर्मित पहिले राज्य राज्यात भाषावार प्रमाणेच प्रशासनाच्या सोयीसाठी राज्य निर्मिती करण्यात आली  मध्यप्रदेशमधून छत्तीसगढ , उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड ,पंजाब राज्यातून हिमाचल प्रदेश आणि हरियाणा या दोन राज्याची निर्मिती ही त्याच्चह रूपे होय त्याच प्रमाणे लोक आग्रहास्तव देखील तेलंगणा आणि झारखंड आदी राज्याची निर्मिती करण्यात आली 

ब्रिटीश भारतात असणाऱ्या विध्य प्रदेश राज्य सध्याचा मध्यप्रदेशात समाविष्ठ करण्यात आले तसेच पूर्वीच्या सेंटर अँड बिरारी प्रोव्हिन्सचा मराठी भाषिक प्रदेश . महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आला या प्रदेशाला आपण आज विदर्भ म्हणतो याच राज्यातील हिंदी भाषिकांचे मध्यप्रदेश हे राज्य तयार करण्यात आले तर पूर्वीच्या मुबई राज्यातील कन्नड भाषिकांच्या प्रदेश तसेच त्या लागतच मराठी भाषिक प्रदेश कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आला तसेच पूर्वीच्या मद्रास राज्यातील तेलगू भाषिक प्रदेश आंध्रप्रदेश राज्यात समाविष्ट करण्यात आला  या खेरीज अन्य कोणताही प्रदेश दुसऱ्या राज्यात समाविष्ट करण्यात आलेला नाही 

प्रशासन करणे सोइचे व्हावे, यासाठी भारतात पंडीत नेहरु डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध असून, देखील भाषावार प्रांतरचना करण्यात आली. एक भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचे एक राज्य या निकष यासाठी अमंलात आणला गेला होता. पंडीत नेहरु डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते भाषावर प्रांतरचना केल्यास प्रांतिक अस्मिता मोठ्या होतील, ज्यामुळे देशाच्या एकात्मतेला खीळ बसेल. सध्याची स्थिती त्यांची भिती काहीसी खरी ठरवणारी आहे, असे दिसत आहे, असो.

भारतात आजमितीस 28 राज्ये असली तरी नवीन राज्य निर्मितीच्या मागण्या मोठ्या संख्येने आहेत.अमेरीकेत 50 राज्ये आहेत.तर भारतात का नको? असा मुद्दा यासाठी मांडण्यात येतो. अमेरीकेची लोकसंख्या, भारताची

लोकसंख्या, भारताचे क्षेत्रफळ, अमेरीकेचे क्षेत्रफळ लोकसंख्येची घनता या घटकांचा विचार या मुद्दयांवर भांडताना करायला हवा याचा मात्र सोइस्कर विसर नव्या राज्यांची मागणी करताना होतो.

आज भारतात , कर्नाटक मधून हैद्राबाद कर्नाटक, बाँम्बे कर्नाटक या  प्रादेशिक भागांचे एकत्र स्वतंत्र राज्य,  महाराष्ट्रातून विदर्भ , बिहार मधून मिथांचल, पश्चिम बंगाल दार्जलिंग, आसाम राज्यातून ब्रम्हपुत्रा, तसेच महाराष्ट्र ,गुजरात, मध्यप्रदेश यांच्या सिमा जिथे एकत्र येतात त्या आदिवासी भागासाठी स्वतंत्र भिल्ल प्रदेश तामिळनाडू मधुन स्वतंत्र उत्तर तामिळनाडू,पश्चिम बंगालमधून बोडोलँड ,. त्रिपुरा राज्यातून टिपरालँड उत्तरप्रदेशमधून हरित प्रदेश , बुंदेलखंड राजस्थानातून राजपुताना  आदी अनेक राज्यांचा मागण्या आहेत.त्या पुर्ण करणे अथवा करणे पुर्णपणे संसदेच्या हातात आहे. सध्या स्वतंत्र छोट्या राज्यामुळे प्रदेशाचा विकास होतो असी विचारधारा असणाऱ्या भाजपाची सत्ता आहे.मात्र कोणीही सरकारी यंत्रणेतील व्यक्ती त्यावर मतप्रदर्शन करत नाहीये.त्यामूळे हा मुद्दा बासनातच बांधल्या गेल्याचे दिसत आहे. असो 

भारतात राज्य निर्मितीचे नेहमीच राजकारण केले जाते. त्याचेच प्रत्यंतर सध्या दिसत आहे. अस्मिता जागवल्या जातात  जे सर्वथा अयोग्य आहे. भारत जगातील उभरती महासत्ता आहे. तीला या राजकारणाने खीळ बसू नये, असी सदिच्छा व्यक्त करुन आपली रजा घेतो, नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?