बदलणारे पर्जन्य अणि भारतीय

  


 
आपल्या भारतात जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूमचा कालावधी मानण्यात येतो . त्यामुळे दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी भारतीय हवामान खात्यातर्फे दरवर्षी  ३० सप्टेंबर रोजी देशभरतत  मान्सूमचा पाऊस किती पडला ?याची आकडेवारी जाहीर करण्यात येते . तशी ती याही वर्षी जाहीर करण्यात आली मात्र यावर्षी जाहीर करण्यात आलेली आकडेवारी नेमेची येतो पावसाळा या म्हणीनुसार दुर्ल्क्ष करण्यासारखी नाही देशात दरवर्षी पडणारा  सरासरी पाऊस जर १००% समजला तर या वर्षी तो १०६ % पाऊस पडलेला आहे . मात्र त्याचे वितरण अत्यंत विषम आहे बिहार राज्यात सरासरीपेक्षा 31%, उत्तर प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा 28% , झारखंडमध्ये सरासरीच्या 20% आणि मणिपूरमध्ये 48% तर , त्रिपूरा आणि मिझोराममध्ये अनुक्रमे 24%, 22% पाऊस कमी पाऊस झाला आहे तर आपल्या महाराष्ट्रमध्ये सरासरीपेक्षा 23% , मध्यप्रदेशात 23% , गुजरात राज्यात 27 तर , तेलंगाणा आणि , तामिळनाडू अनुक्रमे 46 आणि 45% जास्त पाऊस झाला आहे देशाच्या सरारीमध्ये फारसा नकारात्मक बदल नसला तरी देशांतर्गत वितरण चिंता वाढवणारे आहे पाऊस कमी पडल्याने उत्तर प्रदेश . बिहार , झारखंड , मिझोराम मणिपूरत्रिपुरा राज्यात अवर्षणाचे संकट निर्माण झाले तर कमी पावसामुळे तेथील शेती मोठ्या संकटात सापडली आहे तर मध्यप्रदेश .गुजरात . महाराष्ट्र . तेलंगणा तामिळनाडू या राज्यता ओला दुष्काळ निर्माण झाली आहे तेथील शेती पिके जास्त पाऊसामुळे नष्ट झाली आहे 

           त्यामुळे जर हा प्रकार असाच कायम राहिला तर भविष्यात राहिला तर मोठे गंभीर प्रश्न निर्माण होणार हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाहीये त्यामुळे जर या वर्षी जसा पाऊस पडला तसा जर सातत्याने घडल्यास काय करायचे ? याचा विचार करून आवश्यक ती कार्यवाहीची अंमलबाजवणी आताच करणे गरजेचे आहे  जास्त आणि कमी दोन्ही प्रकारच्या पाऊसात तग  धरू शकतील अस्या प्रकारची पीक पद्धती शेतकऱयांच्या बांधावर आणण्याची गरज आहे . कृषी विद्यापीठामध्ये यावर संशोधन सुरु असेलच मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांना देण्याची वेळ आली आहे . तसेच याबाबत सर्वसामान्यना माहिती देऊन यासाठी तयार करण्याची

सुद्धा गरज आहे याबाबत काय करायचे ,काय टाळायचे याबाबत शासकीय यंत्रणेचे अहवाल तयार असतीलच ते फक्त कर्मचाऱयांच्या टेबलवरच पडून राहण्यापेक्षा त्याबाबत समाजात जनजागृती करण्याची गरज आहे . माध्यमांनी देखील इतर भावनिक मुद्यावर बातम्यांचे दळण दळण्याबरोबर याही मुद्यांवर बातम्या दाखवणे अत्यावश्यक आहे  

        हे  पावसाचे संकट समस्त मानवजातीसमोरचे संकट आहे हे संकट एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांबाबबत कमी त्रासदायक एका विशिष्ट जाती धर्माच्या बाबतीत कमी त्रासदायक असे पावसाबाबत होणार नाहीये .त्यामुळे आपण आपले जात धर्म हे मानवनिर्मित भेद विसरत या संकटासाठी एकत्र येणे आवश्यक आहे हवामनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते असे प्रकार यापुढे वाढतच जाणार आहे त्यामुळे फक्त याच वर्षी असा असमान पाऊस झाला आहे पुढच्या काही वर्षी असा पाऊस झाला तर मग याचा विचार करू एका वर्षाच्या पावसाने काही गंभीर होण्याची गरज नाही असे समजून या कडे दुर्लक्ष  करणे चुकीचे आहे याउलट हि हवामान बदलाची सुरवात आहे असे समजणे योग्य ठरेल कोणतीही समस्या सुरवातीला छोटीच असते आणि समस्या छोटीच असतांना सुटणे सहजशक्य असते . जर समस्येने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्यावर ती समस्या सोडवणे अवघड असते त्यामुळे हवामान बदलाविषयी काही कार्याची असल्यास आताच करणे आवश्यक आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?