बदलत्या जागतिक राजकारणात भारताची भूमिका

             


    सध्या जगाचे राजकारण वेगाने बदलत आहे . या बदलणाऱ्या जागतिक राजकारणात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे . किंबहुना बदलत्या जागतिक राजकारणाचा इकेंद्रबिंदू भारत असणार आहे ,असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी आज जगाची  स्थिती आहे . गेल्या वर्षभरात विविध देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपती यांचे वाढलेले भारत दौरे याचीच साक्ष  देतात असे मम्हटल्यास वावगे ठरू नये

               या २०२२वर्षात ,.१९ आणि २० मार्च रोजी जपानचे पंतप्रधान फुमिओ किंशिंदा यांची दोन दिवशीय भारत भेट झाली  एप्रिलला . इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट  भारताच्या तीन दिवशीय भेटीवर येणार होते मात्र वैद्यकीय कारणास्तव त्यांच्या दौरा रद्द झाला .मात्र त्यांनी आपला प्रतिनिधी भारतात पाठवला . पूर्वनियोजित दौरा नसताना चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी  इस्लामाबाद येथील ऑर्गनाझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज या परिषदेच्या अधिवेशनवरून बीजिंगला जात असताना नवी   दिल्ली येथे मोदींची भेट घेतली . मार्चच्या शेवटच्या पंधरवड्यात गेल्या पंधरा दिवसात जपान , मेक्सिको , दक्षिण कोरिया , नेपाळ , इस्राईल , युके ,चीन रशिया  ऑस्ट्रेलिया आदी जगाच्या सर्व कानाकोपऱयातील  देशांचे नेते शिष्टमंडळ यांनी  भारतात प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने भारताशी संपर्क साधत . भारताशी अनेक करार केले 31 मार्च 2022 रोजी नवी दिल्ली येथे नि:शस्त्रीकरण आणि अप्रसारावर भारत-आणि दक्षिण कोरिया  यांच्यामध्ये  सल्लामसलत आयोजित करण्यात आली होती भारत-इंडोनेशिया फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन्स (FOC) ची 7वी फेरी 14 एप्रिल 2022 रोजी जकार्ता, इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आली होतीभारताने रशिया आणि युक्रेन वादामध्ये अमेरिकेला साह्य होईल अशी भूमिका

घेतली नाही.  रशियाकडून नैसर्गिक इंधने घेणे भारताने सुरूच ठेवले असले तरी अमेरिकेने पूर्व नियोजित असणारी  भारताबरोबर +  वार्ता रद्द करता तिचे वॉशिंग्टन डिस्ट्रिक कोलंबिया  या आपल्या केंद्रीय राजधानीच्या शहारत यशस्वी आयोजन  केले रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने पश्चिम युरोप अमेरिका घेत असलेल्या भूमिकेला समर्थन द्यावे यासाठी भारताचे मन परिवर्तन करण्यासाठी युकेच्या तत्कलीन  परराष्ट्रमंत्री लिज़ ट्रस ( ज्या हा लेख लिहीत असताना माजी पंतप्रधान आहेत )  नवी दिल्लीत आल्या होत्यातुर्की या देशाची राजधानी अंकारा येथे 10 जून 2022 रोजी भारत-तुर्की यान दोन देशाच्या परराष्ट्र खात्यांदरम्यान परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते तुर्की देशाने त्यांचे नाव अधिकृतपणे तुर्कीये केल्यानंतरचा हा पहिलाच संवाद होता  या प्रकारचा  या दोन दोन देशातील हा ११ वा संवाद होता  (. या परिसंवादाचे अध्यक्षपद  भारताच्या परराष्ट्र खात्याचे पश्चिम विभागाचे सहसचिव  संजय वर्मा, सचिव  आणि तुर्कीये या देशाचे  परराष्ट्र खात्याचे  राज्यमंत्री  .. श्री. सेदात ओनल यांनी संयुक्तरित्या सांभाळले ,या आधी या परिसंवादाची शेवटची फेरी मे 2019 मध्ये नवी दिल्ली येथे झाली होती  या परिसंवादादरम्यान दरम्यान, दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंधांचा व्यापक आढावा घेतला

    भारताने दक्षिण पूर्व आशियाई देशाची संघटना असलेल्या आसियान आणि भारत यांच्यात परस्पर संबंध प्रस्थापित होण्याचा घटनेला 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या  स्मरणार्थ १६ आणि १७ जून रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते   ब्रुनेई , इंडोनेशिया मानयमार सिंगापूर कंबोडिया मलेशिया लाओस , थायलंड  व्हिएतनाम , फिलिपाइन्स या देशांची प्रादेशिक संघटना म्हणजे आसियान  या बैठकीसाठी या देशाचे परराष्ट्र मंत्री आणि महासचिव १६ आणि १७ जून रोजी नवी दिल्लीत उपस्थित होते यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यातील  अनेक मंत्र्यांबरोबर स्वतंत्र्य बैठका घेऊन या क्षेत्रातील भारताचा राजनीतिक वरचष्मा अधिक मजबूत होण्यासाठी प्रयत्न केले . १९ जून रोजी  भारत आणि बांगलादेश या दोन देशात  Joint Consultative Commission चे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले होते यामध्ये दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत  आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ के अब्दुल मोमेन यांच्यात चर्चा करण्यात आली यावरील शाई वाळते वाळते तोंच  ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान  जे त्यांचे सरंक्षण मंत्री देखील आहेत असे  रिचर्ड मार्ल्स २० ते २३ जून दरम्यान भारताच्या भेटीवर आले होते २३ मे रोजी पदाची सूत्रे हाती घेतल्यवरचा त्यांचा हा

पहिलाच दौरा होता दौऱयावर जाण्याआधी ऑस्ट्रेलियात पत्रकारांना संबोधित करताना ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्सयांनी सांगितले की , भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण संबंध वाढवण्यात मंत्री राजनाथ सिंग यांचा मोलाचा वाटा आहे आणि आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा संरक्षण स्तंभ वाढवण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”  भारत हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वात जवळच्या सुरक्षा भागीदारांपैकी एक आहे आणि भारत-पॅसिफिकमधील आमच्या भागीदारांसोबत ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिकदृष्ट्या सखोल संबंधांना पुनरुज्जीवित करण्यावर सरकारचा भर आहे. “हिंदो-पॅसिफिकमध्ये अनेक दशकांपासून शांतता आणि समृद्धी आणणाऱ्या नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्थेवर दबाव येत आहे, कारण आम्हाला भौगोलिक व्यवस्थेत बदल होत आहेत,”  त्यांचे वक्तव्य भारताचे जागतिक राजकारणातील महत्व अधोरेखितच करते नोव्हेंबर महिन्यचा मध्यावर सौदी अरेबिया या देशाचे पंतप्रधान प्रिन्स  मोहमद बिन सलमान हे एका दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत

           या खेरीज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनाटेड अरब अमिरात या देशाचा यशस्वी दौरा केला तसेच भारताचे सरंक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी अनेक आग्नेय आशिया भागातील देशांशी सरंक्षण शाश्त्रात्रे विक्री संदर्भात विविध करार त्यांच्या देशात जाऊन केले . भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी  यांनी ऑस्टेलिया , न्यूझीलंड , सौदी अरेबिया , युनाटेड अरब अमिरात अनेक आफ्रिकी देश यांचे दौरे केले भारताच्या राष्ट्रपतींनी मध्य आशिया प्रदेशातील पाचही इस्लामिक राष्टे यांच्यासह अनेक देशन्सचे दौरे केले भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत अनेक आफ्रिकी आणि दक्षिण अमेरिका खंडातील देशांबरोबर विविध स्तरावरील बोलणी केली .

 परराष्ट्र संदर्भातील घडामोडी फक्त आणि फक्त राष्ट्रीय हित लक्षात घेऊन केल्या जातात हे लक्षात घेता जानेवारीपासून घडलेल्या या घडामोडी भारताचे जागतिक राजकारणातील महत्त्वाचे स्थान समजते


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?