नोव्हेंबर महिन्याच्या पहिला पंधरवडा जगासाठी अत्यंत महत्त्वाचा

  

  नोव्हेंबर
महिन्याच्या पहिला पंधरवडा जगासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे याला कारणीभूत ठरणार आहे . नोव्हेंबर ते १८ या दरम्यान ईजिप्तमधील  शर्म अल शेख  या शहरात  होणारे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज या परिषदेचे २७ वे अधिवेशन .१९९५ पासून दरवर्षी नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात जगतातील सर्व देश एकत्र येत जागतिक हवामानबदलाविषयी चर्चा करतात त्यास कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतात आता आतापर्यंत याच्या २६ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत . संयुक्त  राष्ट्रसंघाच्या   United Nations Framework Convention on Climate Change या कार्यक्रमांतर्गत या  या फेऱ्या आयोजित करण्यात येतात   कॉन्फरन्स ऑफ पार्टीज या परिषदेला COP या अद्याक्षरावरून कॉप या नावाने ओळखले जाते . हवामानबदलाच्या गेल्या वर्षातील घटना तसेच त्या ज्यांच्या बाबत घडल्या ते  बघता दरवर्षीप्रमाणे हे अधिवेशन निव्वळ तोंडाची वाफ दडवणारे ठरणार नाहीतर या अधिवेशनात काहीतरी सकरात्मक कृती घडेल अशी अशा हवामान बदलाविषयी कार्य करणारे कार्यकर्ते , अभ्यासक व्यक्त करत आहेत .

          गेल्या वर्षभरात  युरोप खंडाच्या पश्चिम भागात असणारी राष्ट्रे आफ्रिकेच्या ईशान्य भागात असणारे देश ( हॉर्न ऑफ आफ्रिकाफिलिपाइन्स पाकिस्तान यांच्यासह स्वतःला झळ पोहोचल्याशिवाय जगात ती समस्याच अस्तित्वात नाही असे मानणाऱ्या अमेरिकेसह जगाच्या अनेक भागात हवामानाने आपले रंग दाखवले आहेत  २७ वी कॉप ज्या इजिप्त देशात होत आहे त्या देशापासून गेल्या कित्येक वर्षांपासून  मोठ्या प्रमाणत दुष्काळाचा सामना करत असलेले आफ्रिकेचा ईशान्य भाग (हॉर्न ऑफ आफ्रिका ) हा प्रदेश अत्यंत जवळ आहे त्या पार्श्वभूमीवर या परिषदेला विशेष महत्व आहे . गेल्या वर्षभरात विकसित समजल्या जणाऱ्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वादळे आली तसेच वाढत्या तापमानामुळे  अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यालगत मोठे वणवे लागले युरोपातील मोठ्या भूभागावर देखील मोठ्या प्रमाणत वणवे लागले स्पेन युनाटेड किंग्डम आदी देशात गेल्या कित्येक दशकांतीलमोठा  दुष्काळ पडला . आफ्रिकेच्या अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले तर

चीन फिलिपाइन्स पाकिस्तान ऑस्ट्रेलिया आदी देशात गेल्या कित्येक शतकाचे विक्रम मोडीत काढेल असा पाऊस झाला आपल्या भारतात देखील ऊत्तर भारतात आणि ईशान्य भारताच्या अनेक भागात सरासरीच्या तुलनेत चिंताजनक कमी दर्शवणारा पाऊस झाला तर पश्चिम आणि दक्षिण भागात चीनताजनक वाटावा इतका जास्त पाऊस झाला या बदलत्या पार्श्वभूमीवर हे  वार्षिक अधिवेशन होत आहे

       आतार्यंत झालेल्या २६ फेऱ्यांमध्ये अमेरिका आणि पश्चिम युरोपातील विकसित देश आणि भारत चीन यांच्यासारखे विकसनशील देश यांच्यात हवामानबदलाविषयीच्या तरतुदींविषयी कोणी पुढाकार घ्यावा याबाबत वाद होत आहे  विकसित देशाच्या मते हे जागतिक संकट असल्याने जगातील सर्व देशांनी ते विकसित आहेत कि अविकसित आहेत हे ना बघता ते वातावरचे तापमान वाढायला साह्य ठरतील अश्या ग्रीनहाऊस गेसचे जेव्हढे उत्सर्जन करतात त्या प्रमाणात वाटा उचलायला हवा ,तर भारत चीन यांच्यासारख्या विकसनशील देशांच्यामते सध्याचे हवामानबदलाचे संकट निर्माण होण्यसासाठी सध्या विकसित असणाऱ्या देशांनी ते विकसित होताना निसर्गाची केलेली हानीच कारणीभूत आहे त्यांची विकायची फळे चाखून झालेली आहेत जी आम्ही नुकतीच चाखायला सुरवात केली आहे विकसित देशानी केलेल्या पापामुळे आम्ही अविकसित रहायचे हे योग्य नाहीय आम्हालाही विकसित होण्याचा अधिकार आहे सबब जगातील हवामान बदलाच्या विरोधात कृती करताना विकसित देशांनी अधिक वाटावा उचलायला हवा हा वाटा  त्यांच्याकडून ग्रीन हाऊसला कारणीभूत ठरतील अश्या वायुंचे वातावरणात कमीत

कमी  कमी उत्सर्जन होण्यासाठीचे बंधन  स्वतःवर लादून घेणे तसेचभारतासारख्या विकसनशील देशाला पर्यावरणपूरक विकासासाठी अर्थसाह्य करणे या प्रकारचा असावा या एकाच मुद्यावर अनेक करार खोळंबले आहेत

         गेल्या वर्षभरात जगाने हवामानबदलाचे अनेक चटके अनुभवले असल्याने त्यावेळेचे कॉपचे अधिवेशन अत्यंत वादळी ठरणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे  त्यामुळे या अधिवेशनात काहीतरी ठोस निष्पन्न होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे ती खरीच फलद्रुप होते की , मागच्या २६ अधिवेशनसारखे हेही अधिवेशन वायफळ जाते हे कालच ठरवेल ते त्यावरच सोडून देणे सयुक्तिक आहे


    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?