नांदूर नाका परिसरात झालेल्या अपघाताने उपस्थित झालेले प्रश्न

     


नाशिककरांची शुक्रवार ८ ऑक्टोबरची सकाळ उघडली ती नांदूर नाका परिसरात झालेल्या एका मोठ्या जीवघेण्या अपघाताच्या बातमीने . एका खासगी बसवातूकदारच्या यवतमाळ ते मुबई दरम्यान धावणाऱ्या एका बसला पहाटे पावणेपाचच्या सुमारास अपघात होऊनआग  लागण्याने होरपळून १० हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची ती बातमी होती . वरातीमागून घोडे या न्यायाने याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र या चौकशीतून काही चुका समोर आल्यातर त्या चुकांची पुनरावर्ती टाळण्यासाठी काही उपाययोजना होतात का ? हे बघणे महत्त्वाचे  आहेत . याच्या आधी देखील अश्या प्रकारचे अनेक अपघात झाले आहेत त्यांच्या अपघाताची देखील चौकशी झाली आहे मात्र या  चौकशी अहवालात जे  सांगितले आहे याची अंमलबाजवणी न झाल्याने सदर अपघात झाला असे माझे स्पष्ट मत आहे 

     मुळात आपल्याकडे बस बांधणीत खूपच फरक दिसतो उदाहरणादाखल आपण महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरात , नॉर्थ वेस्ट कर्नाटक , या चार एसटी महामंडळाच्या बसेस बघूया मी जरी या चार बसेसचे उदाहरण देत असलो तरी पळसाला पाने तीनच  या न्यायाने आपण भारतातील कोणतंही बस वाहतूकदार या  ठिकाणी घेऊ शकतो 

     तर मित्रानो , मध्यप्रदेशच्या ज्या एसटी बसेस नाशिक परिसरात येतात त्यांना पुढे आणि मागे अशी दोन दारे असतात . तर आपत्कालीन दरवाजा एकच असतो जो पुढील दारासमोर असतो नॉर्थ वेस्ट कर्नाटकच्या बसेसला एकच दरवाजा असतो जो बसच्या मागील बाजूस असतो याच दरवाज्यसमोर आपत्कालीन दरवाजा असतो . गुजरातच्या बसेसच्या विचार करता बसमध्ये प्रवेश करावयाचा दरवाजा बसच्या मध्यभागी असतो तर आपत्कालीन दरवाजा पुढच्या बाजूस डायव्हर सीटच्या मागे असतो महाराष्ट्र एसटीचा विचार करता बसमध्ये आपणास पुढून

प्रवेश करावा लागतो महाराष्ट्र एसटी बसेसला पुढे आणि मागे असे दोन आपात्कालीन दरवाजे असतात . या विविधतेमुळे जर दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास प्रवाश्याना बाहेर पडायचे झाल्यास नक्की कुठून बाहेर पडायचे ? असा प्रश्न उपस्थित होऊ शकते 

     जशी दरवाज्याची विविधता तशीच बसमध्ये  दोन आसनामध्ये असणाऱ्या आंतराबाबत विविधता आढळते गुजरातच्या जुन्या बसेसमध्ये दोन आसनांतील मोकळी जागा ज्याचा वापर करत बसमध्ये मागे किंवा पुढे जाता येते ती अत्यंत कमी आहे जेमतेम एक  मध्यम शरीर प्रकृतीचा व्यक्ती जाऊ शकेल इतकीच जागा त्या बसेसमध्ये आहे मी मध्यमी शरीर प्रकृतीचा व्यक्ती म्हणत आहे  जाड सुदृढ व्यक्ती म्हणत नाहीये हे लक्षात घ्या . मध्यम प्रकृतीचा व्यक्तीसुद्धा  सुद्धा एकच बॅग घेऊन त्यातून प्रवास करू शकतो इतकीच त्याची जागा असते    गुजरातच्या जुन्या  बसेस आता नव्याने बांधण्यात येत आहे त्यात ही समस्या दूर करण्यात आली आहे असे म्हणतात . मी या नव्या बसेस,मधून प्रवास केलेला नाहीये त्यामुळे त्याबाबत काही सांगू शकत नाही मात्र हा बदल खरंच उत्तम आहे महाराष्ट्र ,नॉर्थवेस्ट  कर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या एसटीबसेसमध्ये मात्र दोन आसनातील जागा खूपच मोकळी आहे असो 

        खिडक्यांमधून बाहेर पडायचे म्हटल्यास मागेपुढे असणाऱ्या  दोन आसनांसाठी एक खिडकी असल्याने तो मार्ग काहीसा अरुंद होतो तेथून बसमधून बाहेर पाडण्यासाठी पोटचा घेर कमी असणे आवश्यक आहे बस एसी असल्यास खिडकीची काच फोडणे अत्यंत अवघड काम आहे  संकटाकळी बसची काच कशी फोडायची? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो मी आतापर्यंत जेव्हढ्या एसी बसेसमध्ये बसलोय त्यापैकी एखाद दुसरा अपवाद वगळता ही सोय नव्हतीच 

       मी  अनेकदा एसटीबसमधून फिरतो त्यावेळी मला नॉर्थ वेस्ट कर्नाटक आणि महाराष्ट्र एसटी बसेसमध्ये आग लागल्यास ती विझवण्यासाठीचे  सिलेंडर बसवलेले दिसते काही गुजरातच्या गाड्यामध्येही ते  दिसते मात्र मी आतापर्यंत फिरलेल्या एकाही मध्यप्रदेशाच्या एसटीमध्ये मला ती यंत्रणा दिसलेली नाही अर्थात मी बघितलेले सिलेंडर खरोखरीच मुदतीतील आहेत कि त्यांची मुदत संपली असून देखील ती तिथेच आहेत हे समजायला मार्ग नाही तोच प्रकार प्रथोमचार पेटीबाबत पण दुर्घटनेत त्याचा काहीच उपयोग नसतो म्हणून सोडून देऊया 

बसमधून चोरट्या मार्गाने होणारी वाहतूक हा सुद्धा अत्यंत गंभीर मुद्दा आहे बसच्या डिक्कीतून अनेकदा ज्वालाग्राही पदार्थाची ने आण अत्यंत सहजतेने होते शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातासारख्या दुर्घटनेत अपघाताची तीव्रता

वाढवण्यासाठी बसच्या डिकीतून होणारी वाहतूक सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे बसेसच्या डिझेल टाक्यांची सुरक्षितता तसेच गियर बॉक्सची सुरक्षितता आपण घेऊच कारण बसमधील आग याच ठिकाणी लागते मात्र या डिक्कीत जर एखादी दुचाकी असेल तर त्याची काळजी कशी घेणार  ? नाशिकच्या  मुबई नाका परिसरात अश्या एखाद्या ट्रकला लाजवेल अशी वाहतूक करणाऱ्या बसेस मी बघितल्या आहेत एसटी बसमधून अशी चोरटी वाहतूक होत नाही मात्र खासगी बस वाहतुकीमधून अशी वाहतूक सरार्स होते त्यावर या अपघातामुळे विराम लागल्यास वाईटात काहीसे चांगले असे म्हणता येईल 

बस बांधणीतील अजून एक अडचण म्हणजे  बसमध्ये ड्रायव्हर केबिन आणि प्रवाश्यांची बसायची जागा यात देखील विविधता आहे गुजरातच्या जुन्या एसटी बसेसमध्ये डायव्हर केबिन आणि प्रवाश्याची बसायची जागा पूर्णतः वेगवेगळ्या केल्या आहेत एका जागेतुन दुसऱ्या जागेत जायचे झाल्यास बसमधून पूर्णतः उतरून दुसऱ्या भागत जावे लागते नॉर्थ वेस्ट कर्नाटक आणि मध्यप्रदेश च्या एसटी बसेसमध्ये अत्यंत सहजतने एका भागातून दुसऱ्या भागात जाता येते आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास काही एसटी बसेसमध्ये दोन्ही भागात सहजतेनं जाता येते काही बसेसमध्ये काहिस्या अडथळयानावर मात करत या एका भागातून दुसऱ्या भागत जाता येत त्यामुळे जर डायव्हरला काही मदत लागल्यास प्रवाश्यांशी संपर्क साधायला काहीशी अडचण होते 

याखेरीज बस किंवा ट्रक चालकाला क्लिनर बाजूची पाठीमागची बाजू दिसत नसते तेथून वेगाने दुचाकी किंवा त्या सारख्या वजनाने  हलक्या वाहन आल्यास ड्रायव्हरचा गोंधळ उडतो  या खेरीज इच्छित स्थळी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी बसेसने वेगमर्यादेचे उल्लंघन करणे एकदा डायव्हर सिटमध्ये बसल्यावरदोन ते अडीच तास झाल्यावर सुद्धा मध्ये एक पाच दहा मिनिटांची विश्रांती न घेणे तसेच वाहनाचे मागील दिवे व्यवस्थित नसणे . या सारख्या कारणामुळे असे अपघात होतात जे काही काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतात . 

अपघात्तात जर कर्त्या माणसाचे नुकसान झाल्यास अख्खे कुटुंब बसते सरकारकडून देण्यात येणाऱ्या रक्कमेबाबत अनेक मध्यस्थ आणि अडचणी असतात अपंगत्व आल्यास होणारे नुकसान देखील मोठे असते त्यामुळे अपघात टाळणेच योग्य असते 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?