ऋषी सुनक यांच्या निवडीतून भारताला घ्यावयाचे आदर्श

         


   अत्यंत अवघड अश्या स्थितीतील युनाटेड किंग्डम या देशाची सूत्रे ऋषी सुनक यांनी स्वीकारली फाळणीपूर्व ब्रिटिश भारतातून प्रथमतः आफ्रिका खंडातील विविध देशात वास्तव्यास असलेल्या आणि सरतेशेवटी युनाटेड किंगडम मध्य स्थिरावलेल्या सुनक यांच्या घरातील ऋषी यांनी युनाटेड किंगडम या देशाची सूत्रे हाती घेतल्याने समस्त भारतीय उपखंडाला आनंद होणे स्वाभाविकच आहे .या भागातील प्रत्येक जण त्यांच्या रूपाने स्वतःचा अंश त्या ठिकाणी बघत आहे जे सुद्धा स्वभावविक आहे मात्र हे प्रकरण एकेकाळी आपल्याला गुलामीत ढकलणाऱ्या देशावर आपल्या भागातील लोकांचे राज्य आले इतकाच या गोष्टीचा अर्थ नाही 

       ऋषी सूनक यांची पंतप्रधानपदी निवड करण्याची पद्धत भारतीयांनी अभ्यासण्याची गरज मला वाटते . पक्षांर्गत लोकशाहीद्वारे त्यांची निवड झाली त्याचे पूर्वसुरी लिझ ट्रस यांच्या निवडी दरम्यान ऋषी सूनक आणि  लिझ ट्रस यांच्या दरम्यान झालेच्या टीव्ही डिबेट या ब्रिटिश सरकारी वृत्तवाहिनी बीबीसीवर दाखवण्यत आल्या . या चर्चा फक्त त्यांच्या ध्येयधोरणावर आधारित होत्या . त्यामध्ये ते देशातील मूळ व्यक्ती आहेत की स्थलांतरित आहेत याचा लवलेश देखील त्या चर्चांमध्ये होत्या या चर्चांचा आधारे पक्षाच्या खासदारांर्नी आणि पक्षच्या कार्यकर्त्यांनी मतदान केले आणि त्यांची मतदानंतर निवड करण्यात आली . या मतदान प्रक्रियेत दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी भाग घेतला होता मात्र मतदानाच्या विविध टप्यावर त्यातील एक एक जण कमी होत गेले

आणि लिझ ट्रस या पंतप्रधानपदी निवडून आल्या यावेळी देखील  ३ जण पंतप्रधानपदासाठी उत्सुक होते /मात्र त्यातील दोन जणांनी माघार घेतल्याने  ऋषी सुनक हे पंतप्रधानपदावर आरूढ झाले मागच्या वेळेपेक्षा यावेळी हि प्रक्रिया कमी वेळ चालली देशाची स्थिती बघून यावेळी पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा यावेळी करण्यात आली नाही मात्र देशातील स्थिती गंभीर आहे म्हणून या प्रक्रियेला पूर्णतः फाटा दिला असेही नाही आधुनिक जगातील सर्वात जुनी लोकशाही असणाऱ्या युनाटेड किंगडम या देशाने खरी लोकशाही म्हणजे काय हेच जगाला दाखवून दिले आहे असे म्हंटले तर चुकीचे होणार नाही 

    तसेच व्यक्तीच्या कर्तुत्वाचा सम्मान करण्याची त्यांची वृत्ती देखील अनुकरणीय आहे युनाटेड किंगडमाची राजधानी लंडनचा महापौर देखील पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे आता त्या देशाचा पंतप्रधान देखील स्थलांतरित आहे . या दोन उहाहरणावरून लोकप्रतिनिधी तेथील पूर्वापार रहिवाशी असला पाहिजे या समजुतीला देखील त्यांनी थारा दिलेला नाही हे सहजतेने समजून येते  ऋषी सुनक यांचे पूर्वसुरी लिझ ट्रस  यांनी देखील आपण जनतेला दिलेले वचन पूर्ण करू शकत नाही हे समजल्यावर राजीनामा दिला मी कर सवलतीचे दिलेले आश्वासन ही गाजराची पुंगी होती असे त्या म्हणाल्या नाहीत त्याच प्रमाणे युनाटेड किंडगमच्या ब्रेक्झिटच्या वेळी झालेल्या सत्त्तांतराच्या वेळी देखील आपणास याचा अनुभवदेखील आला होता 

         त्या पार्श्वभूमीवर भारतात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोणत्या पद्धतीने होते त्या प्रक्रियेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मताचा विचार होतो का ? तसेच जर त्या पदासासाठी  एकापेक्षा अधिक जण इच्छुक असतील तर त्यांची  विविध प्रश्नाबाबबत मते काय आहेत ? याची जाहीर चर्चा होते का ?  आपल्या भारतातील नागरिक मतदान करताना उमेदवाराचा कर्तृत्वाचा त्यास मत देताना किती विचार करतात . लोक

दुसऱ्या लोकांना किती सहजतेने स्वीकारतात याचा विचार करता समोर येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही असेच म्हणावे लागते जेव्हा या चित्रात युनाटेड किंगडमच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक बदल होईल तेव्हाच जगातील सर्वात जास्त लोकांचा सहभाग असल्याने जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून अभिमान बाळगणाऱ्या आपणास  खऱ्या अर्थाने लोकंशीप्रधान देश म्हणता येईल हेच खरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?