मना सज्जना !.....

     


   मन , मानवाच्या बहुतांश सर्व क्रियांवर प्रतिक्रियांवर नियंत्रण असलेला मात्र तरीही सहजपणे दाखवता येणारा मनुष्याच्या अविभाज्य भाग . किंवा मनुष्याच्या रोजच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं मात्र ज्याविषयी फारच कमी बोलले जाते लिहले जाते तो घटक म्हणजे मन . मानवाच्या या अविभाज्यअत्यंत महत्त्वाच्या  घटकांवर , बोलण्याचा लिहण्याचा समाजात मन आणि त्यास होणारे विविध विकार याविषयी जनजागृती करण्याच्या दिवस म्हणजे  १० ऑक्टोबर अर्थात जगातील मानसिक आरोग्य दिन१९९२ पासून जगातील आरोग्य संघटनेमार्फत सयुंक्त राष्टसंघटनेच्या मार्फत हा दिन साजरा करण्यात येतो हा दिवस साजरा करण्यात यावा यासाठी जागतिक मानसिक आरोग्य संघटनेमार्फत सातत्याने पुढाकार घेतला जातो

          १९९२ पासून साजरा करण्यात येणारा हा दिवस १९९४ पासून एक विशिष्ट संकल्पना घेऊन साजरा करण्यात येतो २०२२ सालाची संकल्पना आहे " Make Mental Health & Well-Being for All a Global Priority’ सर्वांसाठी मानसिक आरोग्य आणि तंदुरुस्तीला जागतिक प्राधान्य द्या' असे काहीसे मराठी भाषांतर या साठी करता येईल . आज समाजाच्या विविध स्तरावर मानसिक आरोग्य हा विषय विविध पातळीवर बघितला जातो श्रीमंत आणि सधन  व्यक्ती समूहात त्या लोंकाच्या जगण्याच्या भाग झालेल्या ताण तणावाचा भाग म्हणून याकडे सहजतेने बघितले जाते . तर मध्यमवर्गीय  व्यक्तीमंध्ये आजदेखील मानसिक अनारोग्य एक सामाजिक कलंक म्हणून बघितले जाते निन्म्स्तरावरील व्यक्तींसासाठी हे रोजचेच मरण आहे जसे हे व्यक्तींसासाठी लागू आहे त्याच प्रमाणे हे देशांसाठी लागू आहे विकसित देशामध्ये मानसिक अनारोग्यकडे शारीरिक अनारोग्याकडे ज्या सहजतेने बघतात त्याच सहजतेने बघितले जाते विक्शनशील देशात मात्र हा सामाजिक कलंक समजला जातो तर अविकसित देशात मानसिक अनारोग्य हे रोजचेच मरण आहे ज्याठिकाणी शाररिरीक अनारोग्याचीच मारामार आहे त्या ठिकाणी कोण मानसिक आरोग्याकडे लक्ष देणार हा दृष्टिकोन या ठिकाणी बाळगला जातो . जागतिक आरोग्य संघटनेला याच विषमतेवर बोलायचे असल्याने त्यांनी हा विषय निवडला आहे पुढील वर्षभर संयुक्त राष्ट्रसंघाचे स्वयंसेवक हि संकल्पना घेऊन जगभरात या विषयी मार्गदर्शन करतील 

     आपल्या भारतात मानसिक अनारोग्याविषयी आताआतापर्यंत फारसे बोलले जात नव्हते . मात्र क्रिकेटपटू विराट कोहली सिने अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी हो आम्ही आमच्या आयुष्यात नैराश्याचा सामना केला आहे  असे उघडपणे सांगितल्याने या विषयी आता समाजमन बोलते होत आहे जी अत्यंत चांगली गोष्ट आहे . मानसिक

अनारोग्याने ग्रस्त व्यक्ती आणि त्यांचे पालक यांचे स्वयंसहायता गट स्थापन होत आहेत जिथे समदुःखी आपले दुःख शेअर करतात आपल्या सारखेच दुखी व्यक्ती बघून माणसाला जरासे हलके वाटते अश्या गटांचे प्रमाण वाढायला हवे  जसे शरीराला रोग होतात तसे मनाला देखील रोग होतात त्यात  लज्जा वाटण्यासारखे काही नाही हा दृष्टिकोन समाजात रुजतो आहे  आपल्या मराठीत देखील देवराई सारखे चित्रपट यांबाबत प्रबोधनाचे मोठे कार्य करत आहेत अश्या चित्रपटांचे प्रमाण वाढायला हवे ज्यामुळे या विषयावर अधिक मोकळेपणा येईल ज्याची सुरवात या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झाल्यास ते सोन्याहून पिवळे ठरेल यात शंकाच नाही 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?