मोठ्या दूरगामी बदलाच्या दिशेने पाकिस्तान

   


 मोठ्या दूरगामी बदलाच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल सुरु असल्याचे त्या देशातून येणाऱ्या बातम्यांमधून स्पष्ट होत आहे .पाकिस्तानमधील स्थैर्याचा राजकीय घडामोडींचा दोन्ही देशातील संबंधावर मोठा परिणाम होत असल्याने आणि आपल्या भारताबरोबर पाकिस्तान मोठी सीमा शेअर करत असल्याने आपल्यासाठीही  त्या अत्यंत महत्वाच्या ठरतात 

    तर  अमेरिकेने फूस लावून पाकिस्तनात या वर्षी  (२०२२ ) एप्रिलमध्ये सत्तानंतरण केले  आहे त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही  तरी पाकिस्तानात नव्याने निवडणूका घेण्यात याव्यात अशी इम्रान खान यांची प्रमुख मागणी आहे  त्यासाठी  या वर्षाच्या (२०२२) एप्रिल महिन्यात झालेल्या सत्ततरणातरानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला मोठे यश मिळत आहे .याचा दाखल दिला आहे आपली मागणी पूर्ण व्हावी यासाठी त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे इम्रान खान त्यांचे आंदोलन कधी सुरु करतात ?  या विषयी पाकिस्तानात मोठ्या प्रमाणत उत्सुकता होती   त्यास सकारात्मक प्रतिसाद देत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान , आणि पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांनी हकिकी आझादी या आंदोलनास २८ ऑक्टोबर रोजी लाहोर मधून सुरवात झाली केली आहे या आधी पाकिस्तानचा इतिहासात कधीही पाकिस्तानी गुप्तहेर संघटन आय एस  आय च्या आणि लष्कराच्या उच्च पदस्थ अधिकाऱयांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले नव्हते नव्हते /मात्र इम्रान खान यांनी सुरु केलेले हकिकी आझादी या 

आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी  संघटन आय एस  आय च्या आणि लष्कराच्या उच्च पदस्थ अधिकाऱयांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले यावरून इम्रान खान यांचे आंदोलन पाकिस्तनी लष्कराने किती गंभीरपणे घेतले आहे हे समजते 

   इम्रान खान यांच्या आंदोलनास  जनतेचा व्यापक पाठिंबा मिळत आहे . या आंदोलनदरम्यान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या राजकारणातील महत्त्ववाचा अराजकीय घटक असलेल्या पाकिस्तानी लष्करावर  ते विद्यमान सरकारला पदच्युत करण्यासाठी काहीही विशेष पाऊले उचलत नसल्याने टीकेची झोड उठवली पाकिस्तानच्या राजकारणात लष्करास राजकीय पक्ष म्हणून मान्यता नसली तरी एखाद्या ताकदवान राजकीय पक्षाइतकी त्यांची पाकिस्तानच्या सत्ताकारणात उठाठेव असते पाकिस्तानमधील कोणताही पंतप्रधान लष्कराच्या मान्यतेशिवाय सत्ता सांभाळू शकत नाही पाकिस्तानी लष्कराची खपामर्जी झाल्याने पाकिस्तानी पंतप्रधानांना खुर्ची सोडावी लागल्याचा आणि विरोधी पक्षात असताना लष्कराला साह्य होईल असे विधान केल्याने पंतप्रधानपदी वर्णी लागल्याचा पाकिस्तानला इतिहास आहे त्यामुळे इम्रान खान यांच्या या विधानाला मोठा अर्थ आहे इम्रान खान वेगाने लाहोरहून पाकिस्तानची राजधानी इस्लमबाबाद (जी त्यांनी  १९६१ साली त्यावेळच्या पूर्व पाकिस्तान {आताच्या बांगलादेश }मधून मिळणाऱ्या महसुलातून उभारली होती ) कडे वाटचाल करत आहे या आंदोलनाला तोंड देण्यसासाठी सुमारे २५० चौ  किमी क्षेत्रफळ असलेल्या इस्लामबाबादमध्ये १० हजाराहून  अधिकपोलीस  दले सिंधहून मागमावून तैनात करण्यात आले आहेत पाकिस्तानी लष्कर आणि इस्लमबादचे स्वतःचे पोलीस दल विचारता घेता इस्लमबाबाद मधील परिस्थिती लक्षात येते 

      इम्रान खान यांच्या या विधानानंतर पाकिस्तानी जनतेमध्ये लष्कराविरोधात मोठ्या प्रमाणत बोलण्यास सुरवात झाली आहे . पाकिस्तानी समाजव्यस्थेत लष्कराचे असणारे स्थान बघता लष्कराविरोधात समाजात वक्तव्य उमटणे यास मोठे महत्व आहे . विविध आंतराष्ट्रीय माध्यमामध्ये या बाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यनुसार या विधानामुळे लष्कर आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे कार्यकतें यामध्ये वादंग  निर्माण होऊन पाकिस्तानात यादवीसदृश्य

परिस्थिती निर्माण होऊ शकते आंतराष्ट्रीय माध्यामध्ये या विधानमामुळे उमटलेल्या प्रतिक्रिया बघून आमच्यात आणि लष्करात फक्त राजकीय मुद्यांवरून मतभेत आहेत पाकिस्तानचे स्थैर्य देशाची सुरक्षितता या साठी आम्ही पूर्वी देखील लष्करा समवेत होतो आता देखील लष्करासमवेत आहोत आणि भविष्यात देखील लष्करासमवेत राहू असे स्पष्टीकरण दिले आहे इम्रान खान यांच्या स्पष्टीकरणार्थ असणाऱ्या विधानावरुन आपण विधानाची दाहकता समजू शकतो 

     सी एन एन या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार इम्रान खा यांच्या या विधानामुळे पाकिस्तानच्या राजकारणातील लष्कराचे महत्व कमी होऊन पाकिस्तान अधिक लोकशाहीप्रधान राष्ट्र होऊ शकते . या आंदोलनामुळे इम्रान खान सत्तेत आल्यास या प्रक्रियेला गती मिळू शकते पाकिस्तानात लोकशाहीची मुळे  घट्ट होणे भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यस्साठी खूप उपयोगी ठरू शकतात  मात्र यामुळे पाकिस्तानात लष्कर आणि आजमितीस पाकिस्तानातसध्याच्या वेळेस अत्यंत लोकप्रिय असलेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाच्या समर्थकांच्या संख्येमुळे  यादवी पसरण्याचा धोका सुद्धा या बातमीत सांगण्यात आला आहे पाकिस्तानमध्ये यादवी पसरल्यास ते भारताला कोणत्याच स्थितीत परवडणारे नाही सध्या पाकिस्तानमधील दहशतवादी ज्या प्रमाणत धोकादायक आहेत त्याच्या तुलनेत त्यांची ताकद पाकिस्तानात यादवी पसरल्यास मोठ्या प्रमाणत वाढेल त्यामुळे हे विधान शांततेत मिटण्यातच भारताचे हित आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?