हवामानाचा मुद्दा कधी येणार आपल्या अजेंड्यावर ?

 


  अजून किती वाईट स्थिती आल्यावर आपल्या अजेंड्यावर हवामान बदलाचा मुद्दा येणार आहे ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा अहवाल नुकताच India's environment think tank Centre for Science and Environment तर्फे प्रसिद्ध करण्यात आला या  अहवालानुसार  जानेवारी २०२२ ते ३०सप्टेंबर २०२२ या वर्षातील २७३ दिवसांपैकी २४१ दिवशी बदलत्या हवामानाने भारतीयांना आपले रंग दाखवले आहेत या २७३ दिवसात बदलत्या हवामानामुळे हजार ७५५ व्यक्तींना  आणि ६९ हजार पाळीव प्राण्यांना प्राणास मुकावे लागले . बदलत्या हवामानामुळे ४० हजार घरे उद्धवस्त झाली तसेच १८ लाख हेकटर जमिनीवर याचा परिणाम झाला असेही या अहवालात सांगण्यात आले  आहे भारतात बदलते हवामान हा प्रश्न कितीं गंभीर स्थितीवर आला आहेयाचा हा ढळढळीत पुरावाच म्हणावा लागेल

    अहवाल सादर करताना, त्याचे लेखक रजित सेनगुप्ता आणि किरण पांडे म्हणाले की, २०२२मध्ये २७३ दिवसांपैकी २४१ दिवस भारताने अत्यंत हवामानाच्या घटनांचा अनुभव घेतला.१५९दिवसांत देशात विजांचा कडकडाट आणि वादळे झाली, तर १५७ दिवसांत मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलन,६६  दिवस उष्णतेची लाट,३०दिवस थंडीची लाट,११  दिवस ढगफुटी आणि दोन दिवस बर्फवृष्टी झाली.जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वीज पडून तसेच वादळामुळे जवळपास ९५४ लोकांना पाळ्या प्राणास मुकावे लागले ज्यामध्ये आपले महाराष्ट्र ९४ मृत्युसह मध्यप्रदेशा( १६४ ) नंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे देशातील एकूण मृत्यूंपेकी महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या जवळपास १० % आहे याखेरीज  भारतात 66 दिवस उष्णतेच्या लाटेची नोंद झाली ज्यात मार्चच्या सुरुवातीस जुलैपर्यंत 45 लोकांचा मृत्यू झाला. 42 दिवस चाललेल्या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका

पश्चिमेकडील राजस्थान राज्याला बसला आणि त्यानंतर महाराष्ट्राला 24 दिवस उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आणि 34 जणांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही, असे अहवालात म्हटले आहे.देशातील एकूण ४५ मृत्यूंपैकी ३४ मृत्यू महाराष्ट्रातील असणे महाराष्ट्राला भूषणावह नक्कीच नाही

देशाचा विचार करता मार्च आणि एप्रिल हे महिने विलक्षण उष्ण होते आणि त्यामुळे उष्णतेच्या लाटा लवकर सुरू झाल्या, या वर्षाचा मार्च हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण आणि १२१ वर्षांतील तिसरा कोरडा महिना असल्याचेही या अहवालात सांगण्यात  आहे.आहे तज्ज्ञांनी नमूद केले की पावसाळा  या ऋतुत अनेकर्मे ओला आणि कोरडा काळ आलटून पालटून असतो त्याची सुरुवात जूनमध्ये ईशान्य भारतात, विशेषत: आसाम आणि मेघालयमध्ये आपत्तीजनक पुराने झाली."जुलै आणि ऑगस्टमध्ये ईशान्येत कोरडे हवामान होते. तथापि, देशाच्या पश्चिम भागात जुलैमध्ये पूर आला आणि कर्नाटक, केरळ, ओडिशा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ऑगस्टमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली,"

या सर्व बाबी भारतात हवामान बदलाविषयी काहीतरी ठोस करण्याचेच स्पष्ट करत आहे मात्र असे असून देखील आतापर्यंत हा मुद्दा भारतीय राजकारणाचा पटलावर आलेला नाही . कोणत्याही निवडणुकीत बदलते हवामान हा मुद्दा चर्चेचा मुख्यस्थानी येत नाही . गेल्या २०२१ वर्षी मार्च महिन्यात पश्चिम युरोपात मोठ्या प्रमाणात पूर आले , त्यानंतर जर्मनीत ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत आम्ही फक्त पर्यावरण बदलाविषयी कार्य करू असे सांगणाऱ्या ग्रीन पार्टीची आघाडीसह सत्ता आली ऑस्टेलियात नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांच्या क्वीन्सलँड आणि व्हिटोरीया या राज्यता मोठ्या प्रमाणत पूर आले मे २०२२ मध्ये झालेल्या ऑस्टेलियाच्या केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुकीत हवामान बदलाविषयी योग्य कार्य केले नाही या मुद्यावरून या आधी तीन टर्मसासाठी सत्तेत असणाऱ्या पक्षाचा पराभव झाला या खेरीज ऑस्ट्रिया , पोलंड फिलिपाइन्स या देशात गेल्या वर्षभरात झालेल्या निवडणुकीत हवामान बदलाचा मुद्दा हा प्रमुख मुद्दा होता . या काळात जगासारखे भारतात देखील हवामानाने आपले रंग दाखवले . आपल्याकडेही निवडणुका झाल्या पण आपल्या निवणुकांमध्ये हवामान बदल या मुद्याचा लांब लांबपर्यंत मागसुस नव्हता भारतालाच नव्हे तर जगाला उत्कृष्ट नागरीकरण काय असते हे स्पष्ट करणारी सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची जी अनेक करणे सांगण्यात येतात त्यामध्ये हवामान बदल हे सुद्धा एक कारण आहे हे आपण विसरता कामा नये हेच यातून वारंवार सिद्ध होत आहे

      ४०० ते ५०० वर्षांपूर्वी झालेल्या घटनेबाबाबत आपण न्यायालयात दाद मागतो . मात्र भूतकाळाकडे बघत असताना वर्तमानकाळात भेडसववणाऱ्या आणि भविष्यात भेडसावू शकतो अश्या प्रशांबाबत आपण उदासीनता दाखवतो भूतकाळात जसे आपण वर्तमानांकडे आणि भविष्याकडे दुर्लक्ष केले तोच कित्ता आपण आता गिरवत आहोत ज्याची शिक्षा आपल्या येणाऱ्या पिढयांना भोगावी लागणार आहे हे नक्की

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?