४३ वर्षाचा चिरतरुण चित्रपट सिंहासन

       


     १९७९ नोव्हेंबर १६ हि तारीख मराठी चित्रपटश्रुष्टीत सुवर्णक्षणांनीं नोंदवण्यात आली आहे कारण आज २०२२ साली सुद्धा राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य करणारा चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहासन या चित्रपटाचे प्रदर्शन झाल्याची ती तारीख आहे  या वर्षी या चित्रपटाला ४३ वर्ष पूर्ण होतील मात्र आजदेखील या चित्रपटाचे कथानक रटाळ कालबाह्य वाटत नाही . किंबहुना आज आपण बातम्यांमध्ये ज्या राजकारणाच्या बातम्या बघतो ,त्याचे नाट्य रूपांतरण वाटावे इतका सजीवपणा या चित्रपटात जाणवतो ,

          हा चित्रपट त्याच्या पहिल्या दृश्यापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो  सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुबई (त्यावेळचे  व्हिटोरीया टर्मिनस ) च्या परिसर त्याच्या पहिल्या दृश्यात दाखवला आहे जो सुरवातीला लॉंग  शॉर्ट  फोकस करतो नंतर चित्रटाच्या अनेक नायकांपैकी एका नायक असलेल्या दिगू चिटणीस या पत्रकारावर स्थिर होतो हा लॉग शॉर्ट ते दिग्गु वर कॅमेरा फोकस करण्याच्या वेळचे एडिटिंग आजच्या त्या नंतरच्या ४३ वर्षानंतर देखील अभ्यासण्या सारखे आहे  दिग्गुवर फोकस केलेल्या दृश्यात दिग्गु चिटणीस मुबई विधिमंडळात (त्यावेळचे नाव सचिवालय )जातो  आणि त्यावेळी तिथे अधिवेशन सुरु असते अधिवेशनदरम्यान मुख्यमंत्र्यास एका निनावी  फोन येतो समोरची व्यक्ती हितचिंतक

असल्याचे सांगून एका महत्त्वाचा संदेश त्यास देते आणि चित्रपट रंगत जातो चित्रपटात अखेरपर्यंत उत्तरोत्तर हि रंजकता टिकवून ठेवली आहे  आपल्याकडे दुर्दैवाने निळू फुले याना एका साचेबद्ध प्रतिमेत बंदिस्त करून ठेवलेले आहे ती किती चुकीचे आहे याची साक्ष हा चित्रपट बघून होते  चित्रपटात एकाच गाणे आहे जे चित्रपटात तुकड्यात तुकड्यात आणि शेवटी पूर्णपणे दाखवले जाते जेव्हा गाणे पूर्ण दाखवले जाते त्यावेळी एका फ्रेममध्ये हुतात्मा स्मारकाच्या खाली एक

गरीब अत्यंत मरतुकड्या शरीर यष्टीचा व्यक्ती शिळेपाके अन्न खाताना दाखवला आहे तसेच गरीब कष्टकरी वर्ग एका इमारतीच्या बांधकाम करताना दाखवण्यता आले आहे ज्यांना तेथून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मंत्रालयात कितीतरी मोठे सत्ता नाट्य झाले याची त्यास भनक देखील नसत यातून स्वतःला सर्वसामान्यानाचे तारणहार म्हणवणाऱ्या राजकारणी व्यक्तीचे दुट्टपी वर्तन सहजतेने आपणस दिसते 

  ऐंशीच्या दशकातील एक उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून, ज्येष्ठ सिने निर्माते जब्बार पटेल यांनी दिग्ददर्शित केलेला सिंहासन ओळखला जातो. अनैतिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा राजकरण्यासी असणारा सबंध तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांपासून कैक दुर अस्या मुद्यांवर राजकारण कसे खेळले जाते? ते त्यात सांगण्यात आले आहेमुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कांदबरीच्या संयोगातून तयार झालेल्या आणि अनेक  मातब्बर सिने कलावंत असणाऱ्या या चित्रपटाचा दुसरा अंक सध्या सुरु झाला आहे का ? असे वाटावे असे वातावरण सध्या महाराष्ट्रात सुरु आहे.या चित्रपटात सीमा प्रश्नाचा देखील उल्लेख येतो त्यासाठी लढणाऱ्या समाजसेवकांना देखील राजकारणी कसे गुंढाळतात आणि त्या तुन देखील पत्रकार कशी बातमी हेरतात यातून राजकारणी व्यक्तीचे अंतस्थ हेतू आणि वर्तणूक कशी वेगळी असते हेच चांगल्या प्रकारे समजते

           चित्रपटात स्मगर्लस चा राजकारण्यासी असणारा सबंध दाखवण्यात आला आहे. तर सध्या अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींचा राजकरण्यासी असणारा सबंधावरून राजकारण तापत आहे. चित्रपटात सामन्य जनतेच्या प्रश्नाला बगल देत सरकार पाडण्याचा विरोधकांचा, आणि त्यांची बाजू त्यांच्यावरच उलटवण्याचा मुख्यमंत्र्यांचा यशस्वी प्रयोग दाखवण्यात आला आहे. आता देखील जनतेच्या प्रश्नांवरुन सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी सरकारमधील मंत्र्यांचा वर्तनावरुन सरकारला पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरु असल्याचे आपणास दिसते. सर्वसामान्यांचा प्रश्नांंबाबाबत कसी टोलवाटोलवी केली जाते? हे त्या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात आपणास दिसते. तिथे दुष्काळामुळे झालेल्या मृत्यूबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला सदर व्यक्तीचे निधन हे वयोमानामुळे झाले असे उत्तर देण्यात येते, आज देखील काहीसे असेच उत्तर देण्यात येते.

        कोणत्याही युद्धात बळी हा निम्मस्तरावरील व्यक्तीचा जातो, वरचे सुरक्षीत राहतात. हे स्मग्लर्सचा साठा किनाऱ्यावर उतरत असताना ते उतरवणाऱ्या व्यक्तींमध्ये झालेल्या झपाटीमध्ये दिसते.उच्चपदस्थ आपल्याला अडचणीचा ठरणाऱ्या निम्मस्तराच्या कस्या पद्धतीने काटा काढतात, हेसुद्धा या झटापटतीत दिसते. काही महिन्यापूर्वीच हप्ता  गोळा करण्यावरुन रंगलेल्या नाट्याबाबतही हेच म्हणता येईल. पोलीसांच्या पदांच्या श्रेणीत पोलीस उप निरीक्षक हे पद बऱ्याच निम्म श्रेणीतील आहे. मात्र या पदावरील व्यक्तीचाच बळी गेल्याचे दिसत आहे. त्यावरील वरीष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त यांच्या मुकसंमतीशिवाय कोणीही पोलीस लाच घेवू शकत नाही. मात्र आपण त्यांच्यापैकी कोणाचेच नाव या प्रकरणात समोर आलेले नाही.सिंहासन या चित्रपटात राजकारणी व्यक्तींचे जवळचे नातेवाईक त्यांचा पदाचा गैरवापर करत आपली कृष्णकृत्ये करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.आजदेखील हेच चित्र आपणाला दिसते. सिंहासनमध्ये विरोधकांना हाताशी धरुन स्वतःचेच सरकार अल्पमतात आणण्याचे, आणि नव्या संभाव्य सरकारमध्ये अधिक उत्तम पद मिळवण्याचे प्रयत्न करताना दाखवले आहे. सध्याचा राजकारणाकडे बघीतल्यास सुद्धा हेच कमी अधिक प्रमाणात सुरु असल्याचे दिसते.

एकंदरीत ४३ वर्षाचा चिरतरुण चित्रपट सिंहासन असे म्हटल्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?