जेव्हा नाशिककरांची मान ताठ होते

             गेल्या आठवड्यात भारतातील समस्त माध्यमे क्रिकेट या मुळातील विदेशी आणि जेमेतेम हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच देशात खेळल्या जाणाऱ्या खेळाविषयी बोलत असताना जगातील १८० हुन अधिक देशात खेळले जाणाऱ्या , पूर्णतः स्वदेशी असणाऱ्या बुद्धिबळ या खेळातून नाशिककरांची मान जगात उंचावणारी घडामोड देखील घडली . सध्या भारतात  गुलामीचा इतिहास पुसून देशाचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे त्या प्रयत्नाला साह्यभूत ठरेल  अश्या या घटनेची माहिती देण्यासाठी आजचा लेखनप्रसंग 

 तर भारतात सर्वत्र गुलामीची ओळख असलेल्या क्रिकेटचा बोलबाला सुरु असताना , बुद्धिबळ या पूर्णतः आपल्या खेळात नाशिकचे भूमिपुत्र  तरुणाईचे आयकॉन , सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी युरोपीय क्लब बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले , १० खेळाडूंचा सहभाग असलेल्या  आणि साखळी पद्धतीने खेळवलेल्या या स्पर्धेत विदित यांनी ४डावात  विजय ,४ डावात बरोबरी तर फक्त एकाच डावात पराभव स्वीकारत ६ गुणांची कामगिरी करत उपविजेतेपद आपल्या खिश्यात घातले . या विजयामुळे आपल्या फिडेरेटिंगमध्ये ६ इलो रेटिंगची  वाढ करत जागतिक क्रमवारीत २४ वरून थेट १९ व्या क्रमांकावर झेप घेतली त्यामुळे विदित गुजराथी पुन्हा एकदा जगातील

पहिल्या वीस खेळाडूत आले आहे . तसेच ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गुणांकन असलेले खेळाडू झाले आहेत . त्यांच्यापुढे भारतीय खेळाडूंचा विचार करता ५ वेळा विश्वविजेते असणारे जे भारतातील पहिले ग्रँडमास्टर आहेत असे विश्वनाथन आंनद हेच आहेत विश्वनाथन आनंद हे जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानावर आहेत युरोपीय क्लब बुद्धिबळ स्पर्धेत मिळवलेल्या ४ विजयांपैकी दोन विजय त्यांनी काळे मोहरे घेऊन मिळवले आहेत . बुद्धिबळ खेळताना पहिल्यांदा पांढऱ्यास खेळण्याची संधी मिळत असल्याने पांढऱ्यास प्रतिस्पर्ध्यावरआक्रमण करण्यासाठी सोईस्कर जाते काळे मोहरे घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला पांढऱ्याचे अतिक्रमण मागे सारत प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करत खेळ जिंकण्यासासाठी प्रयत्न करावे लागतात त्या पार्श्वभूमीवर काळ्या मोहऱ्या घेऊन २ विजय मिळाल्याचे महत्व लक्षात येते / विदित यांनी या स्पर्धेत भारताच्याच  सूर्य शेखर गांगुली, ग्रीसचे  निकोलस थिओडोरस, अमेरिकेचे  ओपरिन ग्रिगोय आणि युक्रेनचे  निजनिच इल्या यांच्यावर विजय मिळवले थिओडोरू, निकोलस आणि निझ्नीक, इल्या यांच्या विरोधात पांढरे मोहरे घेऊन खेळताना वजिरासामोरील प्यादे दोन घरे पुढे चालवून केली (बुद्धिबळाच्या भाषेत डी ४ )  तर भारताच्याच सूर्यशेखर गांगुली यांचा विरोधात काळे मोहरे घेऊन खेळताना  खेळताना राज्यासमोरील प्यादे दोन घरे चालवून केली (बुद्धिबळाचा भाषेत (इ ५ )  काळे मोहरे घेऊन ओपरिन, ग्रिगोरी यांच्या  विरोधात खेळताना राजाच्या बाजूकडील घोडा राजाकडील उंटाच्या समोर असलेल्या प्यादाच्या पुढच्या घरात आणून केली (बुद्धिबळाच्या भाषेत एन एफ ६ )

आपल्या भारतात सी फॉर क्रिकेट असे समजले जाते जे गुलामाची लक्षण आहे हेच अनेकांच्या लक्षात येत नाही जर सी फॉर चेस असे समजले तर त्यातून भारताचा गौरवशाली इतिहास जगासमोर येतो हेच अनेकांना समजत नाही . क्रिकेटपेक्षा प्रेक्षणीय खेळ हा बुद्धिबळ आहे जो जगात एकाचवेळी जगातील सर्वात जास्त व्यक्ती खेळू शकणारा वैयक्तिक खेळ आहे . बुद्धिबळ स्पर्धेत खेळाडूंचे डाव स्पर्धेच्या ठिकाणी मोठ्या बोर्डवर दाखवले जातात त्यावेळी प्रेक्षक अरे या  खेळाडूने हि खेळी केली मी जर असतो तर हि चाल खेळलो असतो , किंवा या खेळाडूने केलेल्य चालीला प्रत्युत्तर म्हणून आपण जर त्या ठिकणी प्रत्यक्ष खेळात असतो तर हि चाल केली असती असे मनोमन विचार

करत अप्रत्यक्षरीत्या खेळतच असतो त्यामुळे बुद्धिबळ जगात एकाचवेळी जगातील सर्वात जास्त व्यक्ती खेळू शकणारा वैयक्तिक खेळ ठरतो क्रिकेटमध्ये फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारला किंवा , एखाद्या खेळाडूने महत्वाच्या खेळाडूंस बबाद केले तर ओरडण्याशिवाय फारसा सहभाग नसतोच त्यामुळे सी फॉर क्रिकेट असे म्हणणे किती निरस आहे हे समजते आणि हा खेळ भारतीय मातीतील आहे यात गुलामीचा अंश एका टक्का सुद्धा नाहीये जो क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणत आहे त्यामुळे आपण सी फॉर क्रिकेटच्या ऐवजी सी फॉर चेस म्हणटल्यासच आपण खरे देशभक्त ठरू . 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?