मराठमोळ्या दिव्या देशमुखांची सुवर्णपदाला गवसणी

    


  आपल्या भारतात बुद्धिबळ हा खेळ म्हंटले कि सर्वसाधारणपणे तामिळनाडू राज्याचेच नाव डोळ्यासमोर येतेतामिळनाडू आणि दक्षिण भारतातील बुद्धिबळपटूंनी बुद्धिबळ क्षेत्रात भारताचे नाव सातत्याने उंचावत ठेवले असले तरी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात देशासाठी लढणारा   किंवा १९६२ साली झालेल्या  भारत चीन युद्धात   लष्कराला सैन्यवाहतुकीसाठी अत्यंत कमी वेळेत बस  बांधून देणारा आपला महाराष्ट्र याही क्षेत्रात आपला दबदबा राखून आहे नागपूरच्या मराठमोळ्या  वूमन ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांनी  Asian Continental Blitz Women 2022, स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून हेच सिद्धकरण्यात आले आहे .

मराठमोळ्या वूमन ग्रँडमास्टर  दिव्या देशमुख या आशियाई कॉन्टिनेंटल 2022 मध्ये दोन पदके मिळवणाऱ्या  एकमेव भारतीय महिला खेळाडू  ठरल्या . पांरपारिक (क्लासिकल )प्रकारात  कांस्यपदक मिळवल्यानंतर, त्यांनी  अतिजलद (ब्लिट्झ ) महिला स्पर्धेत  पहिल्या डावातील पराभव पचवत त्यांचा पुढील डावांवर अनुचित परिणाम होऊ देता  पुढील डावात एक बरोबरी आणि तब्बल विजय मिळवले . त्यांनी स्पर्धेतील ब्लिट्झ प्रकारात साडेसात गुणांची कामगिरी केली त्यां नी त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा अर्ध्या गुणांची अधिकची कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या झोळीत घेतले

गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय बुद्धिबळपटू सातत्याने अत्यंत चमकदार कामगिरी करत आहेत या स्पर्धेत पारंपरिक ( क्लासिकल)  प्रकारात भारताला फक्त एकच पदक मिळाले असले तरी अतिजलद प्रकारात भारतने निर्विवाद वर्चस्व मिळवत महिला आणि खुल्या गटातील तिन्ही पदके (सुवर्ण ,रौप्य आणि कांस्य ) आपल्या खिश्यात


घेतली अबुधाबी ओपन दुबई ओपन , टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा  , महिला बुद्धिबळपटूच्या विश्वविजेते ठरवण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा असणारी महिला कॅन्डीडेट स्पर्धा अश्या अनेक स्पर्धा भारतीय बुद्धिबळपटूंनी आपल्या बौद्धिक चातुर्याने गाजवल्या आहेत आपल्या बौद्धिक सामर्थ्याची जगाला दाखल घेणे भाग पडले आहे मात्र दुर्दैवाने सी फॉर क्रिकेट असे म्हणत गुलामीचे लक्षण दाखवणाऱ्या माध्यमांकडून सी फॉर चेस असे म्हणत आपल्या भारताच्या अमूल्य ठेव्याबाबत अभिमान बाळगला जात नाही

 या सामन्यात भारतने एकूण पदके मिळवली त्यातील सुमारे २८ % म्हणजे दोन पदके मराठमोळ्या दिव्या देशमुख यांनी मिळवली काही महिन्यापूर्वी भुवनेश्वर येथे झालेली महिलांची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा दिव्या देशमुख यांनी जिंकली होती . दिव्या देशमुख यांच्यासह अनेक मराठी बुद्धिबळपटू अत्यंत चमकदार कामगिरी करत आहे आपल्या  भारतात कोणत्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशाचे किती ग्रँडमास्टर आहेत याची जास्तीकडून कमीकडे अशी यादी केल्यास तमिळनाडू पहिल्या क्रमांकावर येते तर दुसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे (जो पश्चिम बंगालपेपेक्षा एका ग्रँडमास्टरने पुढे आहे) नाशिकचे आयकॉन भारतातील क्रमांक दोनचे जे जागतिक क्रमवारीत १९ व्या  क्रमकांवर आहेत असे सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी आशियाई शालेय बुद्धिबळ खेळाडू प्रचिती चंद्रात्रे ( प्रचिती नाशिकच्या आहेत ) यासारखे अनेक गुणी मराठमोळे बुद्धिबळ खेळाडू सध्या महाराष्ट्रात आहेतदिव्या देशमुख यांच्या यशामुळे महाराष्ट्रातील या बौद्धिक संपदेकडे यंत्रणेचे लक्ष जावो त्यांच्या अडचणी दूर होवोत अशी मनोकामना करत आपली रजा घेतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?