भारताच्या लढ्याला यश


     सध्या
इजिप्तमध्ये सुरु असलेल्या कॉप २७ या अधिवेशनामध्ये भारताच्या लढ्याला यश मिळाल्याचे दिसत आहे कारण जीवाश्म इंधने कमी करण्याच्या भारताने शनिवार १२ नोवेंबर रोजी केलेल्या  आवाहनाला सोमवारी १४ नोव्हेंबरला अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) ची स्थापना करणार्या 39 देशांनीही पाठिंबा दिला आहे अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) . ही लहान बेट असलेल्या देशांची संघटना आहे या संघटनेतील देश समुद्रपातळीत वाढ झाल्यामुळे नष्ट होण्याच्या धोका आहे  या संघटनेसह .युरोपियन युनियन आणि युनायटेड किंगडम यांनी देखील  भारताच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे या प्रस्तवावर हा लेख लिहण्यापर्यंत अमेरिकेने मौन बाळगले आहे अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या यशामुळे ते अपेक्षित देखील होते जागतिक हवामान बदल हि सर्वसाधारण नैसर्गिक प्रक्रिया आहे मानवाचा हस्तेक्षेपणाने होणारी प्रक्रिया नाही त्यामुळे मानवाने त्यासाठी केलेल्या गोष्टींमुळे होणारी हि प्रक्रिया आहे अशी सर्वसाधारण भूमिका रिपब्लिकन पक्षाची आहे 

       गेल्या वर्षी, युनायटेड किंगडमने त्यांच्या  देशातील स्कॉटलंड या भागाची राजधानी असलेल्या  ग्लासगो शहरात झालेल्या COP26 अधिवेशनदरम्यान "कोळसा आणि संबंधित उत्पादने टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्याची" जोरदार मागणी केली होती केली होती.तसेच या २०२२२ या वर्षी युनाटेड  किंग्डमनेने गेल्या १०० वर्षातील सर्वात जास्त उष्मा

अनुभवाला आहे तसेच मोठ्या दुष्काळाचा देखील सामना केला आहे त्यामुळे भारताने मांडलेल्या या मुद्यावर तो स्वतंत्र भूमिका मांडण्याची शक्यता  कमी आहे 

 या निर्णयाला तेल आणि वायू उत्पादक देश तसेच चीनकडून विरोध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे नैसर्गिक इंधनाच्या निर्यातीतर देशाची जवळपास सर्व अर्थव्यवस्था अवलूंबून असणाऱ्या सौदी अरेबियाच्या  ऊर्जा मंत्री, प्रिन्स अब्दुलअझीझ बिन सलमान यांनी गेल्या आठवड्यात एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही सध्यातरी तेलाचे उत्पादन  टप्प्याटप्प्याने कमी करण्याच्या कराराला पाठिंबा देण्याची शक्यता नाही.  COP27 हवामान शिखर परिषदेदरम्यान सौदी ग्रीन इनिशिएटिव्हमध्ये मंत्री म्हणाले.“आमची याबाबत भूमिका अत्यंत सावध आहे  ,”कॉप २७ मध्ये  शनिवारी भारताने  हवामान बदलास असुरक्षित असलेल्या देशांच्या गटाचे नेतृत्व केले आणि सर्व जीवाश्म इंधने टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय घेतला.

नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या या अधिवेशनावर आयोजक असलेल्या इजिप्तकडून  COP27 चे परिणाम हवे आहेत जे हवामान बदलाच्या परिणामी जगभरातील दुःखद परिस्थितीशी सुसंगत आहेत," इजिप्शियन COP27 अध्यक्षांचे विशेष प्रतिनिधी वेल अबोलमागड यांनी पत्रकारांच्या एका गटाला सांगितले. "गंभीर महत्वाकांक्षा दाखवण्यासाठी प्रसंगी उठणे हे सदस्य राष्ट्रांवर अवलंबून आहे."अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे 

         गेल्या वर्षीचा २०२१ च्या कॉप अधिवेशनाच्या (जे कॉप २६ नावाने ओळखले जाते ) दरम्यान येत्या भविष्यकाळात हवामान बदलामुळे जगात सर्वाधिक प्रभावित  होणारा देश भारत असेल असा अहवाल प्रसिद्ध 

झाला होता भारताने सौरऊर्जा या अपारंपरिक ऊर्जेची अधिककाधिक निर्मिती व्हावी यासाठी या आधीच प्रयत्न सुरु केले आहेत ज्याची जागतिक  स्तरावर अत्यंत चांगली दाखल घेण्यात आलेली आहे . जगात भारताला सौर ऊर्जा क्षेत्रातील अग्रगगनी देश म्हणून ओळखले जाते पॅरिसअग्रिमेरण्टद्वारे ठरवण्यात आलेले ग्रीनहाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्याची उद्दिष्ट जी २० या संघटनेत फक्त भारताने मोठ्या प्रमाणत पूर्ण केले आहे भारताखेरीज या संघटनेतील अन्य देश आणि युरोपीय युनियन ही संघटना हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात खूपच मागे पडल्याचे या आधीच सिद्ध झाले आहे त्या पार्श्वभूमीवर भारतानं हे पाऊल उचलले आहे जयवर जागतिक मोहोर उमटल्याची पोच पावतीच या निर्णयामुळे झाली असल्याचे या प[ठिब्यावरून दिसून येत आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?