भारताला लोकशाहीप्रधान करणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी

     


 भारताला  लोकशाहीप्रधान करणाऱ्या  पंतप्रधान इंदिरा गांधी ? चमकलात ना ! ज्या इंदिरा गांधी यांनी देशात स्वहितासाठी आणीबाणी जाहीर करून देशातील लोकशाही संपवणाऱ्या पंतप्रधान म्हणून  देश ओळखतो त्यांना भारताला  लोकशाहीप्रधान करणाऱ्या  पंतप्रधान इंदिरा गांधी कसे काय म्हणता येऊ शकते ? असा आपणास प्रश्न पडू शकतो , तर त्या लोकांना मी सांगू  इच्छितो की , देशातील संस्थानिकांचे तनखे रद्द करत भारताला खऱ्या अर्थाने लोकशाहीप्रधान केले ते  इंदिरा गांधीनी  हे नाकारण्यात काही अर्थ नाही .  कोणत्याही प्रजासत्ताक लोकशाहीप्रधान  देशात जनता स्वर्वभौम असते.  कोणताही राजा त्या देशात विशेष सवलती घेऊ शकत नाही हा संदेश देत त्यांनी भारताला खऱ्या अर्थाने लोकशाहीप्रधान देश केला . विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानातील काश्मीरविषयक ३७० वे कलम काढण्याचा निर्णय जेव्हढा धाडसी होता त्याच प्रकारचा धाडसी निर्णय म्हणून या कडे बघता येऊ शकते स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी संस्थानिकांनिकांशी केलेल्या करारानुसार पुढील ५० वर्षे जे तनखे त्यांना देण्यात येत होते ते त्यांनी सुमारे २५ वर्षातच रद्द केले तनखे रद्द केल्यामुळे त्या त्या भागात मोठा प्रभाव
असणाऱ्या व्यक्ती नाराज होतील ज्याचा राजकीय फटका आपणास बसू शकतो याची तमा ना बाळगता त्यांनी हा निर्णय घेतला . आज काही अपवाद वगळता बहुसंख्य संस्थानिक कांग्रेसेतर पक्षात आहेत ज्याचा मुळाशी हे कारण आहे  संविधानाच्या प्रास्तविकेत सुरवातीपासून भारताच्या ज्या स्वरूपाचा उल्लेख आहे ते प्रत्यक्षात आणण्याचे शिवधनुष्य इंदिरा गांधींनी या निर्णयाने लीलया पेलले असेच याबाबत म्हणता येईल .

  देशांत गरज नसताना आणीबाणी लादून विरोधकांचा आवाज क्रूरपणे दाबण्याविषयी सातत्याने बोलले जाते  मात्र त्याच वेळी त्याच व्यक्तीने देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक करणाऱ्या या घटनेविषयी फारच कमी बोलले जाते कोणत्याही व्यक्तीचे मूल्यमापन करताना त्या व्यक्तीने केलेल्या चुकीचा कामांविषयी बोलताना त्याच व्यक्तीने केलेल्या चांगल्या कामांविषयी देखील बोलायला हवे तर आणि तरच त्या व्यक्तीचे खऱ्या अर्थाने मूल्यमापन होऊ शकते . हि बाब लक्षात घेता ज्या प्रमाणे आणिबाणीविषयी बोलले जाते त्याचप्रमाणे या लोकशाहीला साह्य होईल अश्या या गोष्टीविषयी बॊलल्यास इंदिरा गांधींचे खऱ्या अर्थाने मूल्यमापन होईल आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीचे होणारे नुकसान बघून इंदिरा गांधींच्या कार्यकाळाचे मूल्यमापन केल्यास ते एकांगी होईल त्यामुळे संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याच्या या निर्णयामुळे देशातील लोकांशी बळकट होण्यास काय हातभार लागला याचा देखील अभ्यास होणे आवश्यक आहे 

आणीबाणी लादण्याची खरंच गरज होती का ? याबाबत अमेरिकेच्या त्यावेळच्या कागदपत्रांचा आधार घेत  मोठा खल करता येऊ शकतो मात्र संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याच्या निर्णयाबाबत  अशी चर्चा करता येत नाही कितीही इंदिरा गांधींचा विरोधक असला तरी इंदिरा गांधींच्या या निर्णयामुळे देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला हे नाकारू शकणार नाही आणि त्यातच त्यांचा विजय आहे 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?