अवकाश संशोधन क्षेत्रातील नवे प्रवाह आणि भारताची प्रगती

  


२०२२ नोव्हेंबर १८ या तारखेची नोंद भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात एक मैलाचा दगड म्हणून झाली आहे कारण  हैद्राबाद येर्थील खासगी कंपनी "स्कायरूट एरोस्पेस कंपनी" च्या मालकीचे रॉकेट घेऊन इसरोच्या मालकीच्या श्रीहरीकोटा तळावरून यशस्वी उड्डाण केले . ही घटना अत्यंत महत्वाची आहे . कारण भारतात प्रथमच एखाद्या भारतीय मालकीच्या  खासगी कंपनीचे रॉकेट उडाले आहे या आधी इसरोने अनेक अन्य देशांचे उपग्रह अवकाशात सोडले आहेत काही परदेशी कंपन्यांचे देखील उपग्रह अवकाशात सोडले आहे त्यामुळे भारत सरकार खेरीज अन्य मालकीचे उपग्रह रॉकेट सोडणे यात नवीन काही नाही नवीन आहे ते भारतीय मालकीच्या खासगी कंपनीच्या मालकीचे रॉकेट भारत सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या अवकाश संशोधन संस्थेच्या रॉकेट उड्डाण तळावरून आकाशात जाणे अवकाश संशोधन क्षेत्र कसे बदलत आहे याचा हा वस्तुस्थीतीदर्शक . पुरावाच म्हणावा लागेल

          अवकाश  संशोधन क्षेत्राची जगभरात एक सरकारी उपक्रम म्हणून झाली ज्यास भारत देखील अपवाद नव्हता . भारतात  १९६२ साली अणू आयोगाच्या अंतर्गत भारताच्या भारताच्या अवकाश संशोधनाचा पाया रचला होता ज्यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे मोठे योगदान होते पुढे १९६९मध्ये  पंतप्रधान मंत्रालयाच्या अधिपत्याखाली अवकाश संशोधन विभागाची स्थापना करत या विभागांर्गत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यान संस्थेची स्थापना करण्यात आली त्यास आपण इसरो या संक्षिप्त नावाने ओळखतो , अमेरिकेत १९५८ साली नॅशनल स्पेस रिसर्च एजन्सी या नावाने राष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात आली .त्याचप्रमाणे

जगभरात चीन जपान फ्रांस , युएससार आदी देशांनी त्यांच्या त्यांच्या सरकारी नियंत्रांत अवकाश संशोधन संस्था स्थापन केल्या .  त्याच मालिकेत अमेरिकेत अंतराळ संशोधन संस्थेची निर्मिती झाल्यानंतर चारच वर्षात स्वातंत्र्यनंतर १५ वर्षात भारतात सरकारकडून अवकाश  संशोधन क्षेत्राचा पाय रचला गेला (७० सालमे क्या हुवा ?)  खासगी क्षेत्राचा या क्षेत्रातील शिरकाव आपणास सुरवातीला दिसत नाही या क्षेत्रात करणयास लागणारी भलीमोठी गुंतवणूक आणि यशाची खात्री नसणे या सारख्या काही गोष्टींमुळे खासगी क्षेत्र आपणास यापासून दूर राहिलेलेच आपणास दिसत आहे

     कालांतराने तंत्रज्ञाच्या प्रगतीमुळे या क्षेत्रात यशस्वी होण्याचे वाढल्याने अनेक खासगी गुंतवणूकदारना या क्षेत्रात गुंतवणूक करावीशी वाटली  मागील वर्षी 11 जुलै रोजी  रिचर्ड  ब्रानसन यांनी अवकाश पर्यटन या क्षेत्रात खासगी क्षेत्राला किती आकर्षण आहे हे सिद्ध केलेच आहे त्यानंतर  रिचर्ड  ब्रानसन यांच्यानंतर 9 दिवसांनी  अब्जाधीश उद्योजक जेफ बेझोस यांनी 20 जुलै रोजी अवकाशात पर्यटनाचा हेतूने उड्डाण केले .त्यामुळे खासगी क्षेत्रातील व्यक्तींना अवकाशात किती उत्सुकता आहे हे सिद्ध झाले  स्वःताच्या फायदयासाठी अनेक कंपन्यांनी स्वनिर्मित उपग्रह सरकारी रॉकेटच्या माध्यमातून अवकाशात सोडायला सुरवात केली    काही परदेशी कंपन्यांनी स्वनिर्मित रॉकेटची निर्मिती देखील केली . त्या रॉकेटचे प्रक्षेपण परदेशाच्या  सरकारच्या अवकाश संशोधन संस्थेमार्फत उभारण्यात आलेल्या उपग्रह प्रक्षेपण यंत्रणांच्या माध्यमातून सोडले मात्र भारतात असा प्रयोग झाला नव्हता जो २०२२ नोव्हेंबर १८ रोजी झाला

     इसरोने देखील देशाची प्रगती होण्यासाठी करण्यात येणाऱ्या संशोधनाला लागणाऱ्या पैशाची सोय व्हावी या यासाठी अन्य देश आणि खासगी कंपनीचे उपग्रह अवकाशात सोडायला सुरवात केली मात्र हे उपग्रह इसरो स्वतःच्याच रॉकेटद्वारे सोडत होती  जगतील अन्य देशांच्या सरकारी अवकाश संशोधन संस्था  या प्रकारच्याउड्डणसासाठी स्वतःच्या रॉकेट बरोबर  खासगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करायला सुरवात देखील केली होती इसरॉमध्य मात्र खासगी कंपनीचे  रॉकेट इसरोच्या रॉकेट उड्डाण तळवरून उडवण्यात आले नव्हते मात्र अवाक्ष संशोधन क्षेत्रासाठी लागणाऱ्या अवाढव्य खर्च अंदाज बघून अधिकाधिक पैसे घेण्यासासाठी इसरॉने खासगी कंपनीचे रॉकेट देखील आपल्या प्रक्षेपण तळवरून प्रक्षेपित करण्यास परवानगी दिली ज्याची सुरवात २००२२ नोव्हेंबर १८ रोजी झाली

 २०२२ नोव्हेंबर १८ रोजी इसरॉकडून ज्या कंपनीचे रॉकेट पप्रक्षेपित करण्यात आले ती स्कायरूट एरोस्पेस कंपनी"हि भारतीय मालकीचे स्टार्टअप कंपनी आहे एका भारतीय मालकीच्या स्टार्टअप  कंपनी  रॉकेट तयार करून प्रक्षेपित करण्यात आल्याने भारतीय तरुण कुठेही मागे नाहीत हा संदेश जगभरात गेला आहेच भारतीय तरुणाची बौद्धिक क्षमता कुठेच कमी नाही तसेच ते आर्थिक दृष्ट्या अत्यंत चांगल्या स्थितीत आहे गरिबांचा भुकेल्याकंगालांचा देश हि भारताची प्रतिमा आता खूप दूर गेली आहे हा २१ व्या कातील भारत आहे जो पुन्हा एकदा जगाला दिशा दाखवणारा भारत आहे हे जगाला यामुळे समजले आहे जे आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिनंदस्पद आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?