पाकिस्तानातील बदलते राजकीय विश्व

       


  
सध्या पाकिस्तानमध्ये या जागतीलाच नव्हे तर संपूर्ण विश्वातील सर्वात वेगवान घटक असणाऱ्या प्रकाशाशी तर स्पर्धा  करत नाही अशा भास व्हावा , या विद्यत्वेगाने राजकीय बदल घेतहोते .इम्रान खान यांचा महामोर्चा हकिकी आझादी हा रावळपिंडीत (सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांचा भाषेत पिंडी{ अहमदनगरला जसे नगर म्हणतात तसे } ) कधी पोहोचणार या बाबत विविध शक्यता वर्तवण्यात येत असताना शनिवार  १९नोव्हेंबर रोजी महामोर्च्यला ऑनलाईन पद्धतीने संबोधित करताना त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला त्यांनी पुढील आठवड्यात शनिवारी अर्थात २६ नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यांना पाकिस्तानमधील लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीत जमा होण्याचे आदेश दिल्याने  याच दिवशी इम्रान खान यांचे समर्थक पाकिस्तानची १९६१ पासूनची  राजधानी इस्लामाबादला घेराव घालतील असे जाहीर केले आहे

        (पाकिस्तानची १९४७ ते १९६२ पर्यंत राजधानी कराची  शहर होते १९५८ ला त्यांनी राजधानी रावळपिंडी नजीक नेण्याचे ठरवले आणि त्यावेळच्या पूर्व पाकिस्तान {आताच बांगलादेश }मधून मिळणाऱ्या कराच्या पैशावर त्यांनी इस्लामाबाद हे नवीन शहर१९६१ ला  वसवले त्यामुळे गमतीने इस्लामाबादला खरेतर बांगलाबाद असे म्हंटले जाते ) रावळपिंडी आणि इस्लामाबाद ही जुळी शहरे आहेत [ आपल्या भारतातील हैद्राबाद आणि

सिकंदराबाद सारखी ] रावळपिंडीचा कारभार पाकिस्तानी पंजाबच्या सरकाकडून बघितला जातो तर इस्लामाबादचा कारभार बघण्यस्साठी फेडरल कॅपिटल टेरेटरी हि स्वतंत्र्य व्यवस्था आहे  इस्लामाबाद येथील आंतराष्ट्रीय विमानतळ रावळपिंडी महानगरपालिकेच्या हद्दीत येतो सध्या पाकिस्तानी पंजाबमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाच्या पाठिंब्यावर पाकिस्तान मुस्लिग लीग कायदे गटाचा मुख्यमंत्री आहे नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नूर गट  हा आहे  (पाकिस्तानी मुस्लिग लीग या पक्षात १९८९ ला नवाझ शरीफ यांनी बंडखोरी केली त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील शिवसेनेसारखे दोन पाकिस्तानी मुस्लिग पक्ष तयार झाले ) हे सगळे बघता पाकिस्तान तेहरीके इन्साफ     या पक्षाचे  कार्यकर्ते पाकिस्तानी राजधानीचा संपर्क तोडू शकतात

       दरम्यान २१ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानचे संरक्षण मंत्रीख्वाजा अशरीफ यांनी पाकिस्तानमधील राजकारण गेल्या काही दिवसात ज्या मुद्याभोवती फिरले त्या नव्या लष्करप्रमुखांची घोषणा २५ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल असे जाहीर केले आहे त्यामुळे वर्तमान पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा' हे २९ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांची जागा कोण घेणार हे शुक्रवारी समजले .पाकिस्तानमधील प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्था बघता पाकिस्तानी लष्करप्रमुख कोण होणार ? यास अत्यंत महत्व आहे पाकिस्तानचा पंतप्रधान कोण होणार ?   पाकिस्तानमधील  विरोधी पक्षनेता किती प्रभावी ठरेल .पाकिस्तानमधील लोकशाहीमध्ये जनतेच्या मताचा किती विचार करण्यात येईल पाकिस्तानमधील लोकशाही कशी नांदेल ?  या सारख्या अनेक गोष्टींचा अप्रत्यक्ष निर्णय हा पाकिस्तानी लष्करप्रमुखच घेत असतो १९७८ साली आपल्या मर्जीतील विश्वासातील व्यक्ती म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिखार अली भुट्टो ( या झुल्फिखार अली भुट्टो यांचे वडील जुनागढच्या नवबाचे दिवाण होते १९४७ साली ते पाकिस्तानला गेले या पाकिस्तानला गेलेल्या माणसाच्या आधी जी व्यक्ती दिवाणपदी होती ती म्हणजे परवीन बाबी या सिने अभिनेत्रींचे वडील ) यांनी ह्याह्या खान यांना लष्करप्रमुख म्हणून नेमले दोन वर्षांनी हा आपला माणूस आहे हा आपले काहीही वाकडे करणार नाही 

या समुजूतीत असणाऱ्या झुल्फिखान अली भुट्टो यास अथवा करून ह्या ह्या खान यांनी पदावरून हटवले आणि पुढे फाशी दिले हा इतिहास बघता २५ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानचा नवा लष्करप्रमुख कोण होतो यास खूप महत्व आहे रावळपिंडी हा महामोर्चा पोहोचण्याचा आधी एक दिवस हि नेमणूक जाहीर होत आहे हा घटनाक्रम लक्षात घेणे आवश्यक आहे

 इम्रान खान हे प्रत्यक्ष ममहामोर्च्यात  सहभागी नसले तरी त्यास मिळणार पाठिंबा बघता येणारा पुढील काळ पाकिस्तानसाठी करा अथवा मरा या प्रकारचा आहे हे मात्र १०० % सत्य आहे पाकिस्तानमधील राजकीय घडामोडीचा भारतवर देखील परिणाम होत असल्याने या घडामोडी भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहेत या घडामोडी एकेकाळी पाकिस्तानचा भाग असलेल्या मात्र सध्या स्वतंत्र देश असलेल्या बांगलादेशच्या निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होताना होत आहे हा एका दुसरा दुर्दैवी योगायोग सध्या जुळून येत आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?