पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्नशील मात्र दुर्लक्षित जिल्हा उस्मानाबाद (धाराशिव जिल्हा )

       


आपला महाराष्ट्र पर्यंटनस्थळाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे . राज्याचा असा कोणताही जिल्हा नाही कि ज्यात पर्यटनस्थळ नाही कोल्हापूर पासून नंदुरबार आणि मुबई शहर पासून गडचिरोली गोंदिया या सर्व जिल्ह्यात आपणास पर्यटन स्थळे आढळतात . मात्र काही जिल्हे खास पर्यटनासाठी ओळखले जातात तर काही पर्यटनाच्या दृष्टीने काहीसे अपरिचित आहेत परुंतु त्या जिल्ह्यत पर्यटनस्थळे नाहीत असे नाही अश्याच पर्यटनाच्या दृष्टीने काहीसा अपरिचित मात्र पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्धी होण्यासाठी धडपडणारा जिल्हा म्हणजे  उस्मानाबाद (धाराशिव जिल्हा ) ,महाराष्ट्रात पालघर या जिल्ह्याच्या अपवाद वगळता अन्य सर्व जिल्ह्याची जिल्ह्याचे नाव नंतर एनआयसी इन या डोमिन नेमखाली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट आहे (पालघरला डोमेन नेम जीओव्ही इन आहे )  ज्यामध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती दिलेली असते  तशीच ती उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यलयाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे . मात्र उमसनबाद जिल्ह्याच्या वेबसाईटवर देण्यात आलेली माहिती हितालुक्यानुसार  देण्यात आली आहे मी बघितलेल्या अन्य जिल्ह्याच्या वेबसाईटवर अशी तालुकानिहाय माहिती देण्यात आलेली नाही उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यलयाच्या या प्रयत्नातून जिल्हा प्रशासन जिल्ह्यतील प्रशासन जिल्ह्यतील पर्यटन वाढवण्यासाठी किती प्रयत्नशील आहे हे समजते त्याबाबत त्यांचे कौतुक करायलाच हवे असो प्रशासनच्या या प्रयत्नामुळे  उस्मानाबादचे  वर्णन पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्नशील मात्र दुर्लक्षित जिल्हा उस्मानाबाद (धाराशिव जिल्हा ) असे केल्यास चुकीचे ठरू नये 

     तर या उस्मानाबाद जिल्ह्याला मी नुकतीच एसटी महामंडळाच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेच्या लाभ घेत भेट दिली त्यावेळी मला आलेले अनुभव सांगण्यासाठी आजचे लेखन तर मित्रानो देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या  तुळजापूर खेरीज नळदुर्ग आणि परांडा येथील भुईकोट किल्ला , उस्मानाबाद येथील धाराशिव लेणी , आणि  हातलादेवी मंदिर आदी अनेक  पर्यटनस्थळे आहेत हि सर्व पर्यंटनस्थळे अत्यंत उत्तम बघायलाच हवी या प्रकारची आहेत चला तर जाणून घेऊया या पर्यटनशीलाविषयी 

नळदुर्ग हा किल्ला तुळजापूर तालुक्यात तुळजापूर शहरापासून २८ किमी अंतरावर आहे तुळजापूर येथील मुख्य बसस्थानकातून दर पंधरा मिनिटाला नळदुर्गासाठी बसेस आहेत सोलापूरआणि उस्मानाबाद  येथून अक्कलकोट येथे जणाऱ्या बसेसने देखील आपणास या ठिकाणी जाता येते . पुरातत्व खात्यामार्फत या किल्ल्याची देखभाल करण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे या कंपनीमार्फत या ठिकाणी गेस्ट हाऊसची सोय करण्यात आली आहे मात्र तुळजापूर  येथे मुक्काम करत किल्ला बघणे अधिक सोईस्कर आहे  किल्ला सुमारे दीड ते पावणेदोन तासात सहज बघून होतो तुळजापूर येथून देवी दर्शन झाल्यावर पुढच्या  दोन तास किल्ला बघणे आणि प्रवाश्याला येऊन जाऊन दोन तास असे एकूण चार तासात प्रवास पूर्ण होत असल्याने देवी दर्शन झाल्यावर पुढील चार तासात किल्ला भ्रमंती करणे अधिक उत्तम आहे . देखभाल करणाऱ्या कंपनीमार्फत किल्ला बघण्यासाठी १२ वर्षाच्या पुढील व्यक्तीसाठी २० रुपये तर पाच ते बारा वर्षातील मुलामुलींसाठी १० रुपये तिकीट आकारण्यात येतात फिरण्यासाठी कॅमेरा नेण्याचा असल्यास परवानगी आवश्यक असल्याचा बोर्ड या ठिकाणी आहे मात्र कुठेही ते तपासत नाही आपण सहजतेने बॅग घेत कॅमेरा घेऊन किल्ल्यात जाऊ शकतो मी स्वतः मोबाईलने फोटो काढत असताना कोणीही अडवले नाही  .नळदुर्ग किल्ल्यात  अनेक फोटो काढता येतील अश्या ४ जागा आहेत  किल्ला इस्लामी बांधणीच्या भाग आणि हिंदू बांधणीचा भाग असा दोन भागात विभागाला आहे इस्लामी भाग १०४ एकर तर हिंदू भाग २२ एकर आहे किल्ल्याची पडझड झाल्याने काही भाग पर्यटकांसाठी  धोकादायक

झाला आहे त्यामुळे तो भाग बंद करण्यात आला आहे किल्ल्यात चहा , विविध शीतपेये विकण्याचे  स्टॉल आहेत  गावात प्रवेश करताना बसस्टॅन्ड समोरील रस्त्याने कुठेही न वळता सुमारे दोन किमी चालत गेल्यास आपण किल्याच्या ठिकणी पोहोचतो पाऊस पडत असताना येथील धबधबा अत्यंत प्रेक्षणीय असतो किल्ल्यात दोन धबधबे आहेत ज्यास नर धबधबा आणि मादी धबधबा अशी नावे आहेत 

परांडा येथील किल्ला नळदुर्ग किल्यासारखाच आहे त्या ठिकाणी जाणयासाठी बार्शीहुन बसेस मिळू शकते तुळजापूर येथून यासाठी बसेस नाहीत आपणास तुळजापूर येथून बार्शीला येऊन बस बदलून या ठिकाणी यावे लागते बार्शीहुन तुळजापूर सुमारे ३० ते ३५ किमीवर आहे बार्शीहून परांडा किल्ला देखील तितकाच लांब आहे परांडा किल्ल्यापासून लातूर जवळ आहे 

    धाराशिव लेणीबाबत बोलायचे झाल्यास उस्मानाबाद शहरातून औरगांबाद येथे जणाऱ्या रस्त्यावर बसस्टॅण्ड पासून सुमारे एक  किलोमीटरवर  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तेथून  डाव्या हाताला वळल्यावर रस्त्यात कुठेही न वळता  सुमारे तीन ते चार किमी गेल्यावर आपण लेण्याच्या ठिकाणी पोहोचतो . या लेण्या 


बघण्यासाठी सुमारे ५० पायऱ्या उतरून जावे लागते . या ठिकाणी पुरातत्व खात्यामार्फत असणारा लेण्याची माहिती देणारा बोर्ड पूर्णतः गंजलेला आहे या ठिकाणी लेण्याचे दगड कोसळल्याची शक्यता असल्याने,  पर्यटकांनी लेण्यात जाऊ नये असा सुरक्षिततेचा बोर्ड आहे मात्र लेणी परिसरात कुठेही त्याबाबत काही उपाययोजना केल्याचे मला दिसले नाही या ठिकाणी एकूण ५ लेणी असून चार लेण्याचा एक समूह आहे तर एक लेणी समुहापासून लांब आहे . लेणी परिसरात एक भगवान शंकराचे मंदिर आहे मात्र मंदिर पूर्णतः अंधारात असून वटवाघुळाचे वास्तव स्थान आहे त्यामुळे वटवाघुळांचा आवाज आणि त्यांचा विष्टेचा उग्रदर्प जर सहन करण्याची क्षमता असल्यांसस मंदिर उत्तम आहे बसस्थानकाच्या बाहेर असलेल्या रिक्षा स्टॅण्डवरील रिक्षा १५०  रुपयात आपणस फिरवून   पुन्हा   सोडवून आणतात 

हातलादेवी मंदिर हे उस्मानाबादपासून ५ किलोमीटरवर उस्मानाबाद बार्शी रस्त्यावर आहे मंदिर एका टेकडीवर स्थित असून मंदिरापर्यंत डांबरी रस्ता आहे  उस्मानाबाद बार्शी रस्त्यावर बार्शीपासून येताना उजव्या ठिकाणी उस्मानाबादपासून चार किमीवर एका तळ्याच्या समोर असलेल्या टेकडीवर मंदिर आहे . परिसरात प्रचंड झाडे असून सर्व परिसर अत्यंत रमणीय आहे सूर्यास्तापूर्वी सुमारे अर्धा तास येथे आल्यास अधिक उत्तम आहे  अनेक जण या ठिकाणी व्यायामासाठी येतात . पुण्यातील तळजाई पार्वती , सारखा हा भाग  आहे मंदिर परिसरात मात्र खाद्यपदार्थाचे स्टॉल नाहीत जर समूहातून आल्यास बस स्थानकातून ३० रुपये प्रतिव्यक्ती  या दरात रिक्षा मिळू शकते जर एकटे आल्यास २०० ते २५० रुपयात रिक्षा मिळू शकते . 

माझा गेल्या सहा महिन्यातील   मराठवाड्यातील हा चौथा प्रवास या आधी मी जालना , बीड या दोन जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बघण्यासाठी स्वतंत्र ट्रिपा तर परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यसाठी एकत्र ट्रिप  केल्या या सर्व प्रवाश्यात मला तुरळक एम आय डी  सी दिसली जी एम आय डी सी दिसली त्याबाबत स्थानिकांशी या बाबत

बोलल्यावर त्या ठिकाणी फारसे मोठे उद्योग  नाहीत असे त्यांनी मला सांगितले रस्त्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास  उस्मानाबाद जिल्ह्याचा अपवाद वगळता सर्वत्र रस्त्याची अवस्था उत्तम होती इतर मराठवाड्याच्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यतील रस्ते तुलनेने बऱ्यापैकी खराब स्थितीत असल्याचे मला जाणवले मराठवाड्याचा विचार करता मला उस्मानाबाद जिल्ह्यतील शेतीसुद्धा फारशी चांगली नाही असे जाणवले उस्मानाबाद शहारत रस्त्यावर मला प्रचंड धूळ दिसली कचरा दिसला नाही धूळ दिसली हे लक्षात घेता आपणास तिथे काय हवामान आहे हे समजते उस्मानाबाद शहरातील रस्त्याची  स्थिती दयनीय होती जी सुधारणे आवश्यक आहे असो 

भारतात मैलागणिक भाषा बदलते याचा अनुभव मी स्वतः घेतला माझ्या नाशिक परिसरात ज्या पदार्थाला वडा रस्सा म्हनतात त्यास तिथे वडा उसाला म्हणतात तसेच सर्वसाधनपणे लेमन टी या नावाने प्रसिद्ध असलेल्या पदार्थाला डिक्शन असे देखील म्हणतात हे मला त्या ठिकाणी समजले तसेच कुरमुरे (चुरमुरे ) पासून तयार केलेला सुशीला हा पदार्थ देखील मला या परिसरात चाखता आला मला या प्रवाश्यात खूपच मज्जा आली आपण देखील हि मज्जा घेण्यासाठी या प्रदेशात  फिरवावेच असे मी सुचवतो मग फिरणार ना उस्मानाबाद जिल्हा  



  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?