एका नाशिकरामुळे भारत जागतिक स्तरावर तरुण जातो तेव्हा

       


     १९६२ च्या युद्धाच्यावेळी पराभवानंतर  महाराष्ट्रीयन यंशवंतराव  चव्हाण यांनी भारताच्या सरंक्षण मंत्री पदाची सूत्रे हाती घेतली होती . त्यावेळी अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाच्या सरंक्षण खात्याला नवसंजीवनी दिली त्यांच्या या मदतीचे वर्णन हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे करण्यात येते यशंवतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री असताना नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीतीत्व लोकसभेत केले होते आज या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाली आहेत आज २०२२ साली ६० वर्षानंतर पुन्हा एकदा एका नाशिकराने देशाला एका कठीण स्थितीतून बाहेर काढले आहे . या नाशिकराचे नाव आहे नाशिकचे भूषण तरुणाचे आयकॉन सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी त्यांनी फिडे केस चॅम्पियनशिपमध्ये भारताला स्पर्धेतील आव्हान टिकण्यासासाठी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवणे आवश्यक असताना विदित गुजराथी यांनी अमेरिकेच्या नीमन हंस मोके यांच्यावर काळ्या मोहऱ्या घेऊन खेळताना विजय मिळवत संघाला उपउपांत्य फेरीत प्रवेश मिवळून दिला

         पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये इस्रायल आणि पोलंडविरुद्धच्या लढती अनिर्णित  अनिर्णित राहिल्यानंतर, विदित गुजराथी यांनी शाखरियार मामेदयारोव यांच्यावर उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत  मिळवलेल्या  विजयामुळे तिसऱ्या फेरीत भारताने पूल बीमध्ये अव्वल असलेल्या अझरबैजानचा 2.5-1.5 असा पराभव केला  या विजयामुळे भारताच्या प्ले-ऑफच्या आशा जिवंत राहिल्या मात्र  उझबेकिस्तानने भारताला हरवल्यामुळे भारताचे पारडे पुन्हा हलके होत भारत स्पर्धंतून बाहेर पडतो का ? अशा प्रश्न उपस्थित झाला . पण अमेरिकेविरुद्ध खेळताना  पाचव्या आणि अंतिम सामन्यात  पहिल्या पटावर खेळताना विदित गुजराथी यांनी नीमन हंस मोके यांच्या  पराभव केला. गुजरातीं यांनी  निमन हॅन्स मोकेविरुद्ध संस्मरणीय खेळ केला या वेळी त्यांनी रेटी ओपनिंग पद्धतीने खेळत ३७ चालीत समोरच्याला हार मान्य करायला लावली   

     भारत फिडे चेस ओलम्पियाडमध्ये कांस्यपदक विजेता संघ असल्याने स्पर्धेत भारतीय संघाकडून ऊत्तम खेळाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती त्यातच  स्पर्धेच्या पहिल्या टप्यात साखळी सामन्यादरम्यान पहिल्या दोन डावात अनुक्रमे इस्राईल आणि पोलंड या काहिस्या दुबळ्या मानल्या जाणाऱ्या संघाविरुद्ध बरोबरी मान्य करण्याबरोबर चौथ्या फेरीत उझबेकिस्तान विरुद्ध हरल्याने भारतीय संघ साखळी फेरीतच गारद होतो का ? असा प्रश्न निर्माण झाला होता स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला अमेरिकेविरुद्ध विजय संपादन करणे 

आवश्यक होते अश्या कठीण स्थितीत विदित गुजराथी यांनी अमेरिकेच्या संघात असणाऱ्या नीमन हंस मोके यांच्याविरुद्ध खेळत शानदार विजय मिळवावा त्यांच्या या विजयामुळे भारताला उपउपांत्य फेरी गाठता येणार आहे         

या वेळी भारताचा सामना पहिल्या ए गटातून उपउपांत्य गटात प्रवेश केलेल्या फ्रान्सविरुद्ध होईल . स्पेन चीन युक्रेन आणि फ्रांस यांनी पहिल्या  ए गटातून उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे तर भारताच्या बी गटातून भारत पोलंड अझरबैजान आणि उझबेकिस्तान हे संघ पुढील युफेरीत दाखल झाले आहेत स्पर्धेतील पहिल्या टप्यातील सामने साखळी पद्धतीने झाले होते ज्यात प्रत्येक संघ हरला किंवा जिंकला तरी गटातील अन्य प्रतिस्पर्ध्याशी खेळू शकत होता मात्र या पुढील स्पर्धा बॅड पद्धतीने होणार आहे ज्यात ठरल्यास स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे उपउपांत्य स्पर्धेत भारताचा सामना फ्रांस बरोबर होणार आहे 

भारतातला करो या मरो या स्थितीत असताना आपल्या विजयामुळे स्पर्धेची उपउपांत्य फेरी गाठून देण्यात सिहाचा वाट उचलणाऱ्या विदित गुजराथी यांनी अमेरिकेच्या नीमन हंस मोके विरुद्ध काळ्या मोहऱ्या घेऊन हा विजय मिळवला आहेबुद्धिबळात पहिली खेळी पांढरा मोहऱ्या घेऊन करणारा करत असल्याने पांढऱ्यास स्वाभाविकपणे निर्माण करण्याची संधी अधिक मिळते काळे मोहरे घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला पांढरे मोहरे घेऊन खेळणाऱ्या खेळाडूचे आक्रमण परतवत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आक्रमण करत विजय मिळवावा लागतो हे लक्षात घेता विदित गुजराथी यांनी मिळवलेल्या विजयाचे महत्व लक्षात येते पहिल्या दोन सामन्यात विदित गुजराथी यांनी जिंकणाऱ्या खेळात काही चुका केल्याने त्यांना सामना बरोबरीत सोडवावा लागला होता मात्र त्याचा स्वतःच्या मनावर काहीही परिणाम न होऊ देता त्यांनी खेळात एकाग्रता टिकवून ठेवली ज्यामुळे विजयश्री खेचून आणली विदित गुजराथी यांनी कळाया मोहऱ्या घेऊन खेळताना डावाची सुरवात वजिरासामोरील प्यादे दोन घरे चालवून केली (बुद्धिबळाचा भाषेत (डी ५ ) प्रतिस्पर्ध्याने डावाची सुरवात राज्याच्या बाजूला असणारा घोडा राजासमोरील उंटसमोरील प्याद्याचा समोर आणून केली ( बुद्धिबळाच्या भाषेत एन एफ ३ ) सर्वसाधारणपणे बुद्धिबळाच्या खेळात कॅसलिंग करणे हे राजाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक समजले जाते विदित गुजराथी यांच्या प्रतिस्पर्ध्याने डावाच्या ७ व्य चालीत कॅसलिंग केले मात्र विदित गुजराथी यांनी डावाच्या अखेरपर्यंत कॅसलिंग केले नाही नाही म्हणायला त्यांनी राजाची अशी हालचाल केली की त्यामुळे आर्टीफिशियल कॅसलिंग सारखी स्थिती निर्माण झाली  डाव कश्या प्रकारे खेळण्यात आला याचा आढावा घेतल्यास पांढऱ्याचा राजा काळ्यापेक्षा अधिक असुरक्षित असल्याचे सहजतेने लक्षात येते डावात दोन्ही खेळाडूंच्या आसपास राज्याला शह आल्यास मात देण्यासाठी प्रतिस्पर्धी चा मोहरा आणि

आणि राजा या मध्ये ठेवण्यासाठी  कोणताही मोहरा नव्हता मात्र पांढऱ्या मोहऱ्यांची स्थिती काळया राज्याला चेक देता येण्यासारखी नव्हती काल्याचा राजा काळ्या चौकोनात उभा होता तर दोंघाचे काळ्या घरातील उंट पटाबाहेरहोते या उलट स्थिती पांढऱ्या खेळाडूंची होती त्याचा राजा पांढऱ्या घरात होता आणि काळ्याचा पंधरा उंट खेळात सक्रिय होता तर पांढऱ्याचा पांढरा उंट स्वतःच्याच मोहऱ्यामुळे पटावर अडकला होता ज्याचा फायदा नाशिकचे भूषण तरुणाईचे आयकॉन सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी प्रतिस्पर्ध्याला नमवले  यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर दुसऱ्या नाशिककाराने देशाची प्रतिमा उजवळली विदित यांनी ज्या डावाद्वारे भारताला करो अथवा मारो या स्थितीतून उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला  तो  डाव पुढीलप्रमाणे  

1. f3 d5 2. e3 f6 3. b3 f5 4. e2 h6 5. a3 bd7 6. c4 c6 7. O-O e5 8. xf8 xf8 9. c3 e7 10. d4 e4 11. d2 h5 12. e1 g6 13. a4 g7 14. c1 a6 15. a3 e6 16. f1 h4 17. h3 g5 18. f3 ae818... exf3 19. xf3 h519. cxd5 cxd5 20. fxe4 xe4 21. dxe4 xe4 22. xe4 xe4 23. b4 b823... g424. ac1 f6 25. c7 g4 26. e2?26. d226... g3 27. xb7 a5 28. b6 xb7 29. xb7 f5 30. c7 c8 31. e5 xe5 32. dxe5 e4 33. b2 c1 34. b4 axb4 35. a5 b3 36. a6 a1 37. a7 c5 0-1 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?