पाकिस्तानची वाटचाल दर्शवणारा एक टप्पा पूर्ण

     

   आपल्या शेजारील पाकिस्तानची वाटचाल कोणत्या दिशेने होणार हे स्पष्ट करणारा एक टप्पा २४ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला आहे.  पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आय मध्ये कार्य केलेल्या लेफ्टनंट जनरल असिम मुनीर यांची   पाकिस्तानचे २९ नोव्हेंबर २०२२ पासून पुढील लष्करप्रमुख असावेत अशी शिफारस केल्याने हा टप्पा पूर्ण झाला आहे आता पाकिस्तानच्या  राष्ट्रपतींची मान्यता घेण्याची औपचारिकता पूर्ण झाल्यावर त्याची अधिकृत घोषणा होईल पाकिस्तानच्या संविधानाच्या  (ज्यास एकहत्तर हा आईनं असे म्हणतात )  कलम २४३ नुसार हि कार्यवाही करतील या कलमाच्या काही उपकलमांद्वारे पाकिस्तानचे राष्ट्रपती पुढील २५ दिवसात निर्णय पंतप्रधानाला कळवू शकतात . त्यांनी बदल सुचवल्यास  बदलानुसार  पंतप्रधानांनी सुचवलेल्या  उमेदवाराविषयी पाकिस्तानचे राष्ट्रपती २० दिवसात निर्णय घेऊ शकतात . मात्र विद्यमान लष्करप्रमुखांचा कालावधी लक्षात घेता यावर इतका वेळ लागणार नाही अशी शक्यता बोलून व्यक्त करण्यात येत आहे 
          पाकिस्तानी प्रशासनव्यवस्थेत आणि राजकीय अवस्थेत पाकिस्तानी लष्कराचे एक महत्वाचे स्थान आहे . पाकिस्तानमधील कोणताही पंतप्रधान लष्करप्रमुखांच्या मान्यतेशिवाय राज्य करू शकत नाही . त्यामुळे यावर कोणाची नेमणूक होते ?यावर पाकिस्तानात अनेक गोष्टी निर्धारित होतात त्यामुळे या निवडीला अत्यंत महत्व आहे पाकिस्तानात जर लोकशाहीमार्गाने निवडून आलेले सरकार असेल तर भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यास त्याची मदत होते काश्मीर मोठ्या प्रमाणत शांत राहते . याउलट स्थिती जेव्हा लष्कर अधिक प्रबळ असते तेव्हा उत्पन्न होते लष्कर प्रबळ ठरणार का ? या प्रश्नाचे बहुतांशी उत्तर या नेमणुकीतून मिळते त्यामुळे हा प्रश्न फक्त पाकिस्तानचा  राहत नाही त्याला भारताची देखील जोड मिळते 
         २९ नोव्हेंबर पासून माजी होणाऱ्या पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल करीम वाजवा यांच्या कार्यकाळात २०१९ साली भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधात मोठ्या प्रमाणत कटुता आली होती त्याच वर्षी वर्षात भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. मात्र बाजवा यांनी त्यावेळी वाद टाळण्यास प्राधान्य दिले होते. भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानी हद्दीत कोसळल्यानंतरही त्यांनी संयमी भूमिका घेतली होती. बाजवा यांच्यावर देखील  राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करण्यात आलेला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पंतप्रधान म्हणून निवडून येण्यास बाजवा यांनी मदत केली, असा आरोप करण्यात येतो तर माझ्या राजकीय अध:पतनासाठी बाजवा यांनी पभूमिका बजावली, असा आरोप इम्रान खान यांनी याच२०२२  वर्षी केला .            पाकिस्तानच्या स्वातंत्र्यपासून आतापर्यंतच्या ७५ वर्षात ३९ वर्ष लष्कराची थेट राजवट होती पाकिस्तानात आतापर्यंत ४ वेळा लष्करी उठाव झाला आहे पाकिस्तानी लष्कारामार्फत पाकिस्तानात अनेक वस्तूंच्या निर्मितीचे कारखाने चालवले जातात पाकिस्तानमधील अनेक पंतप्रधानांना लष्करप्रमखांशी मतभेत झाल्यामुळे सत्ता सोडावी लागली आहे ते बघता पाकिस्तानी लष्कर प्रमुख किती महत्वाचे पद आहे हे समजते 
     इम्रान खान यांचे विद्यमान पंतप्रधानांशी ज्या मुद्यावरून मतभेद आहेत त्यामध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुखांची नेमणूक हा प्रमुख मुद्दा आहे इम्रान खान यांच्यामते पाकिस्तानी प्रशासन आणि राजकीय व्यवस्थेतील लष्कराचे स्थान कमी करण्यासाठी त्यांच्या नियुक्तीची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली पाहिजे इम्रान खान यांचे हे विधान विद्यमान पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांना त्यांच्या अधिकाराचे अतिक्रमण वाटल्याने त्यांनी त्या विरोधात विधाने केली  होती त्यावर प्रत्युत्तर म्हणून इम्रान खान यांनी पुन्हा विधाने केल्याने पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुखांची नियुक्ती हा मोठा विषय झाला होता इम्रान खान यांनी आमचे पंतप्रधाननशी तात्विक मतभेद आहेत पाकिस्तानच्या सार्वभोमत्व आणि देशाच्या सुरक्षितेबाबत आम्ही पूर्वी देखील सरकार आणि लष्करासमवेत होतो आता देखील आहोत आणि भविष्यात देखील असू असे विधान करत वाद शमवण्याचा प्रयत्न केला होता इम्रान खान यांच्या या विधानामुळे हा वाद किती विकोपाला गेला होता हे समजते 
   आपल्या निवृत्तिपर समारंभात पाकीस्तानचे मावळते लष्करप्रमुख जनरल  करीम बाजावा यांनी या आधी पाकिस्तानी लष्कराने देशाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या पुढे तो नसावा यासाठी मी तरतुदी केल्या असे सांगितले  मात्र पाकिस्तनच्या लष्करातर्फे या आधी अनेकदा असे विधान करण्यात आल्याने पाकीस्तानचे मावळते लष्करप्रमुख  जनरल  करीम बाजावा यांनी खरच काही तरतुदी केल्या आहेत का ? हे समजायला शंका आहेत भविष्यकाळावरच ते सोडावे लागणार आहे जर खरच तरतुदी केल्या असतील तर भारत आणि पाकिस्तानात शांतता नाडण्यास खूप मोठ्या प्रमाणत मदत होईल नाहीतर आहेच ये रे माझ्या मागल्या 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?